
पुण्यात खुन करून पश्चिम बंगाल मध्ये पळुन गेलेल्या आरोपीस,थेट बंगालमध्ये जावून भारती विद्यापीठ पोलीसांनी ठोकल्या बेडया
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/खुन झालेला इसम मूळचा बिहारचा… खुन करणारा पश्चिम बंगालचा…तपास पुण्यासह पश्चिम बंगालमध्ये… हावडा रेल्वे स्टेशनवर खुनी सापडला… बंगाल मधील गोलाबारी पोलीस स्टेशन, हावडा येथून आरोपीस अटक… सर्व कथानक एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच आहे. परंतु महत्वाचे म्हणजे खुन झालेला इसम व खुनी इसम याची कोणतीही माहिती या भागात नव्हती. परंतु भारती विद्यापीठ पोलीसांनी खुन झालेला इसम व खुनी इसम याचा माग काढत… खऱ्या आरोपीस जेरबंद केले त्याची ही हकीकत…
दि. 10 फेब्रुवारी 2025 रोजी रात्रौ साडेबारा वाजता 28 तोरणा मोहर विल्डिंग, चिंतामणी चौकाजवळ आंबेगाव पठार पुणे येथील बांधकाम चालू असलेल्या साईटच्या पहील्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक 104 मध्ये कोणीतरी अज्ञान इसमाने सदरचे अनोळखी इसमास, कोणत्यावरी अज्ञात कारणावरुन, कोणत्यातरी हत्याराने, त्याचे डोक्यात मारून, त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून के...