
पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत 10 ते 15 वर्षांपासून घुटमळणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा…
एकाच खात्याने सोईसाठी बनविलेल्या विभागात बदली म्हणजे, बदलीचा सौदा 5 लाख ते 25 लाख रुपयात मान्य झाल्याचे समजावे…
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारावर संविधान परिषदेच्या वतीने 91 दिवसांचे हलगी बजाव धरणे आंदोलनाच्या माध्यमातून पुणे महापालिकेच्या महत्वाच्या खात्यात ठाण मांडून बसलेल्यांची पोलखोल अनिरूद्ध चव्हाण यांनी केली होती. तसेच बदलीचा दर 10 लाखापासून ते 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचे उघडपणे जाहीर सभेत माहिती दिली होती. त्यामुळेच शिवाजीनगर पोलीसांकरवी आमची हलगी वाजविणे बंद करण्यात आले तसेच सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी बेकादेशिरपणे आमचा सभेचा साऊंड उचलुन नेला होता. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला परंतु पुढे दोन महिन्यानंतर, आम आदमी पार्टीसह, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुणे महापालिकेतील बदली व पदोन्नतीतील लाखोंची बोली आणि को...