Thursday, May 9 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: #punecitypolice

पुणे शहर पोलीसः वरीष्ठ पोलीस निरीक्षक बदली- 2024, निवडणूकीची पार्श्वभूमी आणि ललित पाटील प्रकरणानंतर शहरांतर्गत प्रथम मोठ्या बदल्या, शुक्रवारी 15 तर सोमवारी 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे शहर पोलीसः वरीष्ठ पोलीस निरीक्षक बदली- 2024, निवडणूकीची पार्श्वभूमी आणि ललित पाटील प्रकरणानंतर शहरांतर्गत प्रथम मोठ्या बदल्या, शुक्रवारी 15 तर सोमवारी 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सार्वत्रिक निवडणूका आणि ललित पाटील प्रकरणांतर पुणे शहर पोलीस आयुक्तालयात प्रथम मोठ्या बदल्या केल्या आहेत. शुक्रवार दि. 12 जानेवारी रोजी सुमारे 15 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. त्यानंतर काल मकरसंक्रातीचे दिवशी सोमवार दि.15 जानेवारी रोजी सुमारे 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. दरम्यान शुक्रवार दि. 12 जानेवारी रोजीच्या बदली आदेशात अंमली पदार्थ विरोधी पथक 1 व 2 मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची अक्षरशः बोळवण करण्यात आली असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान काही अधिकारी फिल्डवर फिट असतात तर काही अधिकारी हे दरबारी कामातच तरबेज असतात. पुण्यात ललित पाटील प्रकरण झाल्यानंतर विनायक गायकवाड यांची बदली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आता काही महिन्यानंतर पुन्हा त्यांची बदली दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक क्र. 1 येथे करण्...
समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील एमपीडीएतील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत, कारवाईत क्राईम युनिटच्या पोलीसावर हात उगारला, समर्थ पोलीस हे विसरले काय…

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील एमपीडीएतील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत, कारवाईत क्राईम युनिटच्या पोलीसावर हात उगारला, समर्थ पोलीस हे विसरले काय…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/मटका जुगार अड्डयावर पोलीसांनी कारवाई केली, म्हणून पोलीसांवर हात उगारणाऱ्या मटका अड्डयाच्या मालकाला पोलीसांनी तडीपारीची का करू नये अशी नोटीस काढली… मग काय… त्याने सहायक पोलीस आयुक्त फरासखान्याला दरदिवशी 10 प्रदक्षिणा घालण्याचा उपक्रम सुरू केला. पुढे एमपीडीएची तरतुद ठेवण्यात आली. तेंव्हा तर देवाला जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या नसतील तेवढ्या प्रदक्षिणा फरासखाना इमारतीला घातल्या. पुढे कारवाई नाममात्र करून, मोठी कारवाई संस्थगित ठेवण्यात आली आणि आता पुनः समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत नव्याने धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली आहे. भिमनगराकडे जाणाऱ्या ऑईलच्या दुकानापासून ते पॉवर हाऊसपर्यंत त्याने रान पेटवुन ठेवले आहे. सगळीकडे गप्पाही गप्पामय वातावरण निर्माण झाले आहे. जागोजाग रायटर आणि पंटरचा धुमाकुळ सुरू आहे. एवढी मेहेरबानी समर्थ पोलीस स्टेशन आणि पुणे शहर पोलीसांनी का केली ...
खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील मोक्का, एमपीडीए व तडीपारीतील गुन्हेगारांना पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत

खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील मोक्का, एमपीडीए व तडीपारीतील गुन्हेगारांना पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत

पोलीस क्राइम
खडकी पोलीस आणि पाटील इस्टेट झोपडपट्टी म्हणजे मटका, जुगार अड्डे आणि अंमली पदार्थांची बाजारपेठ… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/(वृत्तविश्लेषण)पुणे शहरात सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्याच्या प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या उद्देशाने काल खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील अजमेर शेख वय 22 वर्ष रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी शिवाजीनगर पुणे येथील गुन्हेगारावर 78 वी एमपीडीए कायदयानुसार कारवाई करण्यात आली आहे. अजमेर शेख याच्या विरूद्ध मागील 5 वर्षात एकुण 4 गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच त्याने त्याच्या साथीदारांसह खूनाचा प्रयत्न, घातक हत्याराने दुखापतीसह जबरी चोरी, गंभीर दुखापत, खंडणी, दंगा, बेकायदेशिर हत्यार बाळगणे या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले असल्याने त्याच्यावर एमपीडीए नुसार कारवाई करून त्याची रवानगी नागपुर कारागृहात केल्याचे पुणे शहर पोलीसांकडून 2 जानेवारीच्या प्रसिद...