Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: latest news on pune crime

महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व विघातक कायदयानुसार पुण्यातील गुन्हेगारांविरूद्ध धडक कारवाई, पर्वती पोलीस स्टेशन 70 तर… खडकी पोलीस स्टेशनमध्ये 71 वी कारवाई…

महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व विघातक कायदयानुसार पुण्यातील गुन्हेगारांविरूद्ध धडक कारवाई, पर्वती पोलीस स्टेशन 70 तर… खडकी पोलीस स्टेशनमध्ये 71 वी कारवाई…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध अधिनियम 1981 नुसार पुणे शहर पोलीसांनी आजपर्यंत या कायदयाखाली सुमारे 71 जणांविरूद्ध कठोर कारवाई करून त्यांना राज्यातील विविध कारागृहात डांबण्यात आले आहे. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यास बाधा येईल अशा कोणत्याही प्रकारचे वर्तन करणाऱ्यांविरूद्ध या कायदयानुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे. पर्वती पोलीस स्टेशन व खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगाराविरूद्ध चालु सप्ताहात कारवाई करून त्यांना वेगवेगळ्या कारागृहत बंदिस्त करण्यात आले आहे. पर्वती पोलीस स्टेशनमध्ये 70 वी एमपीडीए कारवाई -पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार नामे यश उर्फ मनोज दिनेश मेरवाडे, वय-22 वर्ष. रा.स.नं. 130. दांडेकर पुल मारणे गिरणी समोर सिंहगड रोड, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह कोयता, तलवार, ल...
पुणे शहरातील गुन्हेगारीचे मुळ खाजगी सावकारी आणि फायनांशिअल कंपन्या हेच असल्याचे उघड

पुणे शहरातील गुन्हेगारीचे मुळ खाजगी सावकारी आणि फायनांशिअल कंपन्या हेच असल्याचे उघड

पोलीस क्राइम
पुणे शहरात खाजगी सावकारांचा धुमाकूळखंडणी विरोधी पथक एक व दोन कडून धडक कारवाईपुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात गुन्हेगारी का वाढली आहे… प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या तरुणांच्या हातामध्ये कोयते नेमके कशामुळे आले आहेत… नोकरी नाही… धंदा नाही… व्यापार नाही… तरी या युवकांकडे नवी नवीन गाड्या आणि हातात गळ्यात सोने कसे… याची माहिती घेत असताना खाजगी सावकारी तसेच फायनांशिअल कंपन्या हेच दिसून आले आहे. दरम्यान खाजगी सावकाराने दिलेल्या रकमांची वसुली करण्याकरिता तरुणांच्या हातामध्ये अग्निशस्त्र व धारदार शस्त्र देऊन वसुली करता पाठविले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यातच भाईगिरी, दादागिरीचा छंद भरलेल्या युवकांना स्फुरण चढले आहे. यामुळेच हातात कोयता घेवून मी देखील भाई म्हणत पुढे येत आहेत. कोयता गँग माफीया गप्प बसले असले तरी कारवाया सुरूच राहणार आहेत. त्यामुळे या खाजगी सावकारी व फायनांशिल कंपन्यांच्य...
विशिष्ठ हद्दीत कारवाया केल्यानंतर पोलीसांच्या बदल्या होतात तरी कशा ,<br>पुणे शहर पोलीस दलात खांदेपालट

विशिष्ठ हद्दीत कारवाया केल्यानंतर पोलीसांच्या बदल्या होतात तरी कशा ,
पुणे शहर पोलीस दलात खांदेपालट

पोलीस क्राइम
सामाजिक सुरक्षा मधील 12 ए चे पुरस्कर्ते आता भारती विद्यापीठात.. तर विशेष शाखेच्या भरत जाधवांना सामाजिक सुरक्षेची जबाबदारी… बंडगार्डनचे मानकर खंडणी विरोधी पथकातहुश्यऽऽ… अखेर विश्रामबागला सहाय्यक पोलीस आयुक्त मिळाले… पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस दलात खांदेपालट करण्यात आला आहे. राज्याच्या गृह विभागाने नुकत्याच बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यात बदलुन आलेल्या पोलीस निरीक्षकांना या बदल्यांत पदस्थापना देण्यात आली आहे. या शिवाय पोलीस आयुक्तालयातील तीन सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. 3 सहाय्यक पोलीस आयुक्त व 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या व पदस्थापना करण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग या पदाला पुर्णवेळ अधिकारी मिळाला आहे. तर राजेश पुराणिक यांच्यानंतर, सामाजिक सुरक्षा विभागाचा भार पेलणारे व 12 ए चे पुरस्कर्ते विजय कुंभार यांची ...
बंडगार्डन पोलीस हद्दीत आल्या नाचत नाचत मेणका-रंभा, आज अवतरली ताडीवाला रोडवरती जशी इंद्रसभा….

बंडगार्डन पोलीस हद्दीत आल्या नाचत नाचत मेणका-रंभा, आज अवतरली ताडीवाला रोडवरती जशी इंद्रसभा….

पोलीस क्राइम
वाऱ्या वरती रविचंद्राचे झुंबर, सुद्ध हरपती दाही दिशापुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात… पुणे शहर पोलीस आयुक्तालय आहे, ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात्‌‍… जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय आहे, ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात, जागतिक दर्जाचे ससुन हॉस्पीटल आहे, ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात, पुणे रेल्वे स्टेशन आहे, रूबी व जहाँगिर सारखी हॉस्पीटल्स आहेत. त्या ठिकाणी ताडीवाला रोड व इतर स्लम परिसर आहे. याच ठिकाणी अवैध जुगाराचा बाजार भरला जातोय, याच ठिकाणी राजाबहाद्दुर मिल्स आवारात यंत्रमागाची धडधड बंद होवून तिथं आता आठ पब मधुन डीस्कोचा धडाधड आवाज धडकत आहे. आजुबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान तर होतच आहे. परंतु हातभट्टी, गांजांची देखील विक्रीचे हब निर्माण व्हावे अशी अतिशय शोकांतिका आहे...
पुणे शहरातील उपनगरापाठोपाठ मध्यवर्ती शहरातील लष्करसह शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगचा धुडगूस

पुणे शहरातील उपनगरापाठोपाठ मध्यवर्ती शहरातील लष्करसह शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगचा धुडगूस

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय, कायदयाचा आणि पोलीसांचा धाक कुठे नाहीसा झाला या विषयावर मागील तीन आठवड्यांपासून गुन्ह्यांच्या घटना आणि कोयता खोरांच्या दहशतीच्या अनुषंगाने नॅशनल फोरमध्ये प्रश्नमालिका सुरू असतांनाच आज लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतही अल्पवयीन मुलांनी दिवसाढवळ्या हातात कोयता घेवून दहशत माजविली आहे. तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी मोक्का आणि एमपीडीए मध्ये प्रत्येकी शतक गाठल्याचा गवगवा केला, परंतु त्याचे उलट परिणाम तर होत नाहीयेत ना ही देखील आज तपासून पाहण्याची वेळ आली आहे. मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीची होऊन होऊन दोन तीन वर्षे शिक्षा होईल. परंतु आपणही भाई होणार या विषारी अमिषातून तर हे कृत्य पुणे शहरात होत नाहीयेत ना याचीही मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी होणे आवश्यक आहे. दरम्यान कायदयाला आणि पोलीसांना आव्हान देणाऱ्यांवर कठोर कारवाई ...