Monday, March 3 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: punecitypolice

स्वारगेट -पर्वती मधील सर्वच गैरकायदयाचे धंदे आजही सुरू कसे… पोलीसांकडून पुण्यात गैरकायदयाचा कारभार…?

स्वारगेट -पर्वती मधील सर्वच गैरकायदयाचे धंदे आजही सुरू कसे… पोलीसांकडून पुण्यात गैरकायदयाचा कारभार…?

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीसांकडून गुन्हेगारीचे उदात्तिकरण सुरू आहे काय, पुणे शहर पोलीस हे गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय, गुन्हेगारीला जात किंवा धर्म नसतो, परंतु पकडण्यात आलेले, तडीपार केलेले, मोक्का व एमपीडीए सर्वाधिक संख्येने लावलेले आरोपी गुन्हेगार हे दलित, आदिवासींसह ओबीसी समाजाचेच कसे… त्यातल्या त्यात अनु.जातीतील बौद्ध, मातंग व पारधी समाजाची संख्या अधिक कशी होत आहे, असे प्रश्न घेवून 2 ऑक्टोंबर ( म. गांधी जयंतीपासून) अभियान सुरू केले आहे. तसेच इजी अर्थात सहज पैसे मिळणारे अवैध व बेकायदेशिर धंदयाबाबत बातमी प्रकाशित केल्यानंतर, त्यात स्वारगेट व पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील गैरकायदयाच्या कृत्यांचा पंचनामा प्रसारित करण्यात आला. तथापी मागील 10 दिवसात दोन्ही पोलीस स्टेशन मधील एकही मटका जुगार अड्डा, रमीचे क्लब, खाजगी सावकारी, देहव्यापार, बिल्डर लॉबीसह गोल्ड माफिया, गु...
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील भाईगिरी जोरात, आधी कोयते, मग तलवारी आता तर कुऱ्हाडीच…

सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील भाईगिरी जोरात, आधी कोयते, मग तलवारी आता तर कुऱ्हाडीच…

पोलीस क्राइम
हातभट्टी क्रमांक 1 वर, मटका जुगार अड्डे दुसऱ्या क्रमांकावर, गुटखा-गांजा तस्करी तिसऱ्यावर तर देह व्यापार चौथ्यावर, कमालिची गुन्हेगारी वाढली तरीही सहकारनगर पोलीस गप्प नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत मोठ मोठ्या झोपडपट्टया असल्या किंवा पुरग्रस्तांच्या वसाहती असल्या तरी, जबरी गुन्हेगारीचा इतिहास नाही. पुण्यातील काही मोजक्या पोलीस स्टेशनला जबरी गुन्हेगारीचा इतिहास आहे, तसा तो सहकारनगर पोलीस स्टेशनला नाही. मात्र अलिकडच्या काळात कमालिची गुन्हेगारी वाढली आहे. दोन महिन्यांपूर्वी अण्णाभाऊ साठेनगर अरण्येश्वर मधील काही युवकांनी वनशिव वस्ती, तळजाई येथे येऊन राडा घातला, वाहनांची जाळपोळ केली, तर पुनः तळजाई वसाहतीतील तरुणांनी तिसऱ्या ठिकाणी जावून राडा घातला. दोन्हीही टोळक्यांवर मागाहून मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु तरीही गुन्हेगारी वेगाने वाढत आहे. काल-परवा गणे...
चौका-चौकात मटक्याचे अड्डे- गल्ली बोळात हातभट्टीचे धंदे – चला पुणेकरांनो, तुम्हाला बातमीतुन पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत फिरवून आणतो – चला मारा किक… …ऽऽ….

चौका-चौकात मटक्याचे अड्डे- गल्ली बोळात हातभट्टीचे धंदे – चला पुणेकरांनो, तुम्हाला बातमीतुन पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत फिरवून आणतो – चला मारा किक… …ऽऽ….

