ACP विश्रामबाग यांना मटका जुगार अड्डेवाल्यांचे थेट आव्हान,शिवाजीनगरात पुन्हा सुरू झाला मटका जुगार अड्डयांचा बाजार….
एक बंद करता करता पोलीसांच्या नाकी नऊ… आता अर्ध्या डझनवर कारवाई करणार तरी कधी….पोलीस लाईन मधील दर्ग्याजवळ मुबीनसह, भैय्यावाडीत शौकत, वाकडेवाडीत भोसले, गावठाणात विठ्ठलसह इब्राहिम आणि इराणी वस्ती एक इराणी महिला… नुसता जुगाराचा थयथयाट
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांनी दि. 13 ऑक्टोंबर 2023 रोजी त्यांचे कार्यालयीन पत्र 3835/ 2023 नुसार भैय्यावाडी येथील मटका जुगार अड्डयावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 12 (अ) नुसार कारवाई केल्याचे समजपत्र देण्यात आले. तसेच त्याची खात्री करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवली असल्याचेही नमूद केले होते. तथापी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हाः टोळी करून, मटका जुगार अड्डे सुरू केले आहेत. आता तर त्यांनी थेटच सहायक पोलीस आयुक्त (अेसीपी) यांना आव्हान दिले आहे....