Friday, May 10 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Punecrime

कालचा सनवार-एैतवार- दारू मटणाचा अन्‌‍ चोरी दरोड्याचा, दारू मटणाच्या पार्टीसाठी राखुन ठेवलाय रविवार, जिकडं – तिकडं बारच्या बाहेर चोरांनी मारलिया धाड-

कालचा सनवार-एैतवार- दारू मटणाचा अन्‌‍ चोरी दरोड्याचा, दारू मटणाच्या पार्टीसाठी राखुन ठेवलाय रविवार, जिकडं – तिकडं बारच्या बाहेर चोरांनी मारलिया धाड-

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आठवड्यातील सर्वांना सुटीचा असलेला वार म्हणजे रविवार. परंतु हाच रविवार मात्र पोलीसांना शांतपणे बसू न देण्याचा देखील वार ठरत आहे. काल शनिवार व रविवारी पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत चोरी आणि दरोड्याचे प्रकार समोर आले असून, जिकडे तिकडे चोरी आणि दरोडा… पुढे काय तर घरेदारे सोडून आता भर रस्त्यावर चोर लुटारूंनी लुटालुटीचा खेळ सुरू करून पुणे पोलीसांना आव्हान दिले आहे. काल रविवारी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, येरवडा पोलीस स्टेशन व हडपसर पोलीस स्टेशन सह शनिवारी स्वारगेट, खडकी व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत भर रस्त्यावर चोरी व दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातील हॉटेल चालकांचा सविनय कायदेभंग, पोलीस मात्र कशात आहेत दंग -दुकान अधिनियम व पोलीस नियमानुसार, रात्रौ 11 वाजेपर्यंत सर्व खाजगी दुकाने ...
पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे ….आता वाजले की बारा

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे ….आता वाजले की बारा

पोलीस क्राइम
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील खून, हत्याकांड, दरोडा, घातपात, फसवणूक, देहव्यावारासह अमली पदार्थांचा खुलेआम बाजार…कोरेगाव पार्क मध्ये खुलेआम वेश्याव्यवसाय नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ब्रिटिश काळापासून ते आज पर्यंत पुण्यातील कोरेगाव पार्क हा परिसर जिल्हाधिकारी पुणे यांच्या निरीक्षणाखाली असलेला भूभाग आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालय व जिल्हाधिकारी पुणे यांच्या स्वतंत्र निरीक्षणाखाली असलेल्या कोरेगाव पार्क, कल्याणी नगर परिसरात शेकडोंच्या आसपास स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असताना. त्याच्यावर कारवाई केली जात नाही. सेक्स टुरिझम च्या नावाखाली संपूर्ण कोरेगाव पार्क हद्दीत दिवस-रात्र 24 तास देश विदेशातील मुली व महिलांचा बाजार भरविला जात असताना, त्याच्यावर कायद्यातील कठोर तरतुदींचा वापर केला जात नाही. दरम्यान मागील एक दीड वर्षात संपूर्ण...
मार्केटयार्ड, सिंहगड रोड व विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत सहा लाखापेक्षा अधिक रकमेची चोरी दरोडा

मार्केटयार्ड, सिंहगड रोड व विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत सहा लाखापेक्षा अधिक रकमेची चोरी दरोडा

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत शहरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे पुण्यातील मार्केट यार्ड पोलीस स्टेशन, सिंहगड रोड पोलीस स्टेशन व विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे 6 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची घरफोडी व दरोड्याचे प्रकार समोर आले आहेत. गुन्ह्यांची हकीकत अशी की मार्केट यार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी या गाळ्यासमोरील सार्वजनिक शौचालया बाहेर फिर्यादी व त्यांचा भाऊ मार्केट यार्ड मध्ये मध्ये माल विक्री करण्याकरिता आले होते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर लघुशंका करीत असताना जवळच झाडाखाली असलेल्या एका आरोपी इसमाने ही लघवी करण्याची जागा आहे का... येथून बाहेर जा... म्हणून मार्केटयार्ड मध्ये माल विक्री करण्याकरिता आलेल्या फिर्यादी यांना शिवीगाळ करून, हाताने मारहाण करून, त्यांच्या...
पुण्यात तडीपार गुन्हेगारांचा मुक्त संचार ,मध्यरात्रीस खेळ चाले लुटालुटीचा

