Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: punecpoffice

महिला-मुलींचा अपव्यापार करणाऱ्यांविरूद्ध पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पुढचे पाऊल, पुणे पोलीसांच्या सासुचा कलम 370 बडगा

महिला-मुलींचा अपव्यापार करणाऱ्यांविरूद्ध पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पुढचे पाऊल, पुणे पोलीसांच्या सासुचा कलम 370 बडगा

पोलीस क्राइम
वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांविरूद्ध आजीवन कारावासाची शिक्षा नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/गुन्हे करणारा आणि गुन्हे करवुन घेणाऱ्याविरूद्ध कठोर कारवाई करणारे कायदे अस्तित्वात आहेत. परंतु कायदयांच्या परिणामकारक अंमलबजावणी अभावी गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. यामुळेच संपूर्ण देशातील न्यायालयात कोट्यवधीचे कोर्ट केसेस आजही प्रलंबित आहेत. दरम्यान पोलीसांनी कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी केली तर गुन्हे करणारा आणि गुन्हे करवुन घेणाऱ्यांची गुन्हे करण्याची हिंमत होणार नाही. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सामाजिक सुरक्षा विभागाने महिला व मुलींच्या देहव्यापाराविरूद्ध मागील सप्ताहात जबरी कारवाया केल्यामुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महिला व मुलींच्या देहव्यापाराविरूद्ध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध अधिनियम अतिशय सक्षम असा कायदा आहे. त्याच बरोबर फौजदारी कायदे व भादविमधील परस्पर पुरक का...
पुणे पोलीसांच्या सासु कडून कोरेगाव पार्क मध्ये कलम 370 वापर का होत नाही?

पुणे पोलीसांच्या सासु कडून कोरेगाव पार्क मध्ये कलम 370 वापर का होत नाही?

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने मागील सप्ताहात विमानतळ पोलीस स्टेशन व सिंहगड पोलीस स्टेशन हद्दतील मजसा पार्लर, स्पा सेंटर मध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याने त्यांच्याविरूद्ध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध अधिनियमातील कलम 3, 4 व 5 सह भादवी 370 व 34 नुसार गुन्हे दाखल करून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांविरूद्ध जबर दहशत बसविण्यात आली आहे. दरम्यान कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने मागील चार महिन्यात सुमारे 8 ते 10 ठिकाणी कारवाया करून देखील अपव्यापाराची कमी शिक्षा व कमी दंडाचे कलम लावुन आरोपींवर दयामाया का दाखविण्यात आली याबाबत सामाजिक संघटना प्रश्न विचारत आहेत. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत अनेक वर्षांपासून सेक्स टूरिझमच्या नावाखाली मोठा वेश्याव्यवसाय चालविला जात आहे. कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, व...
अटक टाळण्यासाठी पोलीसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलीसांनी केले जेरबंद

अटक टाळण्यासाठी पोलीसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/खडक पोलीस स्टेशन येथे संघटीत गुन्हेगारी कायदयाखालील आरोपी कुमार लोंढे हा अटक टाळण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून पोलीसांना गुंगारा देऊन पळत होता. परंतु कानुन के हाथ बहोत लंबे होते है, याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. नागरीकांमध्ये हवेत हत्यार फिरवुन भाईगिरीची नशा चढलेल्या लोंढे यास खडक पोलीसांनी अखेर जेरबंद केले आहे. सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता यादव यांच्या टिमने अथक प्रयत्न करून अखेर गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. भाईगिरीतून गुन्हेगारीचा कैफ चढला-तु मंदारकडे पैसे का दिले नाहीस ? “ तुला लय माज आला आहे का ? असे म्हणुन उमेश वाघमारे व कुमार लोंढे यांनी मिळून फिर्यादीस हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. उमेश वाघमारे याने तेथे जवळच पडलेले खोरे घेवून ते जोरजोरात हवेत फिरवून तेथील नागरिकांचे मनात दहशत निर्माण करण...
पोलीस आयुक्तालयातील प्रेस रूमवर आयुक्तालयाचे नियंत्रण नाही, प्रेसरूमला पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची आवश्यकता

पोलीस आयुक्तालयातील प्रेस रूमवर आयुक्तालयाचे नियंत्रण नाही, प्रेसरूमला पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची आवश्यकता

