Thursday, March 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: punecpoffice

हाय प्रोफाईल मॉल मध्ये चोरी करणाऱ्या अनु वेदप्रकाश शर्मा राहणार दिल्ली या महिलेस केले जेरबंद

हाय प्रोफाईल मॉल मध्ये चोरी करणाऱ्या अनु वेदप्रकाश शर्मा राहणार दिल्ली या महिलेस केले जेरबंद

पोलीस क्राइम
Phoenix Market City, Vimannagar विमानतळ पोलीस स्टेशन व गुन्हे युनिट 4 चा समांतर तपास… पुणे/दि/ नॅशनल फोरम/पोटासाठी चोरी करणारे अनेकांनी पाहिले आहेत. एवढच कशाला पारधी समाजासह अनेक इतर जमातीमधील इसमांनी पोटासाठी चोरी केल्याने त्यांना जीव जाईपर्यंत जबरी मारहाण केली आहे. मक्याचे कणीस, कुठ वडापाव, कुठ शेताच्या बांधावरील ऊस चोरून खाल्ला म्हणून जबर मारहाण करून जीव गेल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. परंतु स्वतःच्या चैनीकरीता हायप्रोफाईल चोरी करणारे मात्र शोधूनही सापडत नाहीत. दरम्यान विमानतळ पोलीस व गुन्हे युनिट क्र. 4 यांनी समांतर तपास करून एका हाय प्रोफाईल महिला अनु वेदप्रकाश शर्मा हीला अटक करण्यात आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, दि. 5 मार्च 2023 रोजी सायंकाळी एका अनोळखी महिलेने ब्ल्यु स्टोन शॉप नंबर जी-29. लोअर ग्राउन्ड फ्लोअर, फिनिक्स मार्केटसिटी, विमाननगर, पुणे या दुकान...
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत लागोपाठ 3 जबरी गुन्हे, 11 गुन्हेगार, एकासही अटक नाही,<br>शून्य तपासावरील एक शून्य शून्य

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत लागोपाठ 3 जबरी गुन्हे, 11 गुन्हेगार, एकासही अटक नाही,
शून्य तपासावरील एक शून्य शून्य

पोलीस क्राइम
Yerwada police जबरी गुन्ह्यात येरवडा पोलीस स्टेशनचा शून्य तपास - येरवड्यात गांधी जयंतीलाही ड्राय डे नसतो हे विशेष… हातभट्टी-जुगार अड्डे जोमात- सर्व गुन्हे शाखा कोमात… पुणे/दि/ नॅशनल फोरम/येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत लागोपाठ तीन जबरी गुन्हे घडले असल्याची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धी केलेल्या वृत्तात नमूद केले आहे. येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. 173, 175 व 176 असे सलग तीन जबरी गुन्हे दाखल झाले आहेत. एकुण 11 आरोपी असून त्यांना अद्याप पर्यंत अटक करण्यात आली नाही. गुन्हा रजि. क्र. 173 नुसार रितीक अगरवाल यांना येरवडा गावठाण येथे टोळक्याने जबरी मारहाण केली असून त्यांचे दुकान व जाळुन फायरिंग करण्याची धमकी दिली आहे. दुसऱ्या गुन्ह्यात (गु.रजि.क्र. 175 ) आेंकार देसाई या फिर्यादीच्या वडीलांना शास्त्रीनगरच्या चौकात ट्रॅव्हल बसने ठोकरल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, तर तिसऱ्या गुन...
चंदननगर पोलीसांची दमदार कारवाई, दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना केले जेरबंद

चंदननगर पोलीसांची दमदार कारवाई, दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना केले जेरबंद

पोलीस क्राइम
chandannagar police पुणे/दि/ नॅशनल फोरम/पोलीस स्टेशन हद्दीत घडलेले गुन्हे आणि त्यांचा तपास ही एक किचकट बाब ठरत आहे. त्यातच स्थानिक पोलिसांना वेगवेगळ्या कामगिरी व बंदोबस्तावर नेमणूक केल्यानंतर, गुन्ह्याच्या तपासासाठी वेळेचे नियोजन करावे लागते. पोलीस स्टेशनकडून कामगिरी करण्यात दिरंगाई झाल्यास, इतर गुन्हे शाखांकडे त्यांचा तपास दयावा लागतो ही एक नित्याची प्रशासकीय प्रक्रिया असली तरी चंदननगर पोलीसांनी देखील हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा कसुन तपास करुन, दोन्ही प्रकरणांतील आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. एका गुन्ह्यात दोन वर्षापासुन पोक्सो व बलात्काराच्या गुन्हयामध्ये ओडीसा येथे फरार असलेल्या आरोपीस बेड्या ठोकल्या असून, दुसऱ्या गुन्ह्यात चंदनाची चोरी करून फरार आरोपीस अटक करून त्याने केलेल्या चार गुन्ह्यांची उकल करण्यात चंदननगर पोलीसांना यश आले आहे. दोन वर्षापासुन पोक्सो व बलात्काराच्या गुन्...
आंबेडकरनगरात गोळीबार, मार्केटयार्ड पोलीसांनी 24 तासाच्या आत आरोपी संतोष कांबळेच्या मुसक्या आवळल्या

