Thursday, May 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

खडक पोलीसांकडून तीन दुचाकींसह, वाहनचोराला केले जेरबंद

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून वाहन चोरी करणाऱ्या मोबीन सुलतान खान वय 27 वर्ष याला अटक केली आहे. एक वाहन चोरीचा तपास करीत असतांना, खान याच्याकडून आणखी तीन गुन्हे उघडकीस आणण्यात खडक पोलीसांना यश आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,

खडक पोलीस स्टेशन हद्दीत वान चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गायकवाड व पोलीस निरीक्षक श्री. संपतराव राऊत यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या आहेत. त्यानुसार तपास पथकातील प्रभारी अधिकारी श्री. प्रल्हाद डेंगळे व तपास पथकातील स्टाफ श्री. दुडम, श्री. ठवरे, श्री. तळेकर, श्री. चव्हाण श्री. वाबळे, श्री. ढपवरे, श्री. कुडले असे कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. 

यावेळी पोलीस अंमलदार श्री. किरण ठवरे व पोलीस अंमदार हर्षल दुडम यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, खडक पोलीस स्टेशन हद्दीतून 10 ते 12 दिवसापूर्वी लोहियानगर येथून हिरो होंडा सीडी डिलक्स क्र. एमएच 12 एचआर 2709 ही गाडी चोरणारा इसम हा सुशिल लॉज गल्लीमधील रोडवर माडीवाली कॉलनी जवळ थांबला असून हा इसम अंगाने मध्यम बांधा, रंगाने गोरा, अंगात काळ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट असे कपडे परिधान केलेले आहेत अशी खबर मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवुन आरोपी थांबलेल्या ठिकाणी पोलीस पोहोचले. 

वर्णनाप्रमाणे इसम व हिरो होंडा सीडी डिलक्स गाडी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून नाव पत्ता विचारला असता, त्याने मुबीन सुलतान खान वय- 27 वर्ष ंदा भंगार विक्री रा. पीएमस कॉलनी, दापोडी असे सांगितले. त्याच्या ताब्यातील हिरो होंडा सीडी डिलक्स गाडीच्या मालकावरून विचारपुस केली असता, त्याने उडवा उडविची उत्तरे दिली. त्यास पोलीसांनी विश्वासात घेवून त्याच्या ताब्यातील गाडीबाबत विचारणा केली असता, त्याने 15 दिवसापूर्वी ही गाडी लोहिया नगर येथून चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याने आणखी दोन गाड्या  चोरल्याची कबुली दिली आहे. 

वाहन चोराकडून सुमारे 52 हजार रुपये किंमतीच्या 3 मोटरसायकल जप्त केल्या असून वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात खडक पोलीसांना यश आले आहे. त्यापैकी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथून एक व समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील एक अशा एकुण तीन गुन्ह्यांचा तपास लावला आहे. 
ही कारवाई खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. संपतराव राऊत, पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार किरण ठावरे, हर्षल दुडम, संदीप तळेकर, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, लखन ढावरे, रफिक नदाफ, प्रशांत बडदे, सागर कुडले, नितीन जाधव, तुळशीराम टेंभुर्णे, महेश जाधव पथकाने केली आहे.