Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: National Crime Records Bureau

खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील मोक्का, एमपीडीए व तडीपारीतील गुन्हेगारांना पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत

खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील मोक्का, एमपीडीए व तडीपारीतील गुन्हेगारांना पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत

पोलीस क्राइम
खडकी पोलीस आणि पाटील इस्टेट झोपडपट्टी म्हणजे मटका, जुगार अड्डे आणि अंमली पदार्थांची बाजारपेठ… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/(वृत्तविश्लेषण)पुणे शहरात सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्याच्या प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या उद्देशाने काल खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील अजमेर शेख वय 22 वर्ष रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी शिवाजीनगर पुणे येथील गुन्हेगारावर 78 वी एमपीडीए कायदयानुसार कारवाई करण्यात आली आहे. अजमेर शेख याच्या विरूद्ध मागील 5 वर्षात एकुण 4 गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच त्याने त्याच्या साथीदारांसह खूनाचा प्रयत्न, घातक हत्याराने दुखापतीसह जबरी चोरी, गंभीर दुखापत, खंडणी, दंगा, बेकायदेशिर हत्यार बाळगणे या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले असल्याने त्याच्यावर एमपीडीए नुसार कारवाई करून त्याची रवानगी नागपुर कारागृहात केल्याचे पुणे शहर पोलीसांकडून 2 जानेवारीच्या प्रसिद्धी प...
तळजाई टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खुनाचे रहस्य उलगडले साडेतीन वर्षांनतर…पर्वती पोलीसांची कामगीरी

तळजाई टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खुनाचे रहस्य उलगडले साडेतीन वर्षांनतर…पर्वती पोलीसांची कामगीरी

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कानुन के हात बहोत लंबे होते असं आपण नेहमी ऐकतो. चित्रपटातही याचे डॉयलॉग असतात. दरम्यान पोलीस अधिकारी कणखर असतील तर कायदा आणखीन बळकट होतो. त्याचा प्रत्यय पर्वती पोलीस स्टेशन मध्ये आला आहे. पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयराम पायगुडे यांच्यासह पो.नि. गुन्हे श्री.विजय खोमणे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामटे, पोलीस अंमलदार राजू जाधव, कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, अंनिस तांबोळी, अमित सुर्वे, सद्याम शेख, ज्ञानेश्वर शिंदे, सुर्या जाधव यांनी साडेतीन वर्षापूर्वी झालेल्या खुनाचे रसह्य उलगडले आहे. अत्यंत किचकट व कोणताही पुरावा नसतांना, अतिशय पारंपारीक पद्धतीने पर्वती पोलीसांनी तपास करून गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. त्याबाबतची हकीकत अशी की,दि. 17 ऑगस्ट 2020 रोजी पर्वती टेकडीच्या वरील बाजूस जंगलामध्ये पडक्या पाण्याच्या टाकी...
Bharti Vidyapeeth Police-जोपर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाहीत तोपर्यंत कारवाई करू शकत नाही…..मग प्रश्न उरतो….भारती पोलीसात वरिष्ठ हाईत तरी कोण…व्हय… व्हय… कोण…?

Bharti Vidyapeeth Police-जोपर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाहीत तोपर्यंत कारवाई करू शकत नाही…..मग प्रश्न उरतो….भारती पोलीसात वरिष्ठ हाईत तरी कोण…व्हय… व्हय… कोण…?

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/फरासखाना हद्दीतील कुंटणखान्याला 300 वर्षांचा इतिहास आहे, त्यामुळे आक्षेप हे निःशब्द होणे स्वाभाविक आहे. कोरेगाव पार्क पोलीस हद्दीत जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र असल्याने सेक्स टुरिझम ही संकल्पना येथे रुजली गेली आहे. इथपर्यंत सगळं ठिक होत. परंतु मुंढवा पोलीस, विमानतळ पोलीस आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील देहविक्रीच्या जंजाळाचे रहस्य अजुन उलगडत नाही. जागो जाग मसाज पार्लर आणि स्पाच्या नावाखाली उघडपणे देहविक्री सुरू आहे. यात देश विदेशातील मुली व महिलांसह स्थानिक मुलींचा वापर करण्यात येत आहे. कायदयाने कुठल्याही प्रकारची देहविक्री दंडनिय अपराध ठरविण्यात आलेला आहे. तरी देखील भारती विद्यापीठासह इतर पोलीस स्टेशन कारवाई का करीत नाहीत. दरम्यान आम्हाला जो पर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाहीत, तो पर्यंत आम्ही कारवाई करू शकत नाही अशीही पंक्ती हल्ली जोडण्यात येत आहे. भा...
दोन वर्षात 200 मोक्का, 150 एमपीडीए …. अजुनही बरेच प्रस्ताव प्रलंबित… तरीह पुण्यात क्राईम वाढत आहे, चालु वर्षात मोक्क्याने शंभरी गाठली हो….

