आदिवासी विकास कागदावर – सरकारी व्यवस्थेलाच दंश?
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा या तालुक्यातील “ जपतलाई येथील कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन मंडळ अनुदानित आश्रम शाळेतील तिन मुलींना सर्प दंशाने जीव गमवावा लागला आहे. दुर्गम आदिवासी भागातील शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षततेच्या व्यवस्थेचे विदारक वास्तव आणि धिंडवडे समोर आणणारी ही घटना आहे . देश स्वातंत्र्याच्या 80 व्या वर्षाकडे वाटचाल करत असताना आदिवासी विद्यार्थिनींना सुरक्षित निवास, आरोग्य सुविधा आणि तातडीचे उपचार उपलब्ध होत नसतील, तर विकास नेमका कोणासाठी, हा प्रश्न उपस्थित होतो.
महाराष्ट्रामध्ये 497 शासकीय आश्रम शाळा आहेत, तर 556 अनुदानित आश्रम शाळा आहेत . या मध्ये सुमारे 1,97,812 मुले - मुली शिकत आहेत. या मुलांवर शासन दरवर्षी सुमारे 1000 कोटी ते 1350 कोटी इतका खर्च करत असून सुमारे 5000 कोटी सर्व आस्थापनासह खर्च होत असल्याचे विविध माहितीच्या श्रोतांवरुन दिसून येत आहेत. अशा आशय...
