Wednesday, June 17 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: pune city

मध्यवर्ती पुण्यातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात फरासखाना पोलीसांना यश

मध्यवर्ती पुण्यातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात फरासखाना पोलीसांना यश

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/अप्पा बळवंत चौक ते मंडई, मडई ते शनिवारवाडा, अप्पा बळवंत चौक ते रेडलाईट एरिया या संपूर्ण दाट लोकसंख्येच्या भागावर सीसीटीव्हीची नरज असली तरी पुणे शहरातील उपपोलीस आयुक्तालय असलेले फरासखाना इमारतीतील पोलीस आणि ज्या गुन्हेगारांचा इथे सतत राबता असतो, त्याच फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर हदीत 12 फेबु्रवारी श्री भारतीय इलेक्ट्रानिक्स नावाचे दुकानाचे शटर उचकटुन सुमारे 1 लाख 25 रूपयांच्या इलेक्ट्रीकल पॉलीकॅब वायर चोरी झाल्याचा गुन्हा घडला होता. सीसीटीव्ही, पोलीस आणि सराईत गुन्हेगारांच्या नजरेखाली चोरी झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. तथापी फरासखाना पोलीसांनी देखील प्रयत्नांची पराकष्टा करीत चोरट्यांना अटक करण्यात यश मिळाले आहे. फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत प्रभारी प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी व पोलीस अमंलदार य...
स्वारगेट मध्ये बंदूकीतून गोळीबार, हवेत हत्यारे फिरविली, बिबवेवाडीत मर्डर, खडकीत हत्यारे उगारली, बाणेरमध्ये हाडच मोडले !

स्वारगेट मध्ये बंदूकीतून गोळीबार, हवेत हत्यारे फिरविली, बिबवेवाडीत मर्डर, खडकीत हत्यारे उगारली, बाणेरमध्ये हाडच मोडले !

पोलीस क्राइम
! नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था इतकी सक्षम आणि भक्कम आहे की, कोणताही गुन्हा करतांना, कोणत्याही सर्वसामान्य नागरीकाला, आरोपीला किंवा गुन्हेगाराला पोलीसांची भितीच राहिली नाही. गुन्हा केला तरी काही दिवसात आपण जेलच्या बाहेर येणारच असा पक्का विश्वास संबधितांच्या मनांत उभा राहिला आहे की काय अशी शंका उपस्थित होत आहे. पुणे पोलीसांच्या भक्कम सुव्यवस्थेवर, गुन्हे करणारांनी, सक्षमपणे शिक्कामोर्तब केल्याचे आजच्या गुन्हेगाडी घडामोडींवरून दिसून येत आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील मिनाताई ठाकरे या झोपडपट्टीत चार विधीसंघर्षित बालकांनी पिस्टलने हवेत गोळीबार करून तसेच हत्यारे हवेत फिरवून आम्हीच इथले भाई आहोत असे मोठ मोठ्याने आरडा ओरडा करून या भागात चांगलीच दशहत निर्माण केली आहे. स्वारगेट पोलीसांनी या चार विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्या...
पुण्यामधील अल्पवयीन आणि नवतरूणांमध्ये भाईगिरीची नशा विकोपाला पोहोचली, हाणामारी, कापाकापी, तोडातोडी… आणि लुटालुट…?

पुण्यामधील अल्पवयीन आणि नवतरूणांमध्ये भाईगिरीची नशा विकोपाला पोहोचली, हाणामारी, कापाकापी, तोडातोडी… आणि लुटालुट…?

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील अल्पवयीन आणि नवतरूणांमध्ये भाईगिरीची नशने कौर्याचे टोक गाठले आहे. आजच्या दैनंदिन गुन्हेगारी वृत्तामध्ये सहकारनगर पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन, कोंढवा पोलीस स्टेशन व लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीनांसह नवतरूणांनी किरकोळ कारणांवरून हाणामारी व शस्त्राने मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर चंदननगर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, विश्रामबाग पोलीस स्टेशन, लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन, व लोहगाव पोलीस स्टेशन येथे चोरी व सोनसाखळी चोरीच्या व दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यात चाललय तरी काय… पोलीसांचा धाक राहिलाय की नाही असाच प्रश्न निर्माण होत आहे. 1) सहकारनगर पोलीस स्टेशन- अल्पवयीन बालकांमध्ये लाथाबुक्क्या आणि लोखंडी हत्याराने मारहाणसहकारनरग पोलीस स्टेशन हद्दीत प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या पाठीमागे, धनकवडी येथे संध्याकाळी साडेपाच ...
पुण्याच्या बुधवार पेठेत पुणे पोलीसांचे छापासत्र, पुण्याचे पोलीस आयुक्त फरासखान्यात…? नेमकं घडतय तरी काय….?

पुण्याच्या बुधवार पेठेत पुणे पोलीसांचे छापासत्र, पुण्याचे पोलीस आयुक्त फरासखान्यात…? नेमकं घडतय तरी काय….?

