सोन्यापेक्षा महागड्या प्लॅटिनमच्या खाणींसाठी मणिपूरमध्ये, मोदी-अदाणींचं नाव घेत बाळासाहेब आंबेडकरांचा गौप्यस्फोट
नॅशनल फोरम/औरंगाबाद/दि/ प्रतिनिधी/मागील तीन महिन्याहून अधिक काळापासून भारताचं ईशान्यकडील राज्य मणिपूमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. दररोज हिंसाचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. तर हजारो कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावरून मणिपूरमध्ये हिंसाचार होत असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मणिपूरमध्ये सोन्यापेक्षा महागडा धातू असणाऱ्या प्लॅटिनमची खाण सापडली आहे. या खाणीचं उत्खनन करण्याचं कंत्राट पंतप्रधान मोदी यांचा जवळचा मित्र गौतम अदाणींना देण्यात आलं आहे. पण मणिपूरमधील आदिवासी हिल काऊन्सिलनं याला विरोध केला आहे. यामुळे मणिपूरमध्ये हिंसाचार घडवला जात आहे, असा खळबळजनक आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला. ते औरंगाबाद येथ...