Friday, January 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुराणिक पर्वानंतर, पुणे शहरात मटका-जुगार अड्डे, ऑनलाईन लॉटरीसह वेश्याव्यवसायचे पुनरूज्जीवन

गुन्हे शाखा आणि सामाजिक सुरक्षा विभागाची लुटूपुटूची कारवाई,
भकास कारवाईचा टूकार पंचनामा
पुणे/दि/ प्रतिनिधी/national fourm/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदी श्री. राजेश पुराणिक यांची नियुक्ती केल्यानंतर, अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत 700 आरोपी आणि 10 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, अवैध धंदे करणारे मटका, जुगार अड्डे, वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर कायदयाचा धाक निर्माण केला होता. सहा महिन्यांच्या कालावधीत जवळपास संपूर्ण पुणे शहरातील अवैध धंदे बंद झाले होते. तथापी पुणे शहर पोलीस आयुक्तांनी श्री. पुराणिक यांच्या अनाकलनिय बदलीनंतर संपूर्ण पुणे शहरात 1 सप्टेंबर पासून जुगार अड्डयासंह वेश्याव्यवसाय, क्लब, सुरू झाले आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा आणि सामाजिक सुरक्षा विभागाने मागील एक महिन्यात बळेच कारवाई करीत असल्याचे अवसान अंगात आणून तोंडदेखलेपणाच्या कारवाया करून स्वतःचे आणि पुणेकरांचे भलतेच मनोरंजन केले असल्याचे दिसून आले आहे.

वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत स्पा सेंटरवर छापा टाकुन 04 पिडीत मुलींची सुटका
सामाजिक सुरक्षा विभागाने अवैध धंदयावरील कारवाई दाखविण्याच्या हेतूने दि.29.ऑगस्ट 2022 रोजी व्हीआयपी फॅमिली स्पा सेंटर केदारी नगर, वानवडी, पुणे येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असलेबाबत गोपनीय माहिती प्राप्त झालेने सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी बनावट गिऱ्हाईक पाठवुन खात्री केली असता, नमुद मसाज सेंटर मध्ये स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळून आल्याने तात्काळ छापा कारवाई करून , सदर ठिकाणावरून एकुण 05 पिडीत महिला त्यापैकी 01 झारखंड , 01 मिझोराम , 01 मणिपूर व 01 थायलंड देश यांची सुटका करण्यात आली आहे .
सदर स्पा सेंटरची महिला मॅनेजर स्पा मॅनेजर नामे प्रिती विकास गायकवाड , वय 33 वर्षे रा . कृष्णा नगर महंमदवाडी , हडपसर , पुणे व पाहिजे आरोपी स्पा मालक – अंकुश जाधव . रा.स.नं 256/1 , लोहगाव , ता . हवेली.जि.पुणे यांचेविरूध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे गुरनं 367 / 2022 भादवि 370.34 सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम 3,4,5 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन , आरोपी महिला स्पा मॅनेजर हिला व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे .
खडकी पोलीस स्टेशन हद्दीत
खडकी बाजारातील वेकायदेशीरपणे चाललेल्या मटका जुगार अड्डयावर छापा
दि .27.08.2022 रोजी मेहता बिल्डींग जवळील सुभान अल्ला सायकल मार्ट समोरील सार्वजनिक रस्त्याच्या कोपऱ्याला खडकी बाजार , पुणे येथे बेकायदेशीरपणे मटका जुगार घेत असलेबाबत मिळालेल्या गोपनिय माहितीची खातरजमा करून सदर ठिकाणी छापा टाकुन , पैशावर बेकायदेशीर मटका जुगार घेणारे व मटका जुगार खेळणारे 10 इसम मिळुन आले . त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातुन रोख रक्कम 42,250 / – रु . घटना त्थळावरून जप्त केले आहे .
सदर प्रकरणी नमुद 10 इसमांविरुध्द खडकी पोलीस स्टेशन येथे गुरनं . 165/2022 , महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12 ( अ ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाईकरीता खडकी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे .
दोन्ही कारवाया सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच पोउपनि श्रीधर खडके , पोलीस अंमलदार , प्रमोद मोहिते , अजय राणे , पुष्पेंद्र चव्हाण , संदीप कोळगे , अमित जमदाडे व महिला पोलीस अंमलदार , मनिषा पुकाळे या पथकाने केली आहे

वानवडी व खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन्ही कारवायांमध्ये धंदयाच्या मुळ मालकांचे नाव, पत्ता नाही, जुगार अड्डा, वेश्याव्यवासाय ठिकाणातील धंदयावर खेळणारे व खेळविणारे किती इसमांना अटक केली याची नोंद नाही, काय मुद्देमाल जप्त केला याचीही माहिती दिली नाही. दरम्यान सामजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कावाईनंतर अवघ्या दीड तासात हे धंदे सुरू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सामाजिक सुरक्षा विभागाची किती दांडगी व जबरी कारवाई झाली हे आपण त्या धंदयावरील कारवाई आणि अवैध धंदा सुरू होण्याच्या  कालावधीवरून जाणून घेऊ शकतो. 
वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदलीमागच कारण समजुन येतनसलं तरी, कारवाई करा पण कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी करू नका असाच संदेश त्यांच्या  बदली आदेशान्वये आणि आजच्या कारवाई धोरणावरून दिसून येत आहे.