Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: bjp

आरक्षणवाद्यांनी आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी, महायुती व महाभकास आघाडीच्या कटकारस्थानांपासून दूर रहा

आरक्षणवाद्यांनी आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी, महायुती व महाभकास आघाडीच्या कटकारस्थानांपासून दूर रहा

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आपण दलित आहोत की आदिवासी, ओबीसी आहोत की, भटके विमुक्त हे सर्व आरक्षणाच्या कक्षेत येतात. ज्या ज्या समाज घटकांनी, ज्या ज्या लहान मोठ्या पक्षांनी काँग्रेस किंवा भाजपाला आजपर्यंत समर्थन दिले ते सर्व पक्ष, संघटना नेस्तनाबुत झाले आहेत. नामशेष झाले आहेत. मुस्लिम समाजाने आजपर्यंत काँग्रेसला साथ दिली, आज त्याच मुसलमानांना काँग्रेसने 288 पैकी 3 जागा दिल्या आहेत, शिवसेना ठाकरे गटाने 288 पैकी एकाही मुसलमानाला उमेदवारी दिली नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाने 288 पैकी केवळ 2 ठिकाणी मुसलमानांना उमेदवारी दिली आहे. राज्यात मुस्लिमांची संख्या दोन ते अडीज कोटी आहे. एवढ्या मोठ्या समाजाला एकाही पक्षाने आमदारकीसाठी आणि खासदारकीसाठी उमेदवारी देत नाहीत. महाराष्ट्रातून मुस्लिम आणि ओबीसीचा एकही खासदार नसावा ही मोठी शोकांतिका आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमांची मते आम्हालाच...
बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभा- विधानसभा निडणूकीतून हरविणे का आवश्यक आहे…?

बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभा- विधानसभा निडणूकीतून हरविणे का आवश्यक आहे…?

सर्व साधारण
महाराष्ट्रातील 800 पैकी 799 जातींना डोक्यावर घेणे परवडणारे नाही. त्यामुळे ह्यांना जाती- जाती आणि धर्मा धर्मात… हिंदू - मुस्लिम खेळात गुंतवून ठेवून 70 वर्ष सत्ता राखली व आताही पुढील 70 वर्ष आमचेच असतील. विषय प्रवेश -बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला निवडणूकीतून हरविणे का आवश्यक आहे याचा खालील प्रमाणे उहापोह केला आहे. देशात एकुण 6 हजार जाती आहेत. तर महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटींच्या आसपास असून राज्यात 800 पेक्षा अधिक जाती धर्माचे लोक राहतात. दरम्यान मागील महिन्यांत पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत 800 जातीपैंकी केवळ एकाच जातीचे 31 खासदार निवडणूक आणण्यात आपल्यास यश आले आहे. आता विधानसभेच्या निवडणूका देखील तोंडावर आहेत. त्यातच सध्याच्या विधानसभेत एकाट्या मराठा समाजाचे 190 आमदार आहेत. तर ओबीसींचे 11 आमदार आहेत. एससी/एसटीच्या आरक्षणाच्या 58 आमदार आहेत. दरम्यान बाळासाहेब आंबेडक...
भाजपने 10 वर्षात काय केले याचा जाब काँग्रेसने विचारण्यापेक्षा उलट काँग्रेसच वंचित वर तुटून का पडत आहे…? काँग्रेस,भाजपाची दिग्गज नेते अकोला-अमरावतीमध्ये ठाण मांडून का बसले आहेत…

भाजपने 10 वर्षात काय केले याचा जाब काँग्रेसने विचारण्यापेक्षा उलट काँग्रेसच वंचित वर तुटून का पडत आहे…? काँग्रेस,भाजपाची दिग्गज नेते अकोला-अमरावतीमध्ये ठाण मांडून का बसले आहेत…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/अमरावती-अकोला/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 41 जागांवर भाजप-शिवसेना युतीने विजय मिळवला होता. राज्यात 48 पैकी 41 खासदार भाजप-शिवसेना युतीचे होते. या खासदारांनी केंद्रातून त्यांच्या मतदारसंघाकरता किती विकास निधी आणला? खासदारांना मिळणाऱ्या दरवर्षीचा पाच कोटी रुपयांचा निधी कोणत्या कामांवर खर्च केला? किती टक्के खर्च केला? जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तो निधी कसा खर्च केला? त्यांच्या मतदारसंघांमध्ये निवडून आलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये किती नवीन शाळा, कॉलेज उभे केले? किती नवीन हॉस्पिटल उभे केले? किती शासकीय जुन्या हॉस्पिटलला आरोग्य सुविधा पुरवल्या? किती प्राथमिक आणि माध्यमिक जुन्या शाळांच्या नूतनीकरणावर भर दिला? सर्वसामान्य नागरिकांना शिक्षण व आरोग्याच्या कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या? बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळवून देण्यासा...
“दिवाळीनंतर देशात कत्तल की रात”, बाळासाहेब आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