पोलीस क्राइम
pune cp office press room पुणे शहर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे वृत्त पुणे पोलीस वेबसाईट वरून प्रसारित करण्यास एका महिन्यात दहा वेळा खंड नॅशनल फोरम/पुणे/दि/पुणे शहरातील सर्व पोलीस ठाणे, गुन्हे शाखेच्या सर्व युनिट तसेच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी, सराईत गुन्हेगारांसह गुन्हेगारी डोळ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईची तसेच पकडण्यात आलेल्या अट्टल आरोपींची माहिती वृत्तपत्रांना पोहोचवून पुणे शहरामध्ये गुन्हेगारांवर धाक निर्माण करणे व पुणेकर नागरिकांना कायद्याच्या राज्याचा विश्वास निर्माण करण्याकरिता, गुन्हेगारावरील कारवाईची माहिती नोंदणीकृत वृत्तपत्रांसह खाजगी वृत्तवाहीया व इतर माध्यमांकडे प्रसिद्धीसाठी पाठविले जाते. तसेच सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे युनिट कडून आलेल्या प्रेसनोट वर संस्करण अर्थात एडिटिंग करून, संबंधित बातम्या वृत्तपत्रांकडे पाठवण्याचे काम पुणे शहर पोली...
पोलीस पत्नीचा दुर्देवी मृत्यू आणि पुणे शहरातील पोलीसांच्या प्रशासकीय सोईच्या वजनदार बदल्या

पोलीस पत्नीचा दुर्देवी मृत्यू आणि पुणे शहरातील पोलीसांच्या प्रशासकीय सोईच्या वजनदार बदल्या

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मुंबई पोलीस दलात कर्तव्यावार असतांना अपघाती मृत्यू झालेल्या झालेल्या पोलीसाच्या मृत्यूची चौकशी करावी यासाठी पोलीस पत्नीने सरकारकडे दाद मागितली परंतु, सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. शेवटी पोलीस पतीला न्याय मिळावा म्हणून त्या माऊलीने मंत्रालया समोर विष प्राशन करून मायबाप शासनाचे लक्ष वेधले. परंतु उपचारादरम्यान पोलीस पत्नीचा मृत्यू झाला. महिलांचा कैवार घेणाऱ्या एकाही राजकीय पक्षाने किंवा त्यांच्या महिला आघाड्या किंवा महिला आयोगाने देखील याची दखल घेतली नाही. सामाजिक राजकीय संघटनांनी साधे निवेदनही दिले नाही. इतकी अस्पृश्यता इथे पाळली गेली आहे. न्यायासाठी पोलीस आणि पोलीस पत्नीला जीव गमवावा लागला. यात सरकार पर्यंत आवाज पोहोचला नाहीच. आणि राजकीय पक्ष, संघटना यांच्या सह माध्यमांनी देखील याकडे साफ दुर्लक्ष करावे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. याच ठिकाणी पो...
पुणे शहराला व्हॉटसॲप चॅटींग आणि हनीट्रॅपचा विळखा

पुणे शहराला व्हॉटसॲप चॅटींग आणि हनीट्रॅपचा विळखा

पोलीस क्राइम
लैंगिक उत्तेजना होणारा दाखविला व्हिडीओ, नग्न होण्यास पडले भाग… मग काय… झाले स्क्रीन रेकॉर्डिंग आणि गमाविले साडेचार लाख… वकीलाकडून बलात्काराची केस करण्याची धमकी, व्यावसायिकाला 17.50 लाखाला गंडा,ॲड. विक्रम भाटे व निधी दिक्षित यांच्याविरूद्ध हडपासर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/व्हॉटसॲप वरून फोन चॅटींग करून ओळख वाढवायची, चॅटींग करायचे, मग अश्लिल व्हिडीओ पाठवायचा, लैंगितक उत्तेजना वाढवायची पुढे नग्न होण्यास भाग पाडायचे, त्याच्याही पुढे स्वतःच्या फ्लॅटवर बोलावून घ्यायचे, फोटोंसह अश्लिलतेचा बाजार मांडायचा पुढे मग ब्लॅकमेलिंगला सुरूवात… घाबरून लाखो रुपयांना चुना… पुढचा रस्ता पोलीस स्टेशनचा… बस्सा बोंबलत…पुणे शहरात सध्या हनी ट्रॅपचे प्रकार सर्रास वाढले आहेत. दरम्यान सायबर क्राईम करणाऱ्यांचा धंदा अगदी तेजित आला आहे. पोलीसांकडून वारंवार सुचना देऊन देखील नागरीक...
गुन्हेगार आणि भांडवलदारांचा बंडगार्डन पोलीस स्टेशनवर कब्जा,<br>कोणत्याही क्राईम ब्रॅंचची बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत कुठल्याही प्रकारची कारवाई नाहीच…

गुन्हेगार आणि भांडवलदारांचा बंडगार्डन पोलीस स्टेशनवर कब्जा,
कोणत्याही क्राईम ब्रॅंचची बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत कुठल्याही प्रकारची कारवाई नाहीच…