पुण्यात तडीपार गुन्हेगारांचा मुक्त संचार ,मध्यरात्रीस खेळ चाले लुटालुटीचा

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार आरोपी गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून एमपीडीए व मकोका अन्वये कारवाया केल्या जात आहेत. तथापि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या आरोपी गुन्हेगारांचा पुणे शहरात मुक्तपणे संचार असल्याचे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांनी केलेल्या कारवाईवरून दिसून आलेले आहे. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील तडीपार आरोपीचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ने केला पर्दाफाश-भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत दिवसा व मध्यरात्री लुटालुटीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असेच प्रकरण 28 एप्रिल 2023 रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत घडले होते. 28 एप्रिल 2023 रोजी डीपी कलेक्शन समोर चिंतामणी ज्ञानपीठ येथील रोडवर फिर्यादी त्यांची चार चाकी वाहन पार्क करून लघुशंका करण्यासाठी थांबले ...
फुकटच्या जादा पैशाचे अमिष पुणेकरांना पडले महागात, पुण्यात 395 चा उद्रेक, 420 ही कमी नाहीत…

फुकटच्या जादा पैशाचे अमिष पुणेकरांना पडले महागात, पुण्यात 395 चा उद्रेक, 420 ही कमी नाहीत…

पोलीस क्राइम
395 मध्ये तथाकथित पत्रकार, कार्यकर्त्यांसह पोलीसांचाही सहभाग420 मध्ये खाजगी सावकार सामान्यांना गंडा घालतात, तर याच खाजगी सावकारांना शेअर मार्केट मधील लॉबी गंडा घालत आहे… पुणे/दि/ अनिरूद्ध शालण चव्हाण/पाण्यातील मासा, पाणी कधी पितो हे कुणालाच ठाऊक नसते…. लहान माश्याला मोठे मासे खातात हा निसर्ग नियम आहे…. एससी,एसटी वर ओबीसींसह प्रस्थापित सवर्ण मंडळी असंवैधानिक अत्याचार करीत असतात… अगदी तस्संच काहीस पुणेकरांचे झाले आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन नंतर, सगळे जादा पैशाच्या मागे लागले आहेत. त्यातच पुणे शहरात सध्या मटका, जुगार अड्डयांचे महाव्दार उघडले आहे. गैरकायदयाच्या मंडळींनी त्या त्या हद्दीत एकत्र येऊ गैरकायदयाची कामे वेगात सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र ज्यादा पैशाच्या अमिषाने खाजगी सावकार सर्वसामान्य किरकोळ दुकानदार, नोकरदार,गृहिणी यांच्याकडून दुप्पट, तिप्पट व्याज वसूल करीत आहे, तर हेच...
कोरेगाव पार्क मधील वेश्याव्यवसायाला पोलीसांचा वरदहस्त?

कोरेगाव पार्क मधील वेश्याव्यवसायाला पोलीसांचा वरदहस्त?

पोलीस क्राइम
सामाजिक सुरक्षा विभागाची कोरेगाव पार्क मध्ये धडक कारवाई, कलम 370 सह 3,4 व 5 अन्वये कारवाईकोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर वरीष्ठांची एवढी मर्जी कशासाठी? नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कोरेगाव पार्क सारख्या उच्चुभू्र ठिकाणी नेमकं काय चाललं आहे. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे लक्ष आहे की नाही… की या गोरख धंदयात स्थानिक पोलीसांचा वरदहस्त आहे… प्रश्न अनेक असले तरी, कोरेगाव पार्क सारख्या उच्चभू्र ठिकाणी स्थानिक पोलीसांच्या वरदहस्त खेरीज कुणीही असे धाडस करू शकणार नाहीये. कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन हद्दीत आज मसाज पार्लर व स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईवरून दिसून आले आहे. सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने कोरेगाव पार्क परिसरातील, स्पावर छापा टाकुन 3 परदेशी व दोन भारतीय अशा एकुण पिडीत मुलींची सुटका केली आहे. सा...
महिला-मुलींचा अपव्यापार करणाऱ्यांविरूद्ध पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पुढचे पाऊल, पुणे पोलीसांच्या सासुचा कलम 370 बडगा

महिला-मुलींचा अपव्यापार करणाऱ्यांविरूद्ध पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पुढचे पाऊल, पुणे पोलीसांच्या सासुचा कलम 370 बडगा

