Thursday, March 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

पुण्यात खाजगी सावकारांचा उच्छाद

पुण्यात खाजगी सावकारांचा उच्छाद

पोलीस क्राइम
30 हजाराच्या कर्जावर 73 हजाराचे मुद्दल व्याज, तर 45 हजार रुपयांच्या कर्जावर 1 लाख 9 हजार रुपयांची पठाणी वसुली,पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात कोयता गँगचा उच्छाद… कोयता गँग रस्त्यावर उतरली.. पोलीसांसहित सर्व मिडीया कोयता .. कोयता म्हणून ओरडत असतांना, आम्हीच प्रथम कोयता गँगचा बोलविता धनी खाजगी सावकार असून, त्यांच्या जो पर्यंत मुसक्या आवळल्या जात नाहीत, तो पर्यंत कोयता माफीया शांत बसणार नाही. शेवटी माथाडी आणि खाजगी सावकारांचा प्रश्न पुन्हा एैरणीवर आला आहे. फायनांशिअल कंपन्यांची वसुली करणारे देखील कोयतामाफीयाच असून, त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. विश्रामबाग पोलीसांनी एका खाजगी सावकारावर गुन्हा दाखल केला असून त्याच्या पठाणी वसुलीची हकीकत खालील प्रमाणे आहे. कोंढवे धावडे येथे राहणाऱ्या एका 28 वर्षीय इसमाने आरोपी कैलास कडू वय 354 रा. हिंगणे खुर्द याच्...
मार्केटयार्ड म्हणजे शस्त्रे आणि गुन्हेगारांचा अड्डा आहे काय…पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलीसांनी केले जेरबंद

मार्केटयार्ड म्हणजे शस्त्रे आणि गुन्हेगारांचा अड्डा आहे काय…पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस क्राइम
पुणे/दि/national forum/आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड पुण्याचा नावलौकिक आहे. त्याच मार्केटयार्डात चाकू, सुऱ्या, कोयते पकडण्यात आले होते. आता त्याच मार्केटयार्डात अवैधरित्या पिस्तुल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले आहे. मार्केटयार्ड म्हणजे शस्त्रे, मार्केटयार्ड म्हणजे गुन्हेगारांचा अड्डा असे काहीसे चित्र सध्या दिसत आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अंमलदार आशिष यादव यांना खबर मिळाली की, मार्केटयार्डातील गोल बिल्डींग जवळ एक इसम उभा असून त्याच्याकडे अवैधरित्या पिस्तुल आहे. त्याच्या हातातून कोणतातरी गंभिर गुन्हा घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्केटयार्ड पोलीस स्टेशनकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती ए.व्ही. देशपांडे व पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती सवित ढमढेरे यांना ही बाब सांगुन कारवाईबाबतच्या सुचना मिळाल्या. ...
टूरिस्ट व्हिसावरील महिलांकडून पुण्यात वेश्याव्यवसाय

टूरिस्ट व्हिसावरील महिलांकडून पुण्यात वेश्याव्यवसाय

पोलीस क्राइम
पुणे/वृत्तविश्लेषण/national forumभारतात टूरिस्ट अर्थात पर्यटन व्हिसावर आलेल्या महिलांनी पुणे शहरातील मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील परकीय नागरीक नोंदणी शाखा यांनी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका खाजगी मसाज पार्लरमध्ये छापा टाकुन संबंधित महिलांना पकडून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले आहे. पुणे शहर पोलीसांनी आजपर्यंत ज्या ज्या मसाज पार्लर स्पावर छापे मारले आहेत, त्या त्या सर्व ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले आहे. शेकडो मुली व महिलांना पकडून सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. तरी देखील आजही पुणे शहरात शेकडोने नव्हे तर हजारोंनी मजसा पार्लर व स्पा सेंटर सुरू आहेत. बहुतांश मसाज पार्लर व स्पा मध्ये मोठ्या संख्येने वेश्याव्यवासाय सुरू असल्याचे दिसून येत आहे. वेगवगळ्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित...
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणूकीत निळ्या झेंड्याचा वापर, कुणाला विचारून निवडणूकीत वापरले जात आहेत…निळे झेंडे

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणूकीत निळ्या झेंड्याचा वापर, कुणाला विचारून निवडणूकीत वापरले जात आहेत…निळे झेंडे