आंबेडकरनगरात गोळीबार, मार्केटयार्ड पोलीसांनी 24 तासाच्या आत आरोपी संतोष कांबळेच्या मुसक्या आवळल्या

पोलीस क्राइम
marketyard police पुणे/दि/ नॅशनल फोरम/छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड गुलटेकडी येथील आंबेडकरनगर वसाहत ही मुळातच गोरगरीब, कष्टकरी, हमाल व मजुरीवर काम करणाऱ्यांची वसाहत म्हणून ओळखली जाते. याच वसाहतीत संतोष वामन कांबळे, वय 35 वर्षे, रा. आंबेडकरनगर, गल्ली नं. 11, मार्केटयार्ड पुणे याने आंबेडकरनगर परीसरात पिस्तुलाने गोळीबार करुन फिर्यादीस जिवे मारण्याचा प्रयत्न करून फरार झाला होता. याबाबत मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असल्याने, पुणे शहर पोलीसांकडील गुन्हे शाखेच्या यंत्रणांनी जंगजंग पछाडले असता, आरोपीचा शोध लागत नव्हता. दरम्यान वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनघा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिताराम गायकवाड व त्यांच्या टिमने अतिशय शिताफीने आरोपीला अटक केले आहे. अवघ्या 24 तासात मार्केटयार्ड पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आंबेडकरनगरात गोळीबार करून फरार झालेल्या ...
सामाजिक सुरक्षा विभागाची विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत अर्धवट कारवाई? खडकी अणि विमानतळ यांना सवलतीच्या दरात जुगार अड्डयांना परवानगी?

सामाजिक सुरक्षा विभागाची विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत अर्धवट कारवाई? खडकी अणि विमानतळ यांना सवलतीच्या दरात जुगार अड्डयांना परवानगी?

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत सध्या मटका, जुगार अड्डे, सोरट, पणती पाकोळी सारखे धंदे सुरू असून, त्याच बरोबरीने हातभट्टी, देशी विदेशी दारूची भर रस्त्यावर खुलेआम विक्री केली जात असल्याची बातमी नॅशनल फोरम मध्ये प्रकाशित केली होती. तसेच विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीक अतिशय गरीब व मध्यमवर्गीय समाजघटकातील आहेत. विशेषतः बौद्ध व वडार समाज संख्येने जास्त असून इतर समाज त्यांच्या खोलोखाल आहे. शांतीनगर, राजीव गांधी नगर, एकता नगर, भिमनगर, वडारवाडी, फुले नगर, पंचशिल नगर या मोठ्या घनतेच्या लोकसंख्या असलेल्या स्लम विभागात अवैध धंदे सुरू असतांना, सामाजिक सुरक्षा विभाग कारवाई करीत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने 17 फेब्रुवारी रोजी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील वडार वस्ती येथील जुगार अड्डयावर कारवाई करून सुमारे 16 इसमांना...
शिवाजीनगरातल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करायला पुण्यातील पोलीस का घाबरतात

शिवाजीनगरातल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करायला पुण्यातील पोलीस का घाबरतात

पोलीस क्राइम
shivajinagarpolice पोलीस आयुक्त कार्यालयातील गैरमहसुली अंमलदारांमुळे खात्याची बदनामी? पुणे/दि/ नॅशनल फोरम/केंद्र व राज्य शासनाची व्हीआयपी व महत्त्वाची कार्यालय असलेल्या तसेच शिमला ऑफिस ते राजभवन पर्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या शिवाजीनगर हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यास पोलीस घाबरत आहेत का असा सवाल पुणे महानगरपालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये आलेले रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक विचारू लागले आहेत. दळवी हॉस्पीटल, हॉस्पीटलचा रस्ता, तेथील गाड्या, भोसले जलतरण तलाव, गार्डन, गॅरेज, जिथं तिथं जुगाराच्या चिठ्ठया लिहणारे ठायी ठायी बसले आहेत. लोकांची गर्दी होत आहे. सगळीकडे गुटखा खाऊन पचापच थुंकून घाण केली जात आहे. असे सर्वत्र चित्र असतांना पोलीस मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट अशा मनःस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. भारतीच्या विजय कुंभारांचे महान तत्वज्ज्ञान आणि गैरकायदयाचे कृत्य ...
सामाजिक सुरक्षा विभागाची 12 अ ची कारवाई आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांचं आर्थिक पुर्नवसन करणारी अर्थनिती

सामाजिक सुरक्षा विभागाची 12 अ ची कारवाई आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांचं आर्थिक पुर्नवसन करणारी अर्थनिती

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumपुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण पुणे शहरात मटका जुगार अड्डयांवर कारवाया होत असल्याच्या बातम्या नियमित येत असतांना, ज्यांच्यावर कारवाई झाले ते धंदे देखील पुनः तासा/दोन तासात सुरू होत आहेत. तर नवीन पोलीस आयुक्तांच्या भीतीने बंद पडलेले अवैध मटका जुगार अड्डे देखील पुनः नव्याने सुरू झाले आहेत. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगाराचं आर्थिक पुर्नवसन करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. दरम्यासन पुणे शहरात 10 हजार 973 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुमारे 12 टोळ्यांमधील 75 गुन्हेगारांवर मकोका दाखल करण्यात आला आहे. तसेच 4 गुन्हेगार स्थानबद्ध केले असून 43 सराईत गुन्हेगारांना तडीपार करून पुणे शहरात दशहत निर्माण करणाऱ्या व सक्रिय गुन्हेगारांवर कडक प्रतिबंध कारवाई करण्याचे धोरण पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी...
पुण्यात पोलीसांपेक्षा गुन्हेगारांची संख्या दुप्पट… 29 हजार 218 गुन्हेगारांचे आर्थिक सोर्स काय?