पोलीस क्राइम
वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांविरूद्ध आजीवन कारावासाची शिक्षा नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/गुन्हे करणारा आणि गुन्हे करवुन घेणाऱ्याविरूद्ध कठोर कारवाई करणारे कायदे अस्तित्वात आहेत. परंतु कायदयांच्या परिणामकारक अंमलबजावणी अभावी गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. यामुळेच संपूर्ण देशातील न्यायालयात कोट्यवधीचे कोर्ट केसेस आजही प्रलंबित आहेत. दरम्यान पोलीसांनी कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी केली तर गुन्हे करणारा आणि गुन्हे करवुन घेणाऱ्यांची गुन्हे करण्याची हिंमत होणार नाही. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सामाजिक सुरक्षा विभागाने महिला व मुलींच्या देहव्यापाराविरूद्ध मागील सप्ताहात जबरी कारवाया केल्यामुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महिला व मुलींच्या देहव्यापाराविरूद्ध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध अधिनियम अतिशय सक्षम असा कायदा आहे. त्याच बरोबर फौजदारी कायदे व भादविमधील परस्पर पु...
पुणे पोलीसांच्या सासु कडून कोरेगाव पार्क मध्ये कलम 370 वापर का होत नाही?

पुणे पोलीसांच्या सासु कडून कोरेगाव पार्क मध्ये कलम 370 वापर का होत नाही?

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने मागील सप्ताहात विमानतळ पोलीस स्टेशन व सिंहगड पोलीस स्टेशन हद्दतील मजसा पार्लर, स्पा सेंटर मध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याने त्यांच्याविरूद्ध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध अधिनियमातील कलम 3, 4 व 5 सह भादवी 370 व 34 नुसार गुन्हे दाखल करून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांविरूद्ध जबर दहशत बसविण्यात आली आहे. दरम्यान कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने मागील चार महिन्यात सुमारे 8 ते 10 ठिकाणी कारवाया करून देखील अपव्यापाराची कमी शिक्षा व कमी दंडाचे कलम लावुन आरोपींवर दयामाया का दाखविण्यात आली याबाबत सामाजिक संघटना प्रश्न विचारत आहेत. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत अनेक वर्षांपासून सेक्स टूरिझमच्या नावाखाली मोठा वेश्याव्यवसाय चालविला जात आहे. कोरेगाव पार्क, कल्याणी न...
चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ गुन्हे शाखेची धडक कारवाई, 2 कोटी 21 लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त, विनायक गायकवाड आणि टीमची मोठ्ठी कारवाई….

चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ गुन्हे शाखेची धडक कारवाई, 2 कोटी 21 लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त, विनायक गायकवाड आणि टीमची मोठ्ठी कारवाई….

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 यांनी चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील खराडी चौकातून अहमदनगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मोठ्ठी कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे 2 कोटी 21 लाख 60 हजार रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. धडक कारवाई -अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड , सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे , पोलिस अंमलदार मनोजकुमार साळुंके, मारूती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, योगेश मोहिते आणि संदेश काकडे हे चंदनगर परिसरात पेट्रोलिंग करीत होते.यावेळी पोलिस अंमलदार मनोजकुमार साळुंके आणि मारूती पारधी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातील काहीजण हे खराडी चौकातुन रक्षक नगरकडे जाणाऱ्य...
राजस्थानी लुटारूंचा पुण्यात धुमाकूळ<br>सिगारेट दुकानांवर दरोडा,<br>औषधाच्या नावाखाली दारूची तस्करी

राजस्थानी लुटारूंचा पुण्यात धुमाकूळ
सिगारेट दुकानांवर दरोडा,
औषधाच्या नावाखाली दारूची तस्करी

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधीःपुणे शहरातील कोणतीही झोपडपट्टी, कोणतीही चाळ, कोणतीही सोसायटी अशी नाही की जिथे राजस्थानी किंवा ज्यांना मारवाडी म्हणून ओळखले जाते त्यांची दुकाने नाहीत. सर्वत्र या राजस्थानी मारवाडी व्यापाऱ्यांची किराणा मालाची दुकाने, सोन्याची दुकाने, औषधांची दुकाने, धान्याची दुकाने, गुटखा तंबाखूची दुकाने, प्लास्टीक वस्तु थोडक्यात विनानाशवंत मालाची दुकाने ही सर्वच्या सर्व दुकाने राजस्थानी आणि गुजराती व्यापारांची आहेत. बहुतांश दुकानांमधून मोठा काळा बाजार होत असल्याच्या बातम्या दैनंदिन प्रसारित होत आहेत. मागील दोन दिवसात पुण्यामध्ये दोन दरोड्याच्या बातम्या पुढे आलेल्या आहेत. यामध्ये सिगारेटच्या दुकानांवर दरोडा घालून लाखो रुपयांच्या सिगारेट चोरून नेल्या आहेत. तसेच औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी मध्ये देखील राजस्थानी लुटारूंची नावे पुढे आलेली आहेत. पोलीसांनी मराठी भाषिक असले...