पोलीस क्राइम
पर्वती पोलीस स्टेशन कडुन पुणे शहराला गांज्यासोबत गुन्हेगारांची निर्मिती व पुरवठा,चौका-चौकात मटक्याचे अड्डे, जनता वसाहतीतील प्रत्येक बोळात हातभट्टीचे धंदे हद्दीत हजारो गुन्हेगार, शेकडो मोक्का, शेकडो एमपीडीए, शेकडो तडीपार नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी गुन्ह्यांमध्ये, पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यातच अर्ध्या पुण्याला दरदिवसाकाठी पुरेल एवढा गांज्याचा मोठा स्टॉक पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत असल्याचे समोर आले आहे. पुणे शहरात कुठेही हातभट्टी भेटत नसली तरी जनता वसाहत आणि पाणमळ्यात हत्तीच्या हत्ती भरून मिळतात… थोडक्यात पर्वती पोलीस स्टेशनने पुण्यातील 30/35 पोलीस ठाण्यांवर अतिक्रमण केले असून, जाईन त्या गुन्हेविषयक क्षेत्रात पर्वती पोलीस स्टेशनचा अव्वल क्रमांक लागत आहे. त्यामुळे सर्वाधिक गुन्हेगार, सर्...
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनच्या नावाने स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जुगाराचा क्लब

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनच्या नावाने स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जुगाराचा क्लब

सर्व साधारण
एक पोलीस स्टेशन 2 पोलीस चौक्या, एक एस.टी.स्टँड अन्‌‍ खंडीभर मटक्याचे अड्डे -जोडीला ठेवले 3 जुगाराचे क्लबनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/जुन्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कुण्या एका इसमाने बादशहा औरंगजेबाचे स्टेटस मोबाईलवर ठेवल्याने, छत्रपती संभाजी नगर (जुने औरंगाबाद) जिल्ह्यात दंगल पेटली, त्याचे लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले. त्यात अहमदनगरसह कोल्हापुरात देखील दंगली पेटल्या. पुढे बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र पेटविणाऱ्यांविरूद्ध रणशिंग फुंकले. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन सर्वांना शांततेचे आवाहन केले. तेंव्हा कुठे दंगली शांत झाल्या. परंतु पोलीसांनी महाराष्ट्र पेटविणाऱ्यांविरूद्ध कुठेही कारवाई केली नाही. आज पुणे शहरातील स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतही कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनचे स्टेटस ठेवून लाईन बॉयच्या नावाने जुगाराचा क्लब मागील एकदीड महिन्यांपासून सुरू आहे. तरी देखील पुणे पोलीस कारवाई करीत नाहीत. ए...
पुणे शहर पोलिसांकडून गुन्हेगारीचे उदत्तीकरण

पुणे शहर पोलिसांकडून गुन्हेगारीचे उदत्तीकरण

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी मकोका या कायद्याअंतर्गत आतापर्यंत 65 गुन्हेगारांवर व त्यांच्या टोळक्यांवर कारवाई करण्यात आलेल आहे. तसेच एमपीडीए अंतर्गत 50 पेक्षा अधिक गुन्हेगारांवर कारवाया करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान तत्कालीन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी गुन्ह्यांची आकडेवारी प्रथमच सुरू केली. त्यात मोक्का व एमपीडीएच्या किती कारवाया केल्या याचे जाहीर प्रगटन करणे सुरू केले. त्यांनी त्यांच्या दोन वर्षाच्या कालावधीत मोक्का व एमपीडीएचे प्रत्येकी शतक पूर्ण केले आहे. सध्या कार्यरत असलेले पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत शतक गाठले आहे. पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता व श्री. रितेश कुमार यांच्यापूर्वी मागील 50 वर्षाचा रेकॉर्ड पाहिला असता कोणत्याही पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने अशा प्रकारे किती, कुठे, ग...
गणेशोत्सवापूर्वी पुणे शहरात लुटा-लूट, कोंढवा, शिवाजीनगर, स्वारगेट व लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत लुटीच्या घटना

गणेशोत्सवापूर्वी पुणे शहरात लुटा-लूट, कोंढवा, शिवाजीनगर, स्वारगेट व लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत लुटीच्या घटना

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने कोंबिंग ऑपरेशन केले. त्यात शेकडो गुन्हेगार डिटेक्ट करण्यात आले. असे असताना देखील पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अधिनस्त असलेल्या बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी, लुटालुटीचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. कोंढवा पोलीस स्टेशन -कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील एक 47 वर्षीय नागरिक रा- कोंढवा खुर्द हे कौसरबाग मज्जिद कोंढवा येथे, दोन अनोळखी इसमांनी आपसात संगनमत करून 47 वर्षीय नागरिका जवळ येऊन त्यांना आम्ही पोलीस असल्याचे सांगून, एक ओळखपत्रासारखे असणारे कार्ड फिर्यादीस दाखवून त्यांच्या सोबत अरबी भाषेत बोलून फिर्यादी यांच्याकडे 4000 डॉलर (भारतीय चलनाप्रमाणे 3 लाख 20 हजार रुपये) रोख रक्कम तपासणीसाठी मागून फसवणूक करून घेऊन गेले आहेत. कोंढवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे अधिक तपास करीत आह...
अखेर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या विजय कुंभारांची विशेष शाखेत बदली,देशी विदेशी दारूचा महापुर अजुनही थांबेना, विनायक गायकवाड दारूच्या महापुराचा बंदोबस्त करणार काय?

