Saturday, January 11 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: punecrimelatestnew

हेरला ग… हेरला ग… मला पाहिजे तो गडी मी हेरला ग… विनयभंग करून 7 वर्ष फरारी असलेल्या आरोपीस क्राईम युनिट एकने केले जेरबंद

हेरला ग… हेरला ग… मला पाहिजे तो गडी मी हेरला ग… विनयभंग करून 7 वर्ष फरारी असलेल्या आरोपीस क्राईम युनिट एकने केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/येरवडा येथील नागपूर चाळीत डिसेंबर 2016 मध्ये एका महिलेस कार्यक्रमांमध्ये नाचत असताना धक्का मारून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी जसप्रीतसिंग गुरुचरणसिंग बाला व अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे रा. 611 कासेवाडी, गणेश मित्र मंडळाशेजारी यांच्या विरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेली होती. गुन्हा नोंद झाल्यापासून अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे हा सात वर्षापासून फरार होता. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने पाहिजे आरोपी म्हणून त्याला घोषित केले होते. दरम्यान गुन्हे युनिट एक ने फरार आरोपीस जेरबंद केले आहे. दि. 27 जुलै 2023 रोजी युनिट 1 कडील पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार श्री. अमोल पवार व श्री. अभिनव लडकत यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, येरवडा येथील गुन्ह्यात सात वर्षांपासून फरारी असलेला आरोपी अजय उर्फ ब...
शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या भैय्यावाडीतील मटका जुगार अड्डा बंद का होत नाही… घ्या, आजच्या मटका आकड्यांच्या चिठ्ठ्या

शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या भैय्यावाडीतील मटका जुगार अड्डा बंद का होत नाही… घ्या, आजच्या मटका आकड्यांच्या चिठ्ठ्या

पोलीस क्राइम
पुणे शहर पोलिसांची सराईत गुन्हेगारांसह, गुन्हेगारी टोळ्यांना हस्ते परहस्ते आर्थिक मदत… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, तसेच नागरीकांशी वाद काढुन आपल्या टोळीचे वर्चस्व वाढावे, जनमानसात दहशत राहावी यासाठी गुन्हेगारी टोळ्या संघटीतपणे दहशतीने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता गुन्हे करीत असल्याचे निष्कर्ष पुणे शहर पोलीसांनी काढलेले आहेत. परंतु याच दहशतीचा वापर करून पुढे जाऊन मटका जुगार अड्डे, रमीचे क्लब, पणती पाकोळी सारखे सोरट, अंमली पदार्थांची विक्री, पब, हुक्का पार्लर, मसाज पार्लर, स्पा आदिंसारखे अवैध व बेकायदेशिर धंदे करून ह्याच गुन्हेगारी टोळ्या आर्थिक संपन्न होत आहेत. त्यात पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान उभे करीत आहेत. त्यामुळे पुणे शहर पोलीसांनी पुणे शहरातील खाजगी सावकारी आणि अवैधपणे सुरू असलेले मटका जुगार अड्डे तातडीने बंद करण्याची सामाजिक संघटना...
पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी धक्कादायक घटना सुसंस्कृत पुण्यात, पतीसमोरच पत्नीवर खाजगी सावकाराचा बलात्कार

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी धक्कादायक घटना सुसंस्कृत पुण्यात, पतीसमोरच पत्नीवर खाजगी सावकाराचा बलात्कार

सर्व साधारण
खाजगी सावकारी आणि अवैध धंदयातील पोलीसांच्या भागीदारीमुळेच पुणे शहरात गुन्हेगारी वाढलीसराईत गुन्हेगाराने पुण्यातील खडकीसह शिवाजीनगर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस भागीदारीत मटका जुगाराचे अड्डे सुरू केले…. नॅशनल फोरम/ पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/खाजगी सावकारी आणि मटका,जुगार अड्ड्यातील पोलीसांच्या भागीदारीमुळे पुणे शहरातील गुन्हेगारी अधिक वाढली आहे. खाजगी सावकारी, कंपनी सावकारी आणि त्याच बरोबरीने पुणे शहरात सुरू असलेले मटका, जुगार अड्डे, रमीचे क्लब यामध्ये पोलीसांची भागीदारी असल्यानेच पुणे शहरात गुन्हेगारी वेगाने वाढत आहे. गुन्हेगारांनी याच्याही पुढे एक पाऊल टाकत, पोलीसांना मारहाण करणे, पोलीस स्टेशनसह, पोलीस वसाहतीत चोरीचे प्रकार घडत आहेत.त्यातच आता पुणे शहरात बांग्लादेशी नागरीक बेकायदा वास्तव्य करीत असल्याची बाब समोर आली आहेच. शिवाय पुणे शहरात दहशतवादयांनी आश्रय घेतल्याचेही समो...
सहकारनगर पोलीस स्टेशन, कारभारी बदलला तरी कारभार सुधारण्याचे नावही नाही

