Sunday, November 1 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: court in Shivajinagar

पुण्यातील शिवाजीनगर येथील न्यायालयात आरोपी, फिर्यादींसह नातेवाईकांचा राडा, पोलीसांना धक्काबुक्की,

पुण्यातील शिवाजीनगर येथील न्यायालयात आरोपी, फिर्यादींसह नातेवाईकांचा राडा, पोलीसांना धक्काबुक्की,

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र. 1 येथे समर्थ पोलीस ठाण्याकडील आरसीसी प्रकरण बोर्डावर असतांना, न्यायालयाकडून आदेश पारित करतांना, फिर्यादी व आरोपींमध्ये वाद होवून एकमेकांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली. मध्यस्थी करणाऱ्या पोलसांना शिवीगाळ करून पोलीस व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना एक हजार रूपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र. 1 येथे शुक्रवार दि. 30 ऑक्टोंबर रोजी समर्थ पोलीस ठाण्याकडील ( महाराष्ट्र शासन विरूद्ध प्रशांत नामदेव पवार व इतर ) आरसीसी प्रकरण बोर्डावर होते. न्यायालयाचे कामकाज साधारण 11.50 वाजण्याच्या सु...