
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुण्याच्या सा.बां खात्यातील शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्याचे आदेश शासनाने नुकतेच जारी केले आहेत. यात सा.बां. उपविभाग क्र. 1 अंतर्गत असलेले विधानभवन शाखेचे शाखा अभियंता श्री. अनिल काकडे यांची बदली उपविभागांतर्गत कारागृह शाखेत करण्यात आली असून नवनाथ शेळके यांची विधानभवन शाखेचे शाखाधिकारी म्हणून पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. तथापी श्री. अनिल काकडे हे शासनाने दिलेल्या बदलीच्या ठिकाणी पदभार घेण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे ते विधानभवन शाखेचा पदभार सोडण्यास तयार नाहीत व कारागृहाचा पदभार घेण्यासही तयार नाहीत. शासनाच्या आदेशाला हरताळ फासण्याचे काम शाखा अभियंता अनिल काकडे करीत असल्याचे दिसून आले आहे. आज तर कामालच झाली…. काही नागरीक विधानभवन शाखेत सकाळी 11 वाजता आलेले असतांना, श्री. काकडे व श्री. शेळके विधानभवन शाखेत उपस्थित असतांना, श्री. काकडे हे शासकीय कार्यालयास कुलूप ठोकून त्यांनी विधानभवनातून धूम ठोकली आहे. पुण्याच्या सा.बां. खात्यात बदली व पदभारावरून रणकंदन पेटले असल्याचे दिसून आले आहे.
काकडेंकडून शासन आदेशाची एैशी की तैशी-
शाखा अभियंता श्री. अनिल काकडे यांची बदली कारागृह शाखेत झालेली असतांना, त्यांच्याच पसंतीक्रमातील बदलीच्या ठिकाणी जाण्यास ते तयार नाहीत, तसेच विधानभवन शाखेचा पदभार सोडण्यास तयार नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे श्री. अनिल काकडे यांनी शासनाच्या आदेशाला हरताळ फासून आदेशाची एैशी की तैशी करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
दरम्यान शाखा अभियंता श्री. नवनाथ शेळके यांनी शासनाच्या बदली आदेशानुसार दि. 23 जुलै रोजी आगमन अहवाल सादर करून, विधानभवन शाखेत गेले असता, श्री. काकडे यांनी पदभार सोडण्यास साफ नकार दिला असल्याचे समोर आले आहे. तथापी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही तर कारवाईचा बडगा सहन करावा लागेल म्हणून श्री. शेळके हे विधानभवन शाखेतील बाहेरील टेबलवर बसून त्यांचे कर्तव्य पार पाडत असल्याचे दिसून आले आहे.
नवनाथ शेळके शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करणार की काकडेंची आरेरावी सहन करणार-
दरम्यान श्री. अनिल काकडे हे शासकीय कार्यालयास अनाधिकाराने कुलूप लावुन निघून गेले असल्याने श्री. शेळके यांना कार्यालयाच्या बाहेर बसूनच काम करावे लागत आहे. श्री. नवनाथ शेळके कायदयातील तरतुदींचा अंमल करणार की काकडेंची आरेरावी सहन करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नियमानुसार, ज्या अधिकारी-कर्मचाऱ्याची बदलीने पदस्थापना झाली आहे, त्या अधिकारी- कर्मचाऱ्याला बदलीच्या ठिकाणी उपस्थित राहून कर्तव्य बजावणी करणे आवश्यक ठरते. परंतु त्याला त्याच्या कर्तव्यात आड येणाऱ्याविरूद्ध कायदेशिर कारवाई करण्याचा अधिकार देखील प्राप्त आहे. श्री. अनिल काकडे हे शासनाच्या आदेशाविरूद्ध कृती करीत असल्याने, अनाधिकाराने व गैरहेतूने प्रेरित होवून गैरकृत्य करणाऱ्या विरूद्ध पुणे पोलीसांनी दिलेल्या 112 क्रमांकास फोन करून त्यांची दाद मागता येऊ शकते. तसेच अनाधिकाराने शासकीय कार्यालय व कार्यालयातील दालनास लावलेले कुलूप उघडण्याचा पोलीसांना अधिकार असल्याने श्री. शेळके हे शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करणार आहेत की, शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणार, याकडे आता सा.बां. खात्यातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अनिल बडेंना शेळके नकोत?
सा.बां. विभागांतर्गत उपविभाग क्र. 1 चे उपअभियंता श्री. अनिल बडे यांना शाखा अभियंता श्री. नवनाथ शेळके नको असल्याचे शाखा अभियंता श्री. काकडे यांच्या गैरवृत्तीवरून दिसून आले आहे. उपअभियंता श्री. बडे यांना शेळके का नको आहेत, शासनाचे आदेश असतांना देखील शेळके यांच्याकडे पदभार का दिला जात नाही याची माहिती घेतली असता, सा.बां. उपविभाग क्र. 1 अंतर्गत काढण्यात आलेली बोगस बीले, बोगस कामांच्या फाईल्स….
जर श्री. शेळके यांच्या हाती या फाईल्स लागल्या तर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांची पोलखोल होण्याची भिती श्री. बडे यांना असल्याचे सुत्रांनी नमूद केले आहे. त्यामुळे उपअभियंता श्री. बडे यांना त्यांच्याच मर्जीतील शाखा अभियंता आणून बसवायचा आहे, त्यासाठी श्री. शेळकेंवर अनाधिकाराने दबाव टाकत असल्याचे समोर आले आहे. तसेच अनाधिकाराने विधानभवनाचा पदभार जबरीने स्वतःच्या कब्जात ठेवला आहे. मागील 30 वर्षाच्या काळात असा प्रकार पुण्यात कधीच घडला नव्हता, तो प्रकार आज घडला आहे. श्री. शेळके यांच्यावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणण्याचे प्रयत्न होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, त्यात सा.बां. पूर्व विभागाचे खातेप्रमुख आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान 1. विधानभवन शाखेत असं काय दडलयं….
- काकडे पदभार का सोडत नाहीत….
- बदली आदेश शासनाचा आहे… शासनाच्या आदेशाविरूद्ध काकडे व शेळके वागणार का….
- शेळके कायदयाची अंमलबजावणी करणार की कायदा मोडणार…
- काकडेंना कारागृह शाखा का नको…. विधानभवन शाखा का पाहिजे….
- अनिल बडेंचा हेतू काय आहे….
- सा.बां. पूर्व विभागाचा विधानभवनात इंटरेस्ट का वाढला आहे…..
- कोण आहेत पराग नाईक…. कोण आहेत मळेकर….. पाहूयात पुढील बातमीत….
