
पुण्यात चोर-दरोडेखोरांनी घातलेल्या दरोड्यातील, सुमारे 5 कोटी रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने, फिर्यादींना पुनः प्रदान….
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या पाचही परिमंडळातील पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असणारे दरोडा, चेन चोरी, घरफोडी, चोरी व इतर गुन्हयातील चोरीस गेलेले सोने / चांदीचे दागिने फिर्यादी यांना पुनः प्रदानाचा कार्यक्रम पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सुमारे पाच कोटी 31 लाख रुपयांपेक्षा अधिक असलेले सोने चांदीचे दागिने व चोरीचा मुद्देमाल संबंधित फिर्यादीस दिले असल्याचे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
पोलीसांना 100 कोटींचा निधी देणार -अलीकडच्या काळात गुन्हेगार अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहेत. त्या तुलनेत पोलीस अत्यंत मर्यादित साधनांसह आपले काम चांगल्या प्रकारे करतात. पोलीसांना अद्ययावत शस्त्रे व साधने उपलब्ध करून देण्यासाठी आणि पोलीस वसाहतीच्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती आणि समाजातील उत्तरदायित्व निधीच्...