Thursday, April 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Google News In Marathi

बंडगार्डन पोलीस हद्दीत आल्या नाचत नाचत मेणका-रंभा, आज अवतरली ताडीवाला रोडवरती जशी इंद्रसभा….

बंडगार्डन पोलीस हद्दीत आल्या नाचत नाचत मेणका-रंभा, आज अवतरली ताडीवाला रोडवरती जशी इंद्रसभा….

पोलीस क्राइम
वाऱ्या वरती रविचंद्राचे झुंबर, सुद्ध हरपती दाही दिशापुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात… पुणे शहर पोलीस आयुक्तालय आहे, ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात्‌‍… जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय आहे, ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात, जागतिक दर्जाचे ससुन हॉस्पीटल आहे, ज्या बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत साक्षात, पुणे रेल्वे स्टेशन आहे, रूबी व जहाँगिर सारखी हॉस्पीटल्स आहेत. त्या ठिकाणी ताडीवाला रोड व इतर स्लम परिसर आहे. याच ठिकाणी अवैध जुगाराचा बाजार भरला जातोय, याच ठिकाणी राजाबहाद्दुर मिल्स आवारात यंत्रमागाची धडधड बंद होवून तिथं आता आठ पब मधुन डीस्कोचा धडाधड आवाज धडकत आहे. आजुबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान तर होतच आहे. परंतु हातभट्टी, गांजांची देखील विक्रीचे हब निर्माण व्हावे अशी अतिशय शोकांतिक...
कोयते,तलवारी, बंदूकांनतर आणि ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक

कोयते,तलवारी, बंदूकांनतर आणि ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक

पोलीस क्राइम
पुणे शहर पोलीसांनी ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन केलं,कोयते, तलवारी, बंदूका पकडल्या, आता गुन्हे करण्यासाठीचे उत्तेजित ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक पुणे/दि/ नॅशनल फोरम/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुण्यातील गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांनी, कायदयाचा आणि पोलीसांचा धाक, पुण्याच्या मुळा-मुठा नदीत विसर्जित केल्यासारखे, संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. दिवस असो की रात्र, हातात कोयते घेवून नागरीकांना धमकाविणे, हॉटलचालक, टपरीचालकांवर कोयता उगारणे, थांबलेल्या व जात असलेल्या वाहनांवर कोयते मारून वाहनांचे नुकसान करणे सारख्या घटना कधी नव्हे ते पुणे शहरात होत आहेत. पकडण्यात आलेले बहुतांश आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही उत्तेजना नेमकी कशामुळे आली आहे…. कोयते उगारत असतांना त्यांची शारिरीक व मानसिक उत्तेजना याचा विचार करता, देशी विदेशी मदय तसेच गांजा, मे...