पुण्यात पोलीसांपेक्षा गुन्हेगारांची संख्या दुप्पट… 29 हजार 218 गुन्हेगारांचे आर्थिक सोर्स काय?

पोलीस क्राइम
पुणे शहरात 10 हजार 973 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई…12 टोळ्यांमधील 75 गुन्हेगारांवर मकोका.. तरीही… मध्यरात्रीच्या 6 तासात पुनः 521 गुन्हेगार मिळून आले… पुणे शहरात गुन्हेगारांची संख्या नेमकी किती आहे.. गुन्हेगारी टोळ्या किती कार्यरत आहेत. गुन्हेगारी टोळ्यांमध्ये प्रत्येकी किती गुन्हेगार आहेत…पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ऑल आऊट व कोम्बिंग ऑपरेशन गुन्हेगार चेकींग गुन्हेगार आदान - प्रदान दत्तक गुन्हेगारया योजना राबवुन 1. गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करणे 2. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, 3. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालणे अशी सर्व उपाय योजना केली तरी प्रत्येक चेकींग वेळी गुन्हेगारांची संख्या नेमकी कशामुळे वाढत आहे…. पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/50 लाख लोकसंख्येच्या पुणे शहरात एकुण किती गुन्हेगार आहेत… किती गुन्हेगारी टोळ्या कार्यरत ...
गुन्ह्यांचा धावता आढावा,आजचे पोलीस स्टेशन कोंढवा पोलीस स्टेशन,वानवडी पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1, पोलीस उपआयुक्त मुख्यालय, पोलीस भरती

गुन्ह्यांचा धावता आढावा,आजचे पोलीस स्टेशन कोंढवा पोलीस स्टेशन,वानवडी पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1, पोलीस उपआयुक्त मुख्यालय, पोलीस भरती

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/आज दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजीपर्यंत पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा देण्यात आला आहे. आजचे पोलीस स्टेशन कोंढवा पोलीस स्टेशन,वानवडी पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1, पोलीस उपआयुक्त मुख्यालय, पोलीस भरती यांचा समोवश आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाँटेड आरोपीस पकडले23 लाख 26 हजाराचा “कोकेन“ ड्रग्ज हस्तगत पुणे/दि/ नॅशनल फोरम/पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार व पोलीस सह आयुक्त, पुणे शहर. श्री. संदिप कर्णिक यांनी पुणे शहरामध्ये फेब्रुवारी मध्ये साजरा होणा-या महाशिवरात्री शिवजयंती. संभाव्य व्हि.व्हि.आय.पी. व्यक्तींचे दौरे तसेच कसबा विधानसभा पोट निवडणुकीच्या अनुषंगाने दि. 15/02/2023 रोजी 21/00 वा ते दि. 16/02/2023 रोजी 02/00 वा पर्यंत ऑलआऊट / कोंबिंग ऑपरेशन राबविणे बाबत आदेश दिलेले होते. त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी ...
गरीबांना लुटायचे आणि गुन्हेगारांना पोसायचे… रेकॉर्डवरील गुन्हेगाराचं शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत आर्थिक पुर्नवसन

गरीबांना लुटायचे आणि गुन्हेगारांना पोसायचे… रेकॉर्डवरील गुन्हेगाराचं शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत आर्थिक पुर्नवसन

पोलीस क्राइम
इन्फॉरर्मेशन टेक्नोलॉजीचा भंग करून तथाकथित सरकारमान्य लॉटऱ्यांचा धुमाकूळ पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात 10 हजार 973 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुमारे 12 टोळ्यांमधील 75 गुन्हेगारांवर मकोका दाखल करण्यात आला आहे. तसेच 4 गुन्हेगार स्थानबद्ध केले असून 43 सराईत गुन्हेगारांना तडीपार करून पुणे शहरात दशहत निर्माण करणाऱ्या व सक्रिय गुन्हेगारांवर कडक प्रतिबंध कारवाई करण्याचे धोरण पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी अवलंबविले असतांना, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका सराईत गुन्हेगाराचे आर्थिक पुर्नवसन केले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण पुणे शहरात मटका जुगार अड्डयांवर कारवाया होत असल्याच्या बातम्या नियमित येत असतांना, ज्यांच्यावर कारवाई झाले ते धंदे देखील पुनः तासा/दोन तासात सुरू होत आहेत. तर नवीन पोल...