राजकीय
काँग्रेसची अवस्था आजही जुन्या जमिनदारासारखी आहे पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/स्वातंत्र्याच्या 75 वर्षात काँग्रेसनेच अधिक काळ देशात व महाराष्ट्रात सत्ता उपभोगली आहे. देशातील व राज्यातील बहुजन समाजाला सत्तेत येऊ दिले नाही. यांनीच राज्य केलं. त्यामुळेच राज्यात 3/4 वेळेस काँग्रेसला जनतेने सत्तेतून बाहेर फेकले आहे. सत्तेतून बाहेर फेकले गेलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आता देखील बहुजन समाजाला सत्तेपर्यंत पोहोचू देत नाहीत. आंबेडकरी समुह व बहुजन समाजाची या पक्षांना मते हवीत परंतु या समाजांना सत्तेत वाटा दयायचा नाहीये. पुण्यातील कसबा व पिंपरी चिंचवड येथे पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गळयात आणि गाडीवर निळे झेंडे लावुन फिरत आहेत. दोन्ही काँग्रेसवाले कुणाला विचारून निळे झेंडे वापरत आहेत असा सवाल आंबेडकरी जनता विचारत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाज...
पुणे महापालिकेच्या विधी विभाग भरती प्रक्रियेत आयुक्त श्री. विक्रम कुमार यांचा हस्तक्षेप…? जवळच्या नातेवाईकांची सहा. विधी अधिकारी पदावर वर्णी…?

पुणे महापालिकेच्या विधी विभाग भरती प्रक्रियेत आयुक्त श्री. विक्रम कुमार यांचा हस्तक्षेप…? जवळच्या नातेवाईकांची सहा. विधी अधिकारी पदावर वर्णी…?

सर्व साधारण
pmcjlapune मनपा मुख्य कार्यालात मुख्य विधी अधिकाऱ्याचा वाढदिवस धुमडक्याज साजरा पुणे/दि/ नॅशनल फोरम/महाराष्ट्र महापालिका अधिनियम आणि पुणे महापालिका सेवाशर्ती नियमानुसार पुणे महापालिकेतील कोणत्याही नोकरभरतीमध्ये आयुक्तांनी पदनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यासह खातेप्रमुख, मुख्य लेखापरीक्षक यांच्या कर्मचारी निवड समितीमार्फतच कामकाजाचे नियम आहेत. तथापी पुणे महापालिकेतील सहायक विधी अधिकारी या पदाच्या भरतीप्रक्रियेमध्ये महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या अतिजवळच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली असल्याची बाब पुणे महापालिकेत चर्चिली जात आहे. यात अति. आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे, उपआयुक्त साप्रवि श्री. सचिन इथापे व खातेप्रमुख श्रीमती निशा चव्हाण यांच्यावर दबाव आणून, पात्रता नसतांना देखील उमेदवाराची निवड केली असल्याची गंभिर चर्चा सध्या पुणे महापालिकेत होत आहे. त्यामुळे सहायक विधी अधिकारी पदाची ...
पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागातील मटका जुगार अड्डयावरील कारवाईच्या 12अ भानगडी

पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागातील मटका जुगार अड्डयावरील कारवाईच्या 12अ भानगडी

पोलीस क्राइम
कायदा म्हणजे काय… सासुचे कारवाईचे आजचे स्वरूप… मटका - जुगार अड्डे चालविणाऱ्यांना धमकाविणे, पोलीस स्टेशनवर डोळे वटारूण पाहणे, कारवाई करीत असल्याचे आलेख अभिलेखा वाढविणे, दोन्हीकडे धमकावून सासुचे वजन वाढविणे,…. यातून निष्पन्न काय होत आहे….वरील अनु. क्र. 1 ते 4 चे प्रकार घडवुन- सासुचा आलेख वाढविणे आणि खात्याची प्रतिमा मलिन करणे.. यापेक्षा वेगळे ते काय…खंबीर कारवाईसाठी पुराणिक पॅटर्नच लय भारी…. कुठे हयगयच करायची न्हाई…. पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाने मागील तीन/चार महिन्यांत 32 पैकी काही विशिष्ठ पोलीस स्टेशन हद्दीत कारवाईचा धडाका लावला आहे. ह्या कारवाया नेमक्या कशासाठी केल्या जात आहेत याचा काहीच थांगपत्ता लागत नाहीये. अवैध धंदयावर कारवाई केली तर तो अवैध धंदा पोलीसांच्या व कायदयाच्या भीतीने बंद होणे अपेक्षित आहे. परंतु सामाजिक ...
कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका काय? बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं,

कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका काय? बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं,

राजकीय
नाशिक/दि/पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहेत. तर लवकरच महाविकास आघाडीकडूनही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आमची शिवसेनेची युती आहे. आम्ही शिवसेनेला विनंती केली होती की, त्यांनी या दोन्ही जागा लढवाव्या. कारण कसब्याच्या जागेवर काँग्रेसचा पराभव झाला आहे आणि राष्ट्रवादीने इथे उमेदवारच जाहीर केला नव्हता, अशी परिस्थिती आहे. त्याम...
पुणे शहरातील गुन्हेगारीचे मुळ खाजगी सावकारी आणि फायनांशिअल कंपन्या हेच असल्याचे उघड

