Friday, April 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील जनता वसाहत… अरुंद रस्ता… एकमेकांना लागला धक्का, झाली बाचाबाच… दिल्या शिव्या… चिडून जाऊन त्याने घातला डोक्यात दगड आणि केला खून,

दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जेरबंद
नॅशनल फोरम/ पुणे/ दि/ प्रतिनिधी/
दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीत सुनील विठ्ठल मोरे वय 52 वर्ष रा. जनता वसाहत यांचा पहाटे कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून खून केल्या बाबत दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दत्तवाडी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट तीन यांनी तपास पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.


दत्तवाडी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने केलेले तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्या बातमीदार मार्फत आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली. त्यानंतर स्थानिक घटनास्थळी उपस्थित असलेला आरोपी समीर उर्फ वीरेंद्र पांडुरंग चौरे वय-33 वर्ष रा.निलायम पुलाजवळ, पर्वती पायथा यास अटक करण्यात आली. तपासात निष्पन्न झालेला माहितीनुसार दुसरा आरोपी राज चंद्रकांत जाधव वय- 19 वर्ष रा. गल्ली नंबर 3 मधला टप्पा, जनता वसाहत, आनंद मठाजवळ पर्वती पायथा पुणे व एक विधीसंघर्षित बालक यास 27 मे रोजी जनता वसाहत परिसरातून त्याने गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी गाडीसह त्याला ताब्यात घेण्यात आले असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.


त्यातील राज जाधव यास अटक करण्यात आली आहे व विधी संघर्षीत बालकास चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले आहे. जनता वसाहत येथील राज जाधव याचा गुन्हेगारी पूर्व इतिहास नसून तो पहाटे पेपरचे गठ्ठे बांधण्याचे काम करतो तसेच राज जाधव व विधी संघर्षित बालक एकाच परिसरात राहण्यास असून एकाच अरुंद रस्त्याने जाताना एकमेकांना धक्का लागल्याने, झालेल्या शिवीगाळ व बाचाबाचीमुळेे चिडून जाऊन सुनील विठ्ठल मोरे यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाल्याची बाब दत्तवाडी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट तीन यांच्या संयुक्त कारवाई दरम्यान समोर आले आहे.


आरोपीने गुन्ह्यात वापरलेल्या वाहनावरून आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले. गुन्ह्यात वापरलेल्या ऍक्टिवा गाडी प्रमाणे दिसणाऱ्या 50 ते 60 दुचाकी व त्यांच्या मालकांचा या दरम्यान पोलिसांनी शोध घेतला व मुख्य आरोपी शोधून काढला. गुन्हयाचा पुढील तपास दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जयराम पायगुडे करीत आहेत.
ही कारवाई दत्तवाडी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट तीन यांनी केली आहे. दत्तवाडी पोलीस स्टेशन पथकातील व गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार संतोष क्षीरसागर, कुंदन शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, ज्ञानेश्वर चित्ते, किशोर वळे, प्रशांत शिंदे, प्रमोद भोसले, दयानंद तेलंगे पाटील, अमित सुर्वे अनिस तांबोळी, सद्दाम शेख, नवनाथ भोसले, अमोल दबडे, अमित शिवे यांनी केली आहे