Thursday, December 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: pune news

शिवाजीनगरातल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करायला पुण्यातील पोलीस का घाबरतात

शिवाजीनगरातल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करायला पुण्यातील पोलीस का घाबरतात

पोलीस क्राइम
shivajinagarpolice पोलीस आयुक्त कार्यालयातील गैरमहसुली अंमलदारांमुळे खात्याची बदनामी? पुणे/दि/ नॅशनल फोरम/केंद्र व राज्य शासनाची व्हीआयपी व महत्त्वाची कार्यालय असलेल्या तसेच शिमला ऑफिस ते राजभवन पर्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या शिवाजीनगर हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यास पोलीस घाबरत आहेत का असा सवाल पुणे महानगरपालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये आलेले रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक विचारू लागले आहेत. दळवी हॉस्पीटल, हॉस्पीटलचा रस्ता, तेथील गाड्या, भोसले जलतरण तलाव, गार्डन, गॅरेज, जिथं तिथं जुगाराच्या चिठ्ठया लिहणारे ठायी ठायी बसले आहेत. लोकांची गर्दी होत आहे. सगळीकडे गुटखा खाऊन पचापच थुंकून घाण केली जात आहे. असे सर्वत्र चित्र असतांना पोलीस मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट अशा मनःस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. भारतीच्या विजय कुंभारांचे महान तत्वज्ज्ञान आणि गैरकायदयाचे कृत्य -...
सामाजिक सुरक्षा विभागाची 12 अ ची कारवाई आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांचं आर्थिक पुर्नवसन करणारी अर्थनिती

सामाजिक सुरक्षा विभागाची 12 अ ची कारवाई आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांचं आर्थिक पुर्नवसन करणारी अर्थनिती

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumपुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण पुणे शहरात मटका जुगार अड्डयांवर कारवाया होत असल्याच्या बातम्या नियमित येत असतांना, ज्यांच्यावर कारवाई झाले ते धंदे देखील पुनः तासा/दोन तासात सुरू होत आहेत. तर नवीन पोलीस आयुक्तांच्या भीतीने बंद पडलेले अवैध मटका जुगार अड्डे देखील पुनः नव्याने सुरू झाले आहेत. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगाराचं आर्थिक पुर्नवसन करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. दरम्यासन पुणे शहरात 10 हजार 973 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुमारे 12 टोळ्यांमधील 75 गुन्हेगारांवर मकोका दाखल करण्यात आला आहे. तसेच 4 गुन्हेगार स्थानबद्ध केले असून 43 सराईत गुन्हेगारांना तडीपार करून पुणे शहरात दशहत निर्माण करणाऱ्या व सक्रिय गुन्हेगारांवर कडक प्रतिबंध कारवाई करण्याचे धोरण पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी अवलं...
पुण्यात पोलीसांपेक्षा गुन्हेगारांची संख्या दुप्पट… 29 हजार 218 गुन्हेगारांचे आर्थिक सोर्स काय?

पुण्यात पोलीसांपेक्षा गुन्हेगारांची संख्या दुप्पट… 29 हजार 218 गुन्हेगारांचे आर्थिक सोर्स काय?

पोलीस क्राइम
पुणे शहरात 10 हजार 973 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई…12 टोळ्यांमधील 75 गुन्हेगारांवर मकोका.. तरीही… मध्यरात्रीच्या 6 तासात पुनः 521 गुन्हेगार मिळून आले… पुणे शहरात गुन्हेगारांची संख्या नेमकी किती आहे.. गुन्हेगारी टोळ्या किती कार्यरत आहेत. गुन्हेगारी टोळ्यांमध्ये प्रत्येकी किती गुन्हेगार आहेत…पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ऑल आऊट व कोम्बिंग ऑपरेशन गुन्हेगार चेकींग गुन्हेगार आदान - प्रदान दत्तक गुन्हेगारया योजना राबवुन 1. गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करणे 2. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, 3. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालणे अशी सर्व उपाय योजना केली तरी प्रत्येक चेकींग वेळी गुन्हेगारांची संख्या नेमकी कशामुळे वाढत आहे…. पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/50 लाख लोकसंख्येच्या पुणे शहरात एकुण किती गुन्हेगार आहेत… किती गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहेत…...
गुन्ह्यांचा धावता आढावा,आजचे पोलीस स्टेशन कोंढवा पोलीस स्टेशन,वानवडी पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1, पोलीस उपआयुक्त मुख्यालय, पोलीस भरती

गुन्ह्यांचा धावता आढावा,आजचे पोलीस स्टेशन कोंढवा पोलीस स्टेशन,वानवडी पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1, पोलीस उपआयुक्त मुख्यालय, पोलीस भरती

