Monday, June 8 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: census and the ‘Swachh Survekshan’ (Cleanliness Survey)

पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागात एसआय आणि डिएसआयच्या बदल्यांचे सुडचक्र?

पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागात एसआय आणि डिएसआयच्या बदल्यांचे सुडचक्र?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान व राष्ट्रीय जनगणनेचे काम सुरू आहे. पुणे महापालिकेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला जनगणनेचे काम दिले आहे, तसेच घनकचरा विभागातील मोकादम, आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांना राष्ट्रीय जनगणना व स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान अशी दोन्ही कामे देण्यात आली आहे. त्यात पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. प्रजित नायर यांनी शुक्रवार दि. 5 जुन 2026 रोजी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान काळात कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे आदेश देण्यात आले होते. तसेच राज्य शासनाने देखील जनगणना काळात कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत अशा सुचना व शासन निर्णय जारी केलेला आहे. शासनाचे आदेश व आयुक्तांचे निर्...