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ ANIRUDDHA SHALAN CHAVANपुणे शहर पोलीस आयुक्तपदी अमितेश कुमारांनी पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच महिन्यात सुमारे 8 हजार कोटींचे एमडी हे अमंली पदार्थ जप्त करून दमदार पदार्पण केले होते. त्यानंतर गुन्हेगारांची परेड झाली. पुढे त्या कारवाई नंतर मागील दीड वर्षात कोणतेही उल्लेखनिय कामगिरी झाल्याचे दिसत नसले तरी, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचा कालावधी पूर्ण होण्याच्या कालावधीत पुणे शहरात पुन्हा दमदार कामगिरी बजाविली जात आहे. 10 फेब्रुवारी रोजीचे कोंम्बिग ऑपरेशन फसल्यानंतर आता पुन्हा फरासखाना व खडक पोलीसांच्या संयुक्त कारवाईत सुमारे 11 बांगला देशी महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यातच पुण्यामध्ये कित्येक पोलीस आयुक्तांनी कामकाज केल्यानंतर देखील त्यांनी कधीच फरासखाना इमारतीत कधीच पाऊल ठेवले नाही. तसे पाहता कित्येक पोलीस आयुक्तांनी पुण्याच्या मध्यवर्ती फरासखाना इमारत...
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर युनिट 3 ची कामगिरी, तीन गावठी पिस्टल सह 12 जीवंत काडतुसासह रेकॉर्डवरील आरोपीस अटक

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर युनिट 3 ची कामगिरी, तीन गावठी पिस्टल सह 12 जीवंत काडतुसासह रेकॉर्डवरील आरोपीस अटक

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्यात 19 जानेवारी रोजी साजरी होत असलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर गुन्हे शाखा युनिट तीनने दमदार कामगिरी केली असून खुनासारख्या गंभिर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीस जेरबंद केले असून त्याच्याकडून सुमारे 3 गावठी पिस्टलसह 12 जिवंत काडतुसे जप्त केली आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन व नांदेड सिटी पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमंलदार किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे यांनी कामगिरी केली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,दि. 18 रोजी गुन्हे शाखा, युनिट 3 चे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अमंलदार मारुती पारधी, नितीन जगदाळे, कैलास लिम्हण, किशोर शिंदे, तुषार किंद्रे, पुरषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे असे वरिष्ठांच्या आदेशाने आगामी शिवजंयती उत्सवाच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने अवैध धंदे, मोक्का पा...
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या शीतल वाकडे यांची कार्यकर्त्यांना आरेरावी, गनिमा कावा संघटनेतर्फे मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे वाकडे यांच्याविरूद्ध फिर्याद दाखल!

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या शीतल वाकडे यांची कार्यकर्त्यांना आरेरावी, गनिमा कावा संघटनेतर्फे मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे वाकडे यांच्याविरूद्ध फिर्याद दाखल!

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील अप्पर,सुपर व शेळके वस्ती येथील ड्रेनेज चेंबर फुटून त्यातील मैला-पाणी नागरिकांच्या घरात घुसत असल्याने व सर्वत्र दुर्गंधी पसरून डास, मच्छर यांचा उपद्रव वाढला होता. दरम्यान ड्रेनेज चेंबरची तातडीने दुरूस्ती करण्याबाबतचे निवेदन गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक महापालिका आयुक्त शितल वाकडे यांना देण्यासाठी गेले होते. तथापी निवेदन घेऊन गेल्यानंतर त्यांना अतिशय उर्मट उत्तरे देऊन त्यांच्याबरोबर अरेरावी केल्याची घटना बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालय येथे घडलेली आहे. तसेच दलित नागरी वस्तीमध्ये असा प्रकार घडत असल्याने त्याबाबतचे निवेदन घेऊन गेलेल्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे. नेमकी वस्तुस्थिती काय आहे-बिबेवाडी क्षेत्रीय कार्...
धनकवडीतील राजमुद्रा सोसायटीत हुक्का पार्लर, अवैध हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलीसांची कारवाई, जागा मालकासह 4 जणांना अटक

धनकवडीतील राजमुद्रा सोसायटीत हुक्का पार्लर, अवैध हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलीसांची कारवाई, जागा मालकासह 4 जणांना अटक

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल पवार यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर, पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना हद्दीत पेट्रोलिंग करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच श्री. विठ्ठल पवार देखील वेळोवेळी हद्दीत पेट्रोलिंग करीत असतात. सोमवार दि. 9 रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत गस्त घालत असतांना, उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या राजमुद्रा सोसायटीत बेकायदेशिरपणे हुक्का पार्लर सुरू असल्याची खबर मिळाल्यानंतर, तातडीने विनापरवाना सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई करून जागेच्या मालकासह चौघांना अटक करून त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,सहकारनगर पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार दि. 9 फेब्रुवारी रोजी नियमित असे सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, गुलाबनगर चौकात...
पुणे शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाने पुन्हा डोके वर काढले,अवैध धंदे पुर्णपणे बंद नव्हते, परंतु पोलीसांची जरब होती…

