Thursday, April 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

खडक पोलीस स्टेशन हद्दीतील गंजपेठेत आढळला 10 लाखांचा गुटखा…

खडक पोलीस स्टेशन हद्दीतील गंजपेठेत आढळला 10 लाखांचा गुटखा…
खंडणी विरोधी पथक 1 कडून गुटखा साठा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या


पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/
पुणे शहरातील कोणत्याही पान टपरीसह किराणा मालाच्या दुकानात गुटखा हमखासपणे मिळत आहे. गुटखा विक्रीवर राज्यात बंदी असतांना देखील हाच गुटखा सर्रासपणे दिसून येत असतो. त्यामुळेच खंडणी विरोधी पथक-1 गुन्हे शाखा पुणे शहर पथकातील अधिकारी सपोनि अभिजीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव व पोलीस अमलदार स्टाफ असे परिमंडळ -1 च्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, इसम नामे साहिल मुलाणी हा 367 , गंज पेठ येथील नुर केटरर्सच्या मागच्या बाजूस असलेल्या खोलीमध्ये विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याची साठवणूक करून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खडक पोलीस स्टेशन हद्दीतील गंजपेठ छापा कारवाई केली असता सुमारे साडेदहा लाख रुपयांचा गुटखा आढळुन आला आहे.


खडक पोलीस स्टेशन हद्दीतील गंज पेठ येथे दोन इसम मिळून आले . त्या इसमाकडे चौकशी करता त्यांनी त्यांची नावे 1 ) खाँजा ऊर्फ साहिल असलम मुलाणी , वय -20 वर्षे , रा.स.नं .367 , महात्मा फुले गंज पेठ , पुणे 2 ) शादाब मुशताक नाईकवाडी , वय -24 वर्षे . रा . छोटी मस्जीद जवळ , 200 , गंज पेठ , पुणे असे असल्याचे सांगितले .
या खोलीमध्ये विमल गुटखा पान मसाला याच्या पुडयांची पाकिटे हे बारदान पोत्यामध्ये भरून ठेवली असल्याचे दिसले. या साठयाच्या मालकी बाबत नमूद दोन्ही इसमांकडे चौकशी केली असता, त्यांनी तो साठा त्यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. सदर ठिकाणची दोन पंचासमक्ष झडती घेतला असता सदर ठिकाणी एकुण 10.56.640/- रुपये किमतीचा विमल पान मसाला गुटखा मिळून आल्याने तो जप्त करण्यात येऊन आरोपी 1) खाँजा ऊर्फ साहिल असलम मुलाणी , वय -20 वर्षे , रा. महात्मा फुले गंज पेठ, पुणे 2 ) शादाब मुशताक नाईकवाडी , वय -24 वर्षे . रा . छोटी मस्जीद जवळ, गंज पेठ , पुणे यांचे विरुध्द खडक पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 188.272,273.328 , 34 व अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 30 (2)(अ)31( 1).26 2) (1)26 (2) अन्नसुरक्षा मानदे कायदा प्रोव्हिविशन ॲन्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल नियमन 2011 चे नियमन 2,3,4 चे उल्लंघन केले आहे . तसेच सह वाचन 3 ( 1 ) चे उल्लंघन केल्याने 59 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथक -1 कडील सपोनि अभिजीत पाटील करीत आहेत.
गंजपेठेतील गुटखा कारवाई, सहायक पोलीस आयुक्त- 1. गुन्हे शाखा