Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Gambling Club

पुण्यातील स्वारगेट आणि मार्केटयार्ड पोलीसी कारभारामुळे… तुझ्या गळा, माझ्या गळा, बांधु मटक्यांच्या माळा…

पुण्यातील स्वारगेट आणि मार्केटयार्ड पोलीसी कारभारामुळे… तुझ्या गळा, माझ्या गळा, बांधु मटक्यांच्या माळा…

पोलीस क्राइम
तुझा 1 क्लब, माझे दोन क्लब…चौथा आला नटराजवर…स्वारगेट व मार्केटयार्डात कायदयापेक्षा मोठा हात नेमका कुणाचा आहे….नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्याचे तत्कालिन गृहमंत्री कै. आर.आर पाटील यांनी महाराष्ट्रात डान्सबार वर बंदी आणली. केवळ घोषणा न करता, डान्सबार बंदीचा कायदा आणला. तसेच राज्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास, संपूर्ण पोलीस स्टेशनचे अधिकारी निलंबित केले जातील अशी घोषणा केली होती. नंतर अनेक वर्षानंतर, पुण्यातही तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी देखील ज्या पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व गैरकायदयाचे धंदे आढळुन येतील त्यांच्या विरूद्ध कठोर कारवाई केली जाईल अशी तंबी दिली होती. तंबी दिली खरी परंतु कारवाई कधीच केली नाही. परंतु कारवाईच्या भीतीने पोलीस स्टेशन हद्दीत नवीन अवैध धंदे सुरू होऊ दिले जात नव्हते. आता मात्र रान मोकळे झाले आहे. ना तंबी, ना कारवाईची भीती, सगळे अलबेल सुरू आहे. ...
शिवाजीनगर पोलीस स्टेशनची हतबलता… साहेबांचा क्बल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुगार अड्डयावर कारवाई करतांना होतेय पोलीसांची दमछाक

शिवाजीनगर पोलीस स्टेशनची हतबलता… साहेबांचा क्बल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुगार अड्डयावर कारवाई करतांना होतेय पोलीसांची दमछाक

पोलीस क्राइम
21 वेळा नियंत्रण कक्षाला दुरध्वनी तरी कारवाई होत नाही, खरे कारण आज समजलेआज 22 व 23 ऑगस्टच्या मटका जुगाराच्या चिठ्ठया सादर करीत आहे… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांनी अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी इतर फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्वासाठी व नागरीकांमध्ये दहशत कायम ठेवण्यासाठी संघटीत गुन्हेगारी कार्यरत आहे, तसेच वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याने त्या गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून प्रसिद्ध केले जात आहे. परंतु गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करीत असतांना, मात्र त्याच गुन्हेगारी टोळ्यांनी खडकी, विश्रांतवाडी नंतर आता शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्वतःचे आर्थिक हिताकरीता अवैध मार्गाने जुगार अड्डे सुरू केले आहेत, त्याबाबत वारंवार पोली...