पुणे शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाने पुन्हा डोके वर काढले,अवैध धंदे पुर्णपणे बंद नव्हते, परंतु पोलीसांची जरब होती…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागपुरहून पुण्यात आल्यानंतर, लगोलच पुण्यातील गुन्हेगारांची परेड घेवून, सर्व गुन्हेगारांचे चेहरे पुणेकर नागरीकांना दाखविण्यात आले. आमचे तत्कालिन क्राईम एसीपी गुन्हेगारांना कॅमेऱ्यापुढे कसे दम देत होते, हे देखील पुणेकरांनी त्यावेळी पाहिले आहे. गुन्हेगारांची वरात काढल्यामुळे सगळे अवैध धंदे पटापट बंद होतील, गुन्हेगारी संपुष्टात येईल असे भाकीत केली गेली. परंतु पोलीस आयुक्त दोन वर्षांचा कालावधी पूर्ण करीत आले आहेत. तरी देखील पुणे शहरातून अवैध धंदे बंद झाले नाहीत किंवा मसाज पार्लर आणि स्पा च्या नावे सुरू असलेला वेश्याव्यवसाय देखील बंद झाला नाही. पूर्वी अवैध धंद्यावर कारवाया होत नव्हत्या, किंवा झाल्या तरी पोलीस आयुक्तालयातून अधिकृत बातमी येत नव्हती. आता मात्र अवैध धंदयावर कारवाया होवू लागल्या व त्याच्या अधिकृत बातम्या देखील बाह...
शिवाजीनगर येथे सराईत गुन्हेगारांकडुन देशी बनावटीचे चार पिस्टल व पाच जिवंत काडतुसे जप्त

शिवाजीनगर येथे सराईत गुन्हेगारांकडुन देशी बनावटीचे चार पिस्टल व पाच जिवंत काडतुसे जप्त

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेकडील खंडणीविरोधी पथक 2 चे पोलीस अधिकारी व पोलीस अंगलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगकामी व गोपनीय माहिती काढुन गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपीतांचा शोध घेण्याचे काम करीत असतात. दरम्यान पेट्रोलिंग करीत असतांना, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व प्रशांत शिंदे यांना गोपनिय बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी रोहित दुर्गेश धर्माधिकारी, हा शिवाजीनगर ज्ञानेश्वर पादुका चौक पुणे येथे येणार आहे व तो जवळ अग्निशस्त्र बाळगतो. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने शिवाजीनगर येथे 1) रोहित दुर्गेश धर्माधिकारी, वय 24 वर्षे रा. प्रियदर्शननगर जुनी सांगवी शेवट बस स्टॉप पुणे व त्याचा मित्र 2) अभिषेक राजु टेंकल, वय 23 वर्षे रा. विष्णु कृपानगर, जुने शिवाजीनगर बस स्टैंड मागे, शिवाजीनगर पुणे यांना पोलीस स्टाफ...
मिळकत करात 5 टक्के सवलत फुकटात पदारात पाडून घेण्यासाठी, बोगस खाजगी संस्थांच्या बनावट पत्रांमुळे पुणे महापालिकेचे बुडाले कोट्यवधी रुपये

मिळकत करात 5 टक्के सवलत फुकटात पदारात पाडून घेण्यासाठी, बोगस खाजगी संस्थांच्या बनावट पत्रांमुळे पुणे महापालिकेचे बुडाले कोट्यवधी रुपये

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत घरे, बंगले, सोसायट्यांनी त्यांच्याच आवारात सोलर, रेन वॉटर हार्वेस्टिंग व व्हर्मीकल्चर कंपोस्टींग प्रकल्प करणाऱ्यांना मिळकत करात सुट देण्यात येते. तीन पैकी दोन प्रकल्प राबविल्यास 10 टक्के व तीन पैकी एक प्रकल्प राबविल्यास सुमारे 5 टक्के सुट मिळकत करामध्ये दरवर्षी देण्यात येते. दरम्यान पुणे महापालिका हद्दीत काही बोगस खाजगी संस्था कम्युनिटी कंपोस्टींग करण्याच्या नावाखाली सोसायट्यांचा ओला कचरा गेट कलेक्शन करतात, तथापी पुढे हाच कचरा पुणे महापालिका यंत्रणेला देवून, पुणे महापालिकेची फसवणूक केली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पुणे महापालिका हद्दीतील कचरा संकलन करणाऱ्या ज्या संस्था पॅनेलवर नाहीत व ज्या संस्थांकडून कम्युनिटी कंपोस्टींग करण्याच्या नावाखाली कचरा संकलन केले जाऊन, पुढे हाच कचरा पुणे महापालिका यंत्रणांना देऊन पुणे...