दोन वर्षात 200 मोक्का, 150 एमपीडीए …. अजुनही बरेच प्रस्ताव प्रलंबित… तरीह पुण्यात क्राईम वाढत आहे, चालु वर्षात मोक्क्याने शंभरी गाठली हो….

पोलीस क्राइम
इमानतळ पुलिस हद्दीत पैशांचा निघतोय धूर…दिस गेला ढळुन-रात आली फुलून, डाव अर्ध्यावरी राहू दया, रात धुंदीत ही जागवा… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/देश विदेशातील महिला व मुलींचा देह व्यापार करणाऱ्यांना पोलीस व कायदयाचा धाक राहिला नाही…..। पोलीसांवर शासनकर्त्यांचा धाक राहिला नाही…..॥ शासनकर्त्यांवर सांविधानिक जबाबदाऱ्या व तरतुदींचा धाक राहिला नाही…..॥। त्यामुळे आज पुण्यात गैरकायदयाचे धंदे अधिक वाढले असल्याचे दिसून येत आहे. जेवढे गैरकायदयाचे धंदे त्याच्या 10 पट रॉ मटेरिअल अर्थात गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. मोक्का व एमपीडीए सारख्या कडक कायदयाने गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण आणण्याचे मागील दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु मागील दोन वर्षात मकोकाचे 200 तर एमपीडीए चे 150 च्या आसपास गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाया केल्या आहेत. मकोका व एमपीडीए चे आजही बरेच प्रस्...
ACP विश्रामबाग यांना मटका जुगार अड्डेवाल्यांचे थेट आव्हान,शिवाजीनगरात पुन्हा सुरू झाला मटका जुगार अड्डयांचा बाजार….

ACP विश्रामबाग यांना मटका जुगार अड्डेवाल्यांचे थेट आव्हान,शिवाजीनगरात पुन्हा सुरू झाला मटका जुगार अड्डयांचा बाजार….

सर्व साधारण
एक बंद करता करता पोलीसांच्या नाकी नऊ… आता अर्ध्या डझनवर कारवाई करणार तरी कधी….पोलीस लाईन मधील दर्ग्याजवळ मुबीनसह, भैय्यावाडीत शौकत, वाकडेवाडीत भोसले, गावठाणात विठ्ठलसह इब्राहिम आणि इराणी वस्ती एक इराणी महिला… नुसता जुगाराचा थयथयाट नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांनी दि. 13 ऑक्टोंबर 2023 रोजी त्यांचे कार्यालयीन पत्र 3835/ 2023 नुसार भैय्यावाडी येथील मटका जुगार अड्डयावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 12 (अ) नुसार कारवाई केल्याचे समजपत्र देण्यात आले. तसेच त्याची खात्री करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवली असल्याचेही नमूद केले होते. तथापी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हाः टोळी करून, मटका जुगार अड्डे सुरू केले आहेत. आता तर त्यांनी थेटच सहायक पोलीस आयुक्त (अेसीपी) यांना आव्हान दिले आहे....
विमानतळ पोलीसांकडून सराईत गुन्हेगारांचे संरक्षण?

विमानतळ पोलीसांकडून सराईत गुन्हेगारांचे संरक्षण?

पोलीस क्राइम
विमानतळ पोलीसांकडून महाराष्ट्र शासन व पुणे शहर पोलीसांची बदनामी केली जात आहे काय…? चार पोलीस स्टेशनने हाकलुन लावलेल्या दरोडेखोरास विमानतळ पोलीसांनी हद्दीत प्रवेश का दिला? दोन/तीन महिने हद्दीत दरोडा घालणारा अब्दुल…अचानक अज्ञात इसम झाला तरी कसा ? ह्याच्यावर मोक्का, त्याच्यावर मोक्का, ह्याच्यावर एमपीडीए, त्याच्यावर एमपीडीए, हा तडीपार तो तडीपार.. आणि सराईत गुन्हेगार पुणे पोलीसांच्या डोईवर? नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यामध्ये सुमारे 30 ते 35 वर्ष मटका, जुगारअड्डे चालविणाऱ्या जुगारखोर इसमाने, देवांना देखील सोडले नाही. थेटच वाई येथील मांढरदेवीच्या यात्रेत भोळ्या भाविकांना दुप्पट पैशांचे आमिष दाखवुन, लुटणारा अब्दुल याने जत्रा संपल्यानंतर, चार पोलीस स्टेशनचे दरवाजे ठोठावले. परंतु ही दरोडेखोरी आमच्या हद्दीत नको म्हणून त्याला पिटाळुन लावले. परंतु विमानतळ पोलीस स्टेशन यांनी मात्र त्...
गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यात भारतीच्या पोलीसांना अपयश, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांचा राडा, तुला खल्लासच करणार म्हणत डोक्यावर घातक हत्यारांनी वार केले

गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यात भारतीच्या पोलीसांना अपयश, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांचा राडा, तुला खल्लासच करणार म्हणत डोक्यावर घातक हत्यारांनी वार केले

पोलीस क्राइम
भारती मधील गांजा आणि हुक्क्याचा धुर, वेश्याव्यसायावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तो पर्यंत राडा थांबण्याचे नाव घेत नाहीयेनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश सुपर मार्केट चालकास जिवे ठार मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करण्यात आली. तथापी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून गुन्हेगारांनी राडा घातला आहे. गुन्हेगारी टोळ्यांनी हत्यारानिशी सज्ज होवून तसेच बेकायदेशिर जमाव जमवुन, फिर्यादीस शिवीगाळ करून, तु आता गेलास, तुला खल्लासच करणार असे म्हणून त्याच्या डोक्यावर घातक शस्त्राने वार करून जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजा व खिडक्यांवर लाथा व दगड मारून, पार्क करून ठेवलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. यावरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत किती पराकोटीची गुन्हेगारी वाढली आहे, हे दिसून येत आहे. याला प्रामुख्याने भारती विद्यापीठ पोलीस ...
आनंदाची बातमीः शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मटका जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई

आनंदाची बातमीः शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मटका जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई

पोलीस क्राइम
आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीजनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे महापालिकेच्या दळवी हॉस्पीटल मागे भैय्यावाडी येथे मटका जुगार अड्डे चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली असून, संबंधितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 12 (अ) प्रमाणे कारवाई करून आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवल्याची माहिती विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री. वसंत कुवर यांनी नॅशनल फोरम यांना लेखी पत्राव्दारे कळविले आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे महापालिकेच्या दळवी हॉस्पीटल पाठीमागे भैय्यावाडी येथे मटका जुगार अड्डा व क्लब सुरू असल्याची बातमी ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये नॅशनल फोरम मध्ये प्रसारित केली होती. बातमीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त पुणे शहर व सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग यांना अवगत करण्यात आले होते. त्याचा परि...
पुणे शहरात ड्रग माफियांवर धडाधड कारवाई करणाऱ्या विनायक गायकवाडांना, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील हुक्का पार्लर, गांजाचा धुर, जुगाराचे अड्डे आणि वेश्याव्यवसायवर नियंत्रणही ठेवता येईना?

पुणे शहरात ड्रग माफियांवर धडाधड कारवाई करणाऱ्या विनायक गायकवाडांना, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील हुक्का पार्लर, गांजाचा धुर, जुगाराचे अड्डे आणि वेश्याव्यवसायवर नियंत्रणही ठेवता येईना?

पोलीस क्राइम
क्राईम युनिट मधील बदली नंतर, पोलीस अधिकाऱ्यांची कार्यक्षमता संपुष्टात येते काय….नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील गांजा आणि अंमली पदार्थांच्या धुराचे लोट उठत आहेत. स्थानिक नागरीकांनी शेकडोंनी तक्रारी केल्या तरी मसाज पार्लरच्या माध्यमातून सुरू असलेला वेश्याव्यवसाय बंद केला जात नाहीये. त्यातच मटका अड्डे, ऑनलाईन लॉटरी जुगारासह हातभट्टी व देशी विदेशी दारूने संपूर्ण भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला विळखा घातला आहे. असे असतांना देखील सध्या कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड यांना नियंत्रण आणता आलेले नाही. त्यांच्या नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी स्थानिक मंडळ पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यानी त्यांची भेट घेवून हद्दीतील अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय व हातभट्टीवर दारूवर कठोर कारवाईची मागणी केली होती. परंतु आजही त्यावर कारवाई होत नसल्याने अनेका...
बाई ऽऽ बाई ऽऽऽ… मनमोराचा (स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत) कसा पिसारा फुलला…

बाई ऽऽ बाई ऽऽऽ… मनमोराचा (स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत) कसा पिसारा फुलला…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/दिनांक 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीपासून स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील गैरकायदयाच्या कृत्यांबाबत जनजागृतीला सुरूवात केली. स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत अंडरवर्ल्डचे नाव घेवून व लाईन बॉयच्या सुरात स्वारगेट पोलीस स्टेशन लगत जुगाराचा क्लब सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावले यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. आज 13 तारीख आहे. तरी देखील जुगाराचा क्लब अजुनही बंद झालेला नाही. त्यामुळे 18/22 तास चालणारा जुगाराचा क्लब नेमका कुणाचा आहे याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन लगत असलेला क्लब -डॉनचा की लाईन बॉयचा -स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेला जुगाराचा क्लब हा सुमारे 18 ते 22 तास सुरू असतो. गणेशोत्सवाच्या काळात तर जुगाऱ्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशन लगत सुरू असलेला जुगारा...