Friday, December 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: natioanl forum news

पुण्यात मोबाईल चोराची हेराफेरीः उच्चशिक्षित चोराकडून 17 मोबाईलची चोरी, चोरीचे मोबाईल विकण्यासाठी नामांकित कंपनीच्या बीलांची हेराफेरी…

पुण्यात मोबाईल चोराची हेराफेरीः उच्चशिक्षित चोराकडून 17 मोबाईलची चोरी, चोरीचे मोबाईल विकण्यासाठी नामांकित कंपनीच्या बीलांची हेराफेरी…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यासारख्या उच्च शिक्षितांच्या शहरात ऑनलाईन सायबर क्राईम अफाट वाढलेले आहे. परंतु छापिल बिलांमध्ये देखील हेराफेरी करता येते हे देखील पुण्यातील लबाड चोरांनी करून दाखविले आहे. परंतु कानुन के हाथ बहोत लंबे होते है हे मात्र पुण्यातील चोर कदाचित विसरले असतीलही… परंतु कानुन के हाथ बहोत लंबे होते है, हा प्रत्यय शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधील चोरीच्या प्रकरणांने समोर आला आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील, शिवाजीनगर जुना तोफखाना भागात फिर्यादी यांचे स्वतःचे फर्निचरचे दुकानात दिनांक 04/01/2024 कामात व्यस्त असताना त्यांचा काउंटरवर ठेवलेला सॅमसंग कंपनीचा असलेला मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे तक्रारी वरुन शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि क्र.20/2024 भादवि क. 380 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे वरि...
खडक पोलीस स्टेशन हद्दीतील अत्यंत कुर, खुनशी व भांडखोर गुन्हेगारास अमरावती कारागृहात केले स्थानबद्ध

खडक पोलीस स्टेशन हद्दीतील अत्यंत कुर, खुनशी व भांडखोर गुन्हेगारास अमरावती कारागृहात केले स्थानबद्ध

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 व खडक पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार नजीर सलीम शेख वय 29 रा. काशेवाडी याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वागणूकीत काहीएक फरक पडत नव्हता. तसेच तो अत्यंत कु्रर, खुनशी व भांडखोर असल्याने तो लोकांमध्ये काहीना काही कुरापती काढुन मारहाण करून गुन्हे करीत होता. व्यापाऱ्यांना व बिल्डरांना खंडणी मागणे, नागरीकांना त्रास देवून त्याचे गुन्हेगारी कृत्य करीत असल्याने अखेर खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल माने याबाबत अहवाल पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांचेपुढे सादर करून सराईत गुन्हेगाला अमरावती मध्यवर्ती कारागृहात एमपीडीए कायदयानुसार स्थानबद्ध करण्यात आले आहे. खडक पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे कृत्य -खडक पोलीस स्टेशन पुणे या गुन्हे अभिलेखावरील सराईत व अट्टल गुन्हेगार नजीर सलीम शेख, वय-22 ...
भिडे वाड्यासाठी पैसे लावणारा मोठा बिल्डर असतात तर ती कोर्ट केसही पुणे मनपा हरले असते-aniruddha chavan

भिडे वाड्यासाठी पैसे लावणारा मोठा बिल्डर असतात तर ती कोर्ट केसही पुणे मनपा हरले असते-aniruddha chavan

सामाजिक
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील भिडे वाडा येथे सुरू केली. वर्षानुवर्ष हा भिडेवाडा नेमका कुठे आहे याची पुणेकरांनाच माहिती नव्हती. परंतु रिपब्लिकन पक्ष, भारीप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीसह फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांनी भिडे वाडा वाचविण्याची मोहीम सुरू केल्यानंतर, देशातील पहिली मुलींची शाळा ही पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती समोरच असल्याचे समजले आहे. मोडकळीस आलेली इमारत म्हणजेच ही मुलींची पहिली शाळा अर्थात भिडे वाडा असल्याची माहिती पुणे शहरातील नागरिकांना समजली. त्याच्यानंतर देशातील मुलींची पहिली शाळा वाचविण्यासाठी विविध संस्था आणि संघटना पुढे आल्या. दरम्यान मागील दहा ते पंधरा वर्षांपासून भिडे वाड्याचा प्रश्न न्यायालयामध्ये प्रलंबित होता. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्य...
पुणे महापालिकेतील शिवाजी दौंडकर, राकेश विटकर व साथीदारांविरूद्ध कारवाई करण्यात दिरंगाई करणाऱ्या अन्टी करप्शन विरूद्ध न्यायालयात जाणार – सुनिल टोके

पुणे महापालिकेतील शिवाजी दौंडकर, राकेश विटकर व साथीदारांविरूद्ध कारवाई करण्यात दिरंगाई करणाऱ्या अन्टी करप्शन विरूद्ध न्यायालयात जाणार – सुनिल टोके

सर्व साधारण
मुंबई पोलीस दलातील सुनिल टोके हे आहेत तरी कोण….पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांविरूद्ध फौजदारी कारवाया होणार काय… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील तत्कालिन मुख्य कामगार अधिकारी व नगरसचिव श्री.शिवाजी दौंडकर यांनी तत्कालीन शिक्षण प्रमुख, शिक्षण मंडळ प्रमुख पदासह पुणे महानगरपालिकेतील विविध ठिकाणी सेवेत रुजू झाल्या पासून सेवानिवृत्त होई पर्यंत अनेक भ्रष्टाचारी सहकाऱ्यांना हाताशी धरून अनेक मोठे भ्रष्टाचार केलेले आहेत. अनेक बेकायदेशीर, मनमानी कारभार, गुन्हेगारी स्वरूपाच्या कामाचे उदात्तीकरण करून, अनेक भ्रष्टाचार करून स्वतःची व अति वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आर्थिक विकास करण्याची कोणतीही बेकायदेशीर संधी सेवानिवृत्ती होईपर्यंत सोडलेली नाही. ॲन्टी करप्शन ब्युरो पुणे यांनी देखील कारवाई करण्यात कसुरी केल्याने या सर्वांविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मुंबई पोलीस दला...