पुणे शहरातील गुन्हेगारीचे मुळ खाजगी सावकारी आणि फायनांशिअल कंपन्या हेच असल्याचे उघड

पोलीस क्राइम
पुणे शहरात खाजगी सावकारांचा धुमाकूळखंडणी विरोधी पथक एक व दोन कडून धडक कारवाईपुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात गुन्हेगारी का वाढली आहे… प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या तरुणांच्या हातामध्ये कोयते नेमके कशामुळे आले आहेत… नोकरी नाही… धंदा नाही… व्यापार नाही… तरी या युवकांकडे नवी नवीन गाड्या आणि हातात गळ्यात सोने कसे… याची माहिती घेत असताना खाजगी सावकारी तसेच फायनांशिअल कंपन्या हेच दिसून आले आहे. दरम्यान खाजगी सावकाराने दिलेल्या रकमांची वसुली करण्याकरिता तरुणांच्या हातामध्ये अग्निशस्त्र व धारदार शस्त्र देऊन वसुली करता पाठविले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यातच भाईगिरी, दादागिरीचा छंद भरलेल्या युवकांना स्फुरण चढले आहे. यामुळेच हातात कोयता घेवून मी देखील भाई म्हणत पुढे येत आहेत. कोयता गँग माफीया गप्प बसले असले तरी कारवाया सुरूच राहणार आहेत. त्यामुळे या खाजगी सावकारी व फायनांशिल कंपन्यांच्य...
पुणे महापालिका विधी विभागाकडून प्रशासक श्री. विक्रम कुमार यांच्यासह पुणेकर करदात्यांची दिशाभुल?

पुणे महापालिका विधी विभागाकडून प्रशासक श्री. विक्रम कुमार यांच्यासह पुणेकर करदात्यांची दिशाभुल?

शासन यंत्रणा
पुणे/दि/ नॅशनल फोरम/शासकीय निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन किंवा चारच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या बाबतीत अंशतः किंवा थोडंफार खोटं बोललं किंवा खोटी विधान केली तर ती फार कोणी असे मनावर घेत नाहीत. नागरीकांना आता सवय झाली आहे. परंतु एखाद्या वर्ग 1 मधील किंवा सुपर क्लास वन अधिकाऱ्याने सफाईदारपणे धांदातपणे खोटं बोलल्यास यामध्ये त्या अधिकाऱ्याची नव्हे तर संपूर्ण महानगरपालिकेची बदनामी होते. खोटं किती बोलावं, त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा राहिली असल्याचे दिसून येत नाही. तारीख पे तारीख… तारीख पे तारीख…. झूट पे झूट…. झूट पे झूट… लबाडीचा कळस घातला आहे. पुणे महापालिकेच्या विधी विभागातील खोटी माहिती माध्यमांत प्रसारित करून पुणे महापालिकेची बदनामी करून न्यायालयीन व्यवस्थेबाबत चुकीची माहिती प्रसारित करून अविश्वास दाखविल्या प्रकरणी मुख्य विधी अधिकारी श्रीमती निशा चव्हाण यांच्यावर शिस्तभंगाच...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपासहित प्रस्थापित पक्षांनी, प्रत्येक निवडणूकीत आंबेडकरी चळवळ आणि बाळासाहेब आंबेडकर यांना ब्लॅकमेल केले

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपासहित प्रस्थापित पक्षांनी, प्रत्येक निवडणूकीत आंबेडकरी चळवळ आणि बाळासाहेब आंबेडकर यांना ब्लॅकमेल केले

सर्व साधारण
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाणवंचित बहुजन आघाडी व शिवसेना यांची युती झाल्यानंतर, सर्वाधिक मळमळ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उफाळुन आली असल्याचे खाजगी वृत्तवाहिनीवरील अनेक बातम्यांमधुन दिसून येत आहे. वृत्तपत्र व टिव्ही चॅनेल्सच्या काही पत्रकारांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री. नाना पटोले यांना मविआ युतीबाबत विचारले असता, बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागण्या काय आहेत हे माहिती नसल्याचे सांगितले आहे. प्रसारमाध्यमांसमोर रागजळफाट व्यक्त केला असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील बुडाला आग लागल्यासारखे सगळीकडे आरोळ्या ठोकत सुटले असल्याचे वृत्तवाहिनीवरून दिसत आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते राष्ट्रवादीची बाजु सावरतांना दिसत आहेत. दरम्यान मागील 40/50 वर्षात सत्ताधारी व विरोधी पक्षातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी आंबेडकरी चळवळ व बाळासाहेब आंबेडकर यांना कसे ब...