खडक पोलीसांकडून तीन दुचाकींसह, वाहनचोराला केले जेरबंद
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून वाहन चोरी करणाऱ्या मोबीन सुलतान खान वय 27 वर्ष याला अटक केली आहे. एक वाहन चोरीचा तपास करीत असतांना, खान याच्याकडून आणखी तीन गुन्हे उघडकीस आणण्यात खडक पोलीसांना यश आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,
खडक पोलीस स्टेशन हद्दीत वान चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गायकवाड व पोलीस निरीक्षक श्री. संपतराव राऊत यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या आहेत. त्यानुसार तपास पथकातील प्रभारी अधिकारी श्री. प्रल्हाद डेंगळे व तपास पथकातील स्टाफ श्री. दुडम, श्री. ठवरे, श्री. तळेकर, श्री. चव्हाण श्री. वाबळे, श्री. ढपवरे, श्री. कुडले असे कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
यावेळी पोलीस अंमलदार श्री. किरण ठवरे व पोलीस अंमदार हर्षल दुडम यांना बातमीदारामार्फत माहिती...