विमानतळ पोलीसांकडून सराईत गुन्हेगारांचे संरक्षण?
विमानतळ पोलीसांकडून महाराष्ट्र शासन व पुणे शहर पोलीसांची बदनामी केली जात आहे काय…?
चार पोलीस स्टेशनने हाकलुन लावलेल्या दरोडेखोरास विमानतळ पोलीसांनी हद्दीत प्रवेश का दिला?
दोन/तीन महिने हद्दीत दरोडा घालणारा अब्दुल…अचानक अज्ञात इसम झाला तरी कसा ?
ह्याच्यावर मोक्का, त्याच्यावर मोक्का, ह्याच्यावर एमपीडीए, त्याच्यावर एमपीडीए, हा तडीपार तो तडीपार.. आणि सराईत गुन्हेगार पुणे पोलीसांच्या डोईवर?
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यामध्ये सुमारे 30 ते 35 वर्ष मटका, जुगारअड्डे चालविणाऱ्या जुगारखोर इसमाने, देवांना देखील सोडले नाही. थेटच वाई येथील मांढरदेवीच्या यात्रेत भोळ्या भाविकांना दुप्पट पैशांचे आमिष दाखवुन, लुटणारा अब्दुल याने जत्रा संपल्यानंतर, चार पोलीस स्टेशनचे दरवाजे ठोठावले. परंतु ही दरोडेखोरी आमच्या हद्दीत नको म्हणून त्याला पिटाळुन लावले. परंतु विमानतळ पोलीस स्टेशन यांनी मात्र त्...