सहकारनगर पोलीस स्टेशन, कारभारी बदलला तरी कारभार सुधारण्याचे नावही नाही

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सर्वाधिक शांत असलेले पोलीस स्टेशन म्हणून सहकारनगर पोलीस स्टेशनची ओळख होती. मोठ्या झोपडपट्टया असल्यातरी गुन्हेगारी किरकोळ स्वरूपाची होती. परंतु काळाच्या ओघात शांत असणारे पोलीस स्टेशन गुन्हेगारी कारवायांनी पुरते बदलुन गेले आहे. चार आत आणि 40 बाहेर अशी ख्याती सध्या सहकारनगर पोलीस स्टेशनची झाली आहे. तळजाई वसाहत, अरण्येश्वर, शंकर महाराज मठ, पद्मावती वसाहत सह सिद्धार्थ नगर दातेस्टॉप सारख्या मोठ्या झोपडपट्टया सहकारनगरकडे आहेत. परंतु लोकसंख्येची अधिक घनता असलेले धनकवडी, आंबेगाव सारख्या गावांसह पूर्वीच्या मिळकतींवर आता मोठी लोकसंख्या वाढली आहे. त्यात लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांसाठी लपण्यासाठी जागा असल्याने देखील हद्दीत गुन्हेगारी वाढली. गुन्हेगारांची आर्थिक ठिकाण देखील सहकारनगर भागात वाढली आहेत, मटका जुगार अड्डे, हातभट्टी ही मोठी ओळख निर्माण झाली आहे.वाहन...
खडकी व विश्रांतवाडीतील अपराध्यांच्या गैरकृत्यांना वरीष्ठ पोलीसांची संमती… तडीपार व रेकॉर्डवरील गुन्हेगार अवैध धंदयावर रायटर,पंटर म्हणून काम करीत असल्यास त्याचे श्रेय नेमके कुणाला…

खडकी व विश्रांतवाडीतील अपराध्यांच्या गैरकृत्यांना वरीष्ठ पोलीसांची संमती… तडीपार व रेकॉर्डवरील गुन्हेगार अवैध धंदयावर रायटर,पंटर म्हणून काम करीत असल्यास त्याचे श्रेय नेमके कुणाला…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षमतेची पराकाष्ठा करून दखलपात्र अपराधांच्या घटनेसंबंधीची किंवा असे अपराध करण्याच्या बेतासंबंधीची माहिती मिळवणे, ते वरिष्ठांकडे सादर करणे, अपराद्यांना न्यायालयासमोर आणण्यासाठी तसेच अपराधास प्रतिबंध करण्यासाठी सर्वोत्तम अशा कायदा व वरिष्ठांचे आदेश यांच्याशी सुसंगत असलेल्या उपाययोजना करणे आणि गुन्ह्याचा प्रतिबंध व अन्वेषण करण्यासंबंधी मुंबई पोलीस अधिनियमात तरतुदी आहेत. तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने पोलिसांना कायदेशीरपणे दिलेल्या प्रत्येक आदेशिकेचे तत्परतेने पालन करणे, त्याची बजावणी करणे आणि वरिष्ठांनी दिलेल्या आज्ञा सर्व कायदेशीर मार्गाने अमंलात आणणे बाबत सक्त तरतुदी आहे.तथापी खडकी व विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अपराधाचा बेत आणि प्रत्यक्ष अपराध घडत असताना देखील, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कायद्याची व वरिष्ठांच्या आदेशांची अवज्ञा केली ...
शिवाजीनगर-खडकी -विश्रांतवाडी पोलिसांच्या त्रिकुटाचा संघटित गुन्हेगारांच्या जुगार अड्ड्यात भागीदारी, सासु ड्रग माफिया तर जावई गॅम्बलर

शिवाजीनगर-खडकी -विश्रांतवाडी पोलिसांच्या त्रिकुटाचा संघटित गुन्हेगारांच्या जुगार अड्ड्यात भागीदारी, सासु ड्रग माफिया तर जावई गॅम्बलर

सर्व साधारण
पुणे पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनला गुन्हेगारी टोळ्यांनी केले ऑल आउट नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांनी ज्या गुन्हेगारी टोळ्यांना मोक्का व एमपीडीए कायदयाने कारागृहात डांबले त्याच संघटित गुन्हेगारांच्या टोळीतील सदस्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीरपणे अवैध धंदा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मागील सात दिवसात पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला कळवून देखील मागील सात दिवसांपैकी एक दिवसही कारवाई झालेले नाही. अशीच अवस्था खडकी पोलीस स्टेशन व विश्रांतवाडी पोलीस स्टेशन यांची असून या तीनही लगतच्या पोलीस स्टेशनची संघटित गुन्हेगारांनी अक्षरशः चाळणी केली असून जागोजाग सर्वसामान्यांना बक्षीस आणि पैशाचे आमिष दाखवून मटका जुगार अड्डे, पत्त्याचे क्लब, पणती पाकोळी सारखे सोरट आदि सर्व प्रकारचे जुगार अड्डे सुरू करून तीनही पोलीस स्टेशन हद...
शिवाजीनगरात पुनः सुरू झाला पोलीस भागीदारीतील मटका जुगारीचा अड्डा