“दिवाळीनंतर देशात कत्तल की रात”, बाळासाहेब आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या सर्व 48 जागा लढवणार आहे. पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, वंचितने निवडणुकीच्या प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात केली आहे. तसेच राज्यभरात पक्षाची मोर्चेबांधणी केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर युती केली आहे. अद्याप या दोन्ही पक्षांमध्ये किंवा महाविकास आघाडीतही (ठाकरे गट महाविकास आघाडीचा भाग आहे) जागा वाटपाबाबत चर्चा झालेली नाही. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात अराजकता वाढेल असं वक्तव्य ॲड. आंबेडकर यांनी केलं आहे. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, मी या अगोदरही म्हटलं आहे की इथे दिवाळीनंतर कत्तल की रात होईल. सगळीकडे पूर्णपणे अराजकता माजलेली असेल. या देशात निवडणुकीच्या अगोदर जी परिस्थिती याआधी कधीच झाली नाह...
वंचित समुहांना वगळून विजयी होणे महाविकास आघाडीसाठी अशक्य! क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराविरोधात लढा सुरूच राहील, बाळसाहेब आंबेडकरांचा सरकारला इशारा

वंचित समुहांना वगळून विजयी होणे महाविकास आघाडीसाठी अशक्य! क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराविरोधात लढा सुरूच राहील, बाळसाहेब आंबेडकरांचा सरकारला इशारा

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारताच्या निवडणूक इतिहासातील 2024 ची लोकसभा निवडणूक अगदी वेगळी असणार आहे, अगदी घनघोर राजकीय युद्धच असेल. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आघाडी आणि काँग्रेस आघाडीच्या दृष्टीनेही उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्र महत्त्वाचे ठरणार आहे. देशात राजकीय परिवर्तन घडवून आणायचे असेल तर विरोधकांना, विशेतः काँग्रेसला महाराष्ट्र सर करावा लागेल. मात्र त्यासाठी केवळ राजकीय आघाडी करून चालणार नाही. राज्यात निवडणुकीवर प्रभाव टाकणारे विविध सामाजिक घटक आहेत, त्या राजकीय शक्ती आहेत. ज्यांच्या बाजूने त्या जातील त्यांचा विजय निश्चित आहे, असे आजवरचे निवडणूक निकाल सांगतात. अशांपैकी महाराष्ट्रात वंचित बहुजन समाजाची राजकीय शक्तीचा निवडणुकीवर कायम प्रभाव राहिला आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीतही तिची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराविरोधात लढा सुरूच र...
विरोधकांना निधी मिळू नये म्हणून 2000 च्या नोटा बंद, भाजपचे चोकिंग राजकारण- बाळासाहेब आंबेडकर

विरोधकांना निधी मिळू नये म्हणून 2000 च्या नोटा बंद, भाजपचे चोकिंग राजकारण- बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज,दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई मुंबई/दि/प्रतिनिधी/भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन दिवस आधी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर नोटा जमा करण्याची शेवटची तारीख आहे. सर्व बँकांमधून नोटा जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. एका वेळी एक व्यक्ती 10 नोटा म्हणजे वीस हजार रुपये जमा करू शकतो असे रिझर्व बँकेने जाहीर केले आहे. या निर्णयावर अनेक जाणकारांनी आपले वेग वेगळे मत व्यक्त केले आहे. भाजप सरकारच्या कार्य काळात ही दुसऱ्यांदा नोटबंदी आहे. पहिल्या नोटबंदीच्या काळात जनतेचे खूप हाल झाले. काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्या वेळेस सुध्दा 1000 रुपयांच्या नोटा या चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. आणि 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या त्याचा फायदा आता पर्यंत होत होता का? तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेन...
राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतील : बाळासाहेब आंबेडकर

राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतील : बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
नॅशनल फोरम/बदलापुर/दि/ प्रतिनिधी/राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतील असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान या देशात बदल अपेक्षित असून कर्नाटक मार्ग दाखवून देईल. तसेच 2024 मध्ये बऱ्याच घटना घडतील असंही त्यांनी बदलापुर येथील सभेत वक्तव्य केले आहे.यावेळी ते म्हणाले की, मी कित्येकवेळा सांगितले आहे की, या राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, हे सरड्यासारखे कधी कलर बदलतील हे सांगता येणार नाही. फुले, शाहू, आंबेडकरांचे नावे हे केवळ एक कलर दाखविण्यासाठी आहे. परंतु यांचा असणारा खरा कलर आत्ता दिसायला लागला आहे. आज जातील की उद्या जातील, की परवा जातील अशी चर्चा आपणांस दिसते. 2024 च्या अगोदर बऱ्याच घटना याच्या अगोदर घडणार आहेत. कदाचित कर्नाटक हा मार्ग दाखवु शकतो. या देशाला बदल अपेक्षित आहे. फक्त बदलाचे शब्द ठरेल आणि त्याचा हुंकार हा पण झाला पाह...