पोलीस क्राइम
bandgardenpolicepune ज्यांच्या हद्दीत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा न्यायाधिश असतांना देखील पोलीस स्टेशनवर नेमका कब्जा कोणी केला आहे…. पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पोलीस स्टेशनवर ग्रेनेडचा हल्ला… शासकीय कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले आहे…शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आतंकवादयांनी निर्दयीपणे गोळीबार केला… इत्यादी.. इत्यादी बातम्या जम्मु व काश्मिरबाबत कुण्या ऐकेकाळात येत होत्या. आता मात्र सुसंस्कृत पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस स्टेशनवर गुन्हेगारांसह भांडवलदारांनी कब्जा केला आहे असे म्हटले तर आश्यर्च वाटायला नको… ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान बंडगार्डन पोलीस स्टेशनची अशी स्थिती असली तरी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात वेगवेगळ्या प्रकारच्या 25/30 गुन्हे शाखा कार्यरत असतांना, त्या क्राईम ब्रॅंचने देखील बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत घुसून का...
ओशो रजनिश आश्रम आंदोलकांवर कोरेगाव पार्क पोलीसांच्या लाठीमाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी,<br>कोरेगाव पार्क मध्ये देशविदेशातील महिलांकरवी सुरू असलेला देहव्यापार

ओशो रजनिश आश्रम आंदोलकांवर कोरेगाव पार्क पोलीसांच्या लाठीमाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी,
कोरेगाव पार्क मध्ये देशविदेशातील महिलांकरवी सुरू असलेला देहव्यापार

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumदेशातील पुणे शहरात एकमेव असलेल्या ओशो रजनिश आश्रमावर कोरेगाव पार्क पोलीसांनी बेछुट केलेल्या लाठीमारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बदनामी झाल्याची प्रतिक्रिया अनेक आंदोलकांनी दिली आहे. ओशो रजनिश आश्रमावर विदेशी नागरीकांचा कब्जा, ओशो जमिन विक्री प्रकरण आणि त्यावरील आंदोलनामुळे हा विषय चर्चेत आलेला आहे. दरम्यान कोरेगाव पार्क हा संपूर्ण परिसर जिल्हाधिकारी पुणे यांच्या अधिनस्थ असतांना, आंदोलनकांवर लाठीमार करण्याची परवानगी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून घेतली होती किंवा कसे याबाबत देखील आता विचारणा होत आहे. दरम्यान कोरेगाव पार्क परिसरात देशी विदेशी महिलांकरवी मोठ्या प्रमाणात देहव्यापाराचे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेक्स टुरिझम व महिलांच्या अपव्यापाराचे केंद्र झाल्याने, ही परिस्थिती हाताळण्यात कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक व...
दरोड्याच्या गुन्ह्यातून जामीनावर सुटून ड्रग्जची तस्करी करणाऱ्याला अटक, 4 लाख 24 हजाराचा 21 किलो गांजा जप्त

दरोड्याच्या गुन्ह्यातून जामीनावर सुटून ड्रग्जची तस्करी करणाऱ्याला अटक, 4 लाख 24 हजाराचा 21 किलो गांजा जप्त

पोलीस क्राइम
crime u02cppune पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumदरोडयाच्या गुन्हयातुन नुकताच जामीनावर सुटलेला व अंमली पदार्थाच्या तस्करीत सक्रिय असणाऱ्या गुन्हेगाराला 4 लाख 24 हजार रुपयाच्या 21 किलो 200 ग्रॅम गांजासह केले अंमली पदार्थ विभाग क्र. 2 ने जेरबंद करून त्याच्या विरूद्ध वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आयुक्त, श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता तसेच अंमली पदार्थाच्या होणा-या तस्करीवर निर्बंध घालण्याकरीता आदेश दिले होते. त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, सहा. पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर व स्टाफ वानवडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, विशाल दळवी यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम पुणे वानवडी येथील हुतात्मा ...
सामाजिक सुरक्षा विभागाची विमानतळ, हडपसरसह कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत धडक कारवाई,

सामाजिक सुरक्षा विभागाची विमानतळ, हडपसरसह कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत धडक कारवाई,

पोलीस क्राइम
sscellpune शिवाजीनगरात कारवाईसाठी जाणिवपूर्वक दिरंगाई कोण करीत आहे…. पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumपुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा यांनी विमानतळ, हडपसर पोलीस स्टेशनसह कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व बेकायदेशिर मटका जुगार अड्डयांवर कारवाई केली आहे. तीन पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाईत एकुण 1 लाख 88 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच एकुण 36 इसमांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत दळवी हॉस्पीटलसह इंडिया बुल्स कंपनीजवळील झोपडपट्टीत सुरू असलेल्या मटका जुगार अड्डा, पत्ता क्लबवर कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच शिवाजीनगरातील कारवाई करण्यास पोलीस विभागातील काही कर्मचारी जाणिपूर्वक दिरंगाई करीत असल्याचा आरोप होत आहे. जुगार अड्डयावर छापा टाकुन 24 जणांवर ...