शिवाजीनगरात पुनः सुरू झाला पोलीस भागीदारीतील मटका जुगारीचा अड्डा

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, पुणे शहरातील संपूर्ण पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. सर्वत्र कोंम्बिग ऑपरेशन सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजुला पोलीस उप आयुक्त संदीपसिंह गिल हे स्वतः रस्त्यावर उतरून, वाहन परवाने तपासणे, दुचाकी वाहनावरील ट्रीपल सिट असणाऱ्यांवर स्वतः कारवाई करीत आहेत, तसेच काही पोलीस स्टेशन हद्दीतील स्लम एरियात जाऊन तेथील मुले व त्यांच्या पालकांचे प्रबोधन करून व्यसनमुक्ती सारखे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. लहान मुलांचा गुन्हेगार कसे वापर करीत आहेत, मुले व्यसन कशी करीत आहेत याबाबत पालकांनी कसे जागृत असले पहिजे याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करीत आहेत. मात्र शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये मात्र भलताच कारभार सुरू असल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील भैय्यावाडी येथे पोलीस भागीदारीतील मटका...
कात्रज, भारती विद्यापीठ अवैध धंदे, गुन्हेगारी आणि बरेच काही… कळसकरांपेक्षा तीन पट अवैध धंदे आणि बेसूमार गुन्हेगारी… तरीही कुंभारांचा विजयी थाट…

कात्रज, भारती विद्यापीठ अवैध धंदे, गुन्हेगारी आणि बरेच काही… कळसकरांपेक्षा तीन पट अवैध धंदे आणि बेसूमार गुन्हेगारी… तरीही कुंभारांचा विजयी थाट…

पोलीस क्राइम
भारती विद्यापीठ मध्ये- आरटीओ-उत्पादन शुल्क-पोलीस- वाहतुक पोलीसांचे… हम साथ, साथ है… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कात्रजसह भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बोकाळल्याचे कारण सांगुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तत्कालिन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जगन्नाथ कळसकर यांच्यावर मानहानीकारक कारवाई करण्यात आली होती. सात दिवसांसाठी शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न करून त्यांचा पदभार पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. दरम्यान आज सव्वा वर्षानंतर, त्याच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत श्री. कळसकरांपेक्षा तीन पट गुन्हेगारी आणि अवैध धंदे वाढले असतांना, त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलीस आयुक्त पुढे का येत नाहीत असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत. 19 फेबु्रवारी 2022 रोजी काय घडले -कात्रजसह भारती विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याचे कारण सांगु...
पुणे पोलिसांकडून दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थाची बाजारपेठ होत आहे काय….

पुणे पोलिसांकडून दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थाची बाजारपेठ होत आहे काय….

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 व 2 यांनी मागील आठवड्यात टाकलेल्या छाप्यात सुमारे दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान गुन्हे शाखा युनिट यांनी देखील मोठी कारवाई करून सुमारे 5 लाख 19 हजार रुपयांचे चरस अंमली पदार्थासह 3 तलवार, 2 कुकरी, 1 सत्तुर, 1 कु-हाड, 1 चाकु, 1 रापी अशी बेकायदेशिररित्या हत्यारांसह सुमारे 5 लाख 72 हजार 50 रु चा माल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ पथकाचे विनायक गायकवाड यांनी तर अंमली पदार्थाविरूद्ध मोहिम उघडली आहे. मागील सहा महिन्यात सुमारे 10 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. थोडक्यात मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थांची बाजारपेठ होत चालली आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात काही घटनांचा आढावा घेतला आहे. उनजो ऑनलाईन डिलीव्हरी ॲपचा वापर करून एल.एस.ड...
पुण्यातील जनता वसाहत… अरुंद रस्ता… एकमेकांना लागला धक्का, झाली बाचाबाच… दिल्या शिव्या… चिडून जाऊन त्याने घातला डोक्यात दगड आणि केला खून,

पुण्यातील जनता वसाहत… अरुंद रस्ता… एकमेकांना लागला धक्का, झाली बाचाबाच… दिल्या शिव्या… चिडून जाऊन त्याने घातला डोक्यात दगड आणि केला खून,

पोलीस क्राइम
दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जेरबंदनॅशनल फोरम/ पुणे/ दि/ प्रतिनिधी/दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीत सुनील विठ्ठल मोरे वय 52 वर्ष रा. जनता वसाहत यांचा पहाटे कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून खून केल्या बाबत दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दत्तवाडी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट तीन यांनी तपास पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. दत्तवाडी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने केलेले तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्या बातमीदार मार्फत आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली. त्यानंतर स्थानिक घटनास्थळी उपस्थित असलेला आरोपी समीर उर्फ वीरेंद्र पांडुरंग चौरे वय-33 वर्ष रा.निलायम पुलाजवळ, पर्वती पायथा यास अटक करण्यात आली. तपासात निष्पन्न झालेला माहितीनुसार...