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/आज दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजीपर्यंत पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा देण्यात आला आहे. आजचे पोलीस स्टेशन कोंढवा पोलीस स्टेशन,वानवडी पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1, पोलीस उपआयुक्त मुख्यालय, पोलीस भरती यांचा समोवश आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाँटेड आरोपीस पकडले23 लाख 26 हजाराचा “कोकेन“ ड्रग्ज हस्तगत पुणे/दि/ नॅशनल फोरम/पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार व पोलीस सह आयुक्त, पुणे शहर. श्री. संदिप कर्णिक यांनी पुणे शहरामध्ये फेब्रुवारी मध्ये साजरा होणा-या महाशिवरात्री शिवजयंती. संभाव्य व्हि.व्हि.आय.पी. व्यक्तींचे दौरे तसेच कसबा विधानसभा पोट निवडणुकीच्या अनुषंगाने दि. 15/02/2023 रोजी 21/00 वा ते दि. 16/02/2023 रोजी 02/00 वा पर्यंत ऑलआऊट / कोंबिंग ऑपरेशन राबविणे बाबत आदेश दिलेले होते. त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक 1...
गरीबांना लुटायचे आणि गुन्हेगारांना पोसायचे… रेकॉर्डवरील गुन्हेगाराचं शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत आर्थिक पुर्नवसन

गरीबांना लुटायचे आणि गुन्हेगारांना पोसायचे… रेकॉर्डवरील गुन्हेगाराचं शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत आर्थिक पुर्नवसन

पोलीस क्राइम
इन्फॉरर्मेशन टेक्नोलॉजीचा भंग करून तथाकथित सरकारमान्य लॉटऱ्यांचा धुमाकूळ पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात 10 हजार 973 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुमारे 12 टोळ्यांमधील 75 गुन्हेगारांवर मकोका दाखल करण्यात आला आहे. तसेच 4 गुन्हेगार स्थानबद्ध केले असून 43 सराईत गुन्हेगारांना तडीपार करून पुणे शहरात दशहत निर्माण करणाऱ्या व सक्रिय गुन्हेगारांवर कडक प्रतिबंध कारवाई करण्याचे धोरण पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी अवलंबविले असतांना, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका सराईत गुन्हेगाराचे आर्थिक पुर्नवसन केले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण पुणे शहरात मटका जुगार अड्डयांवर कारवाया होत असल्याच्या बातम्या नियमित येत असतांना, ज्यांच्यावर कारवाई झाले ते धंदे देखील पुनः तासा/दोन तासात सुरू होत आहेत. तर नवीन पोलीस आय...
गुन्ह्यांचा धावता आढावा, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन व कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी गुन्ह्यांचा समावेश

गुन्ह्यांचा धावता आढावा, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन व कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी गुन्ह्यांचा समावेश

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/आज दि. 15 फेब्रुवारी रोजीपर्यंत घडलेल्या गुन्ह्यांचा धावता आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये सिंहगड रोड पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन व कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी गुन्ह्यांचा समावेश आहे. मी पारावरचा भाई आणि 1000 रुपये लुटून नेई…पुणे/दि/सिंहगड रोड पोलीस स्टेशन/वैभव बोराडे हा 28 वर्षे युवक रात्री 11030 च्या सुमारास सिंहगड रोडवरील ज्ञानोबा नगर येथे मोटर सायकल वरून घरी जात असताना, आरोपी आदित्य रोहिदास रांजणे व 19 वर्ष रा. चरवड वस्ती वडगाव बुद्रुक 2) गणेश पांडुरंग चोरगे वय 23 वर्ष रा. मोरे यांची बिल्डिंग, म्हसोबा मंदिराजवळ, वडगाव बुद्रुक यांनी मी पारावरचा भाई आहे … मला तुझ्याकडील पैसे दे असे म्हणून फिर्यादी वैभव बोराडे याला लोखंडी हत्याराचा धाक दाखवून, धमकी देऊन, शिवीगाळ व मारहाण करून त्यांच्याकडे रोख एक हजार रुपये जबरदस्...
पुणे शहरातील मटका- जुगार अड्डयावर सामाजिकच्या भरत जाधवांची भरधाव कारवाई,

पुणे शहरातील मटका- जुगार अड्डयावर सामाजिकच्या भरत जाधवांची भरधाव कारवाई,

पोलीस क्राइम
एकाच दिवशी लोणी काळभोर व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत मटका जुगार अड्डयावर मॅरेथान कारवाई तर,दुसऱ्या दिवशी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत स्पा वेश्यालयावर छापा पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेतील नो फिल्डवर्क झोन मधुन भरत जाधव यांनी सामाजिक सुरक्षा विभागा सारख्या ग्राऊंड फिल्डवर्क असलेला पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्या दिवसापासूनच पुणे शहरातील मटका जुगार अड्डयांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. एका एका दिवशी दोन/दोन ठिकाणी छापासत्र सुरू आहे. धडाधड जुप्रकाचे 12 अ नुसार कारवाया सुरू आहेत. समाजविघातक आरोपींची नावे प्रसिद्धीपत्रकाव्दारे जाहीर न करता, त्यांना गोपनिय ठेवून पोलीस स्टेशनच्या हवाली केले जात आहे. दरम्यान कारवाया सुरू असल्या तरी धंदे मात्र बंद होत नाहीत एवढे मात्र दिसून येत आहे. याच सामाजिक सुरक्षा विभागातील तत्कालिन पोलीस अधिकारी राजेश पुराणिक या...
पुण्यात खाजगी सावकारांचा उच्छाद

पुण्यात खाजगी सावकारांचा उच्छाद

पोलीस क्राइम
30 हजाराच्या कर्जावर 73 हजाराचे मुद्दल व्याज, तर 45 हजार रुपयांच्या कर्जावर 1 लाख 9 हजार रुपयांची पठाणी वसुली,पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात कोयता गँगचा उच्छाद… कोयता गँग रस्त्यावर उतरली.. पोलीसांसहित सर्व मिडीया कोयता .. कोयता म्हणून ओरडत असतांना, आम्हीच प्रथम कोयता गँगचा बोलविता धनी खाजगी सावकार असून, त्यांच्या जो पर्यंत मुसक्या आवळल्या जात नाहीत, तो पर्यंत कोयता माफीया शांत बसणार नाही. शेवटी माथाडी आणि खाजगी सावकारांचा प्रश्न पुन्हा एैरणीवर आला आहे. फायनांशिअल कंपन्यांची वसुली करणारे देखील कोयतामाफीयाच असून, त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. विश्रामबाग पोलीसांनी एका खाजगी सावकारावर गुन्हा दाखल केला असून त्याच्या पठाणी वसुलीची हकीकत खालील प्रमाणे आहे. कोंढवे धावडे येथे राहणाऱ्या एका 28 वर्षीय इसमाने आरोपी कैलास कडू वय 354 रा. हिंगणे खुर्द याच्...
मार्केटयार्ड म्हणजे शस्त्रे आणि गुन्हेगारांचा अड्डा आहे काय…पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलीसांनी केले जेरबंद

मार्केटयार्ड म्हणजे शस्त्रे आणि गुन्हेगारांचा अड्डा आहे काय…पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस क्राइम
पुणे/दि/national forum/आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड पुण्याचा नावलौकिक आहे. त्याच मार्केटयार्डात चाकू, सुऱ्या, कोयते पकडण्यात आले होते. आता त्याच मार्केटयार्डात अवैधरित्या पिस्तुल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले आहे. मार्केटयार्ड म्हणजे शस्त्रे, मार्केटयार्ड म्हणजे गुन्हेगारांचा अड्डा असे काहीसे चित्र सध्या दिसत आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अंमलदार आशिष यादव यांना खबर मिळाली की, मार्केटयार्डातील गोल बिल्डींग जवळ एक इसम उभा असून त्याच्याकडे अवैधरित्या पिस्तुल आहे. त्याच्या हातातून कोणतातरी गंभिर गुन्हा घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्केटयार्ड पोलीस स्टेशनकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती ए.व्ही. देशपांडे व पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती सवित ढमढेरे यांना ही बाब सांगुन कारवाईबाबतच्या सुचना मिळाल्या. ...
टूरिस्ट व्हिसावरील महिलांकडून पुण्यात वेश्याव्यवसाय

टूरिस्ट व्हिसावरील महिलांकडून पुण्यात वेश्याव्यवसाय

पोलीस क्राइम
पुणे/वृत्तविश्लेषण/national forumभारतात टूरिस्ट अर्थात पर्यटन व्हिसावर आलेल्या महिलांनी पुणे शहरातील मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील परकीय नागरीक नोंदणी शाखा यांनी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका खाजगी मसाज पार्लरमध्ये छापा टाकुन संबंधित महिलांना पकडून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले आहे. पुणे शहर पोलीसांनी आजपर्यंत ज्या ज्या मसाज पार्लर स्पावर छापे मारले आहेत, त्या त्या सर्व ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले आहे. शेकडो मुली व महिलांना पकडून सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. तरी देखील आजही पुणे शहरात शेकडोने नव्हे तर हजारोंनी मजसा पार्लर व स्पा सेंटर सुरू आहेत. बहुतांश मसाज पार्लर व स्पा मध्ये मोठ्या संख्येने वेश्याव्यवासाय सुरू असल्याचे दिसून येत आहे. वेगवगळ्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित...