एक लाख ते 100 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांना जास्त परताव्याचे आमिष, आर्थिक फसवणूक करणाऱ्या राजश्री तुड्येकर हीला शिवाजीनगर पोलीसांनी केली अटक
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/शिवाजीनगर हद्दीत रॉयल फॉरेक्स ट्रेडींग या नावाने कंपनीचे कार्यालय चालू करून रॉयल ट्रेडिंग कंपनीमध्ये 01 लाखापासून पुढे 100 कोटी पर्यंतच्या गुंतवणुक स्विकारल्या जातात तसेच दिलेल्या रकमेपैकी 30 टक्के रक्कम शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतविली जाते व उरलेली 70 टक्के रक्कम सुरक्षीत ठेवली जाते, त्यामुळे गुंतवणुकदारास त्यांनी गुंतविलेल्या रकमेवर चांगला परतावा दिला जातो… असे सांगून अनेक गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे खोटे आमिष दाखवुन फसवणुक करणारी महिला राजश्री राजेश तुडयेकर हीला शिवाजीनगर पोलीसांनी अटक केली आहे.
रॉयल फॉरेक्स ट्रेडींगच्या राजश्री राजेश तुडयेकर हीच्या विरोधात शिवाजीनगर येथे भादवि कलम 406,409,420, सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, 1999 (एमपीआयडी) कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्हयाच्य...