अखेर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या विजय कुंभारांची विशेष शाखेत बदली,देशी विदेशी दारूचा महापुर अजुनही थांबेना, विनायक गायकवाड दारूच्या महापुराचा बंदोबस्त करणार काय?

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ (वृत्तविश्लेषण)राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट या आशयाची बातमी चार दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्यानंतर, राज्य उत्पादन शुल्क विभागाने कात्रज भागात पाहणी केल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार यांची बदली केली आहे, त्यांच्या जागी आता अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सुपर हीरो श्री. विनायक गायकवाड यांची नियुक्ती केली आहे. श्री. कुंभार यांची बदली विशेष शाखेत करण्यात आली आहे. त्याच बरोबर बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी अनिल सातपुते यांची अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 मध्ये बदली करण्यात आली आहे. सामाजिक स...
दहशत निर्माण करून पोलिस कारवाई टाळण्यासाठी पलायन करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, खडक मध्ये 54 वी तर शिवाजीनगरात 55 वी मोक्का कारवाई

दहशत निर्माण करून पोलिस कारवाई टाळण्यासाठी पलायन करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, खडक मध्ये 54 वी तर शिवाजीनगरात 55 वी मोक्का कारवाई

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांकडून अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्व व नागरीकांमध्ये दहशत कायम ठेवण्यासाठी सातत्याने गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. दरम्यान या गुन्हेगारी टोळ्यांवर संघटीत गुन्हेगारी कायदयासह एमपीडीए व तडीपारीचे शस्त्र पुणे पोलीसांकडून उगारण्यात आले आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार व सहपोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णि यांनी काल खडक पोलीस स्टेशन हद्दीतील शेडगे टोळीवर 54 वी कारवाई केली तर आज शिवाजीनगरात यल्ल्या कोळानट्टी टोळीविरूद्ध 55 वी मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारी नियंत्रणांवर बारकाईने लक्ष देवून शरीराविरूद्ध व मालमत्तेविरूद्ध गुन्हे करणारे व पुणेकर नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पुणे शहरातून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठ...
मामा आणि मामुची जमली जोडी, पर्वतीला लावली- जुगाराची गोडी,अहो दाजीबा, गावात होईल शोभा हे वागणं बरं नव्हं

मामा आणि मामुची जमली जोडी, पर्वतीला लावली- जुगाराची गोडी,अहो दाजीबा, गावात होईल शोभा हे वागणं बरं नव्हं

पोलीस क्राइम
पोलीस आयुक्त रितेश कुमारांची 53 वी मकोका कारवाईत पर्वती पोलीस स्टेशनने बाजी मारलीवरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडेंचे अक्षम्य दुर्लक्ष नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/दिवाळीत उडवण्यात येणारी शोभेच्या दारूच्या फटाकड्या तयार करण्याचे काम दक्षिण भारतात घराघरात आणि प्रत्येक गल्लीबोळात काम करणारे लोक आढळून येतात, पुण्याच्या दक्षिण भागातही घराघरात आणि गल्लीबोळात वेगवेगळ्या डाळींचे पापड लाटण्याचे काम केले जाते. पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी, चतुःश्रृंगी, बिबेवाडी, वारजे माळवाडी इत्यादी पोलीस स्टेशन हद्दीत घराघरात आणि गल्लीबळात हातभट्टी निर्मिती केली जाते. तस्सं जुन्या दत्तवाडी व अत्ताच्या पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील जनता वसाहत या महाकाय झोपडपट्टीमध्ये घराघरात आणि गल्लीबोळात गुन्हेगार तयार केले जात आहेत, निर्माण होत आहेत. थोडक्यात गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना म्हणून किंवा सरावलेले गुन्हेगा...