Monday, June 5 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: google brinkings news marathi

नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण ? ॲड.बाळासाहेब आंबेडकर

नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण ? ॲड.बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/नोटबंदीचा निर्णय वैध असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत असून आता बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण? असाही सवाल उपस्थित केला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिनांक 10 मार्च 2017 रोजी त्यांच्या प्रकाशनामध्ये नोटाबंदीचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर विपरीतपणे झाला आहे असे म्हटले आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाने 2016 च्या नोटबंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना अचानकपणे घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. कोणत्याही सिरीजच्या नोटा रद्द करणे किंवा त्या पुन्हा चलनात आणणे किंवा नोटबंदी करणे यामध्ये केंद्र सरकारने काय भूमिका घ्यावी याविषयीच्या संवैधानिक मुद्यावर अ...
नाना पेठेत कोयता-पालघन सारखी हत्यारे हवेत फिरवुन दहशत माजविणाऱ्यांची,समर्थ व क्राईम ब्रँचच्या पोलीसांच्या समांतर तपासाचा पुणेरी हिस्का… समर्थचे प्रसाद लोणारे-सौरभ माने व क्राईम ब्रँचचे निलेश साबळे-अजय थोरात यांची दिमाखदार कामगिरी

नाना पेठेत कोयता-पालघन सारखी हत्यारे हवेत फिरवुन दहशत माजविणाऱ्यांची,समर्थ व क्राईम ब्रँचच्या पोलीसांच्या समांतर तपासाचा पुणेरी हिस्का… समर्थचे प्रसाद लोणारे-सौरभ माने व क्राईम ब्रँचचे निलेश साबळे-अजय थोरात यांची दिमाखदार कामगिरी

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumआमदार, खासदार किंवा नगरसेवकाने वा राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याने पाठीवर शाब्बासकीची थाप मारल्यानंतर, गल्लीबोळातील नवशिक्या दादा आणि भाईंना पोलीस आणि कायदयाचा धाक नेमका काय असतो याचे भान राहिलेले नसते. त्यामुळे हम करे सो कायदा असे त्यांचे वर्तन सुरू असते. थर्ड फर्स्ट च्या मध्यरात्रौ आणि नववर्षाच्या पहाटेच आपसात झालेल्या भांडणाचा राग मनाशी धरून काही नेत्यांच्या लाडक्यांनी पुण्यातील नाना पेठेत कोयता, पालघन सारखी हत्यारे हवेत फिरवुन, दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. परंतु समर्थचे प्रसाद लोणारे-सौरभ माने व क्राईम ब्रँचचे निलेश साबळे-अजय थोरात यांनी कायदा मोडणाऱ्यांना जेरबंद केले असून, पुणे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांना पुणेरी हिसका दाखविण्यात आला आहे. पळुन गेला तरी कानुन के हाथ बहोत लंबे होते है हा साक्षात्कार नाना आणि भवानी पेठेतील दादा...
नववर्षाचा पहिलाच दिवस- खून, हत्याकांड, दरोडा, घरफोड्या,लुटालूटीचा…<br>वर्षाच्या शेवटच्या दिवशीही संपूर्ण शहरात हिंसाचार आणि लुटालुटीच्या घटना…

नववर्षाचा पहिलाच दिवस- खून, हत्याकांड, दरोडा, घरफोड्या,लुटालूटीचा…
वर्षाच्या शेवटच्या दिवशीही संपूर्ण शहरात हिंसाचार आणि लुटालुटीच्या घटना…

पोलीस क्राइम
पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय…. भाग - 2 नॅशनल फोरमची काल प्रसारित बातमी आणि चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया,पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वशिल्याने आलेल्या पोलीसांमुळेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभिर झाला. ….. पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुण्यात कोयता गँगची दहशत, विधीमंडळात कोयता गँगचा मुद्दा आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी मागील दीड वर्षात 700 पेक्षा अधिक गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध मोक्का व एमपीडीए ची कारवाई करून त्यांना तडीपार केल्याचा मुद्दा अधिक तापला आहे. 700 पेक्षा अधिक जणांविरूद्ध कारवाई करून देखील गुन्हेगारांमध्ये पोलीस आणि कायदयाचा धाक का राहिला नाही… पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय हा मुद्दा घेवून नॅशनल फोरमने काही प्रश्न उपस्थित करून त्याबाबतची बातमी प्रसारित केली आहे. त्यात राज्याचे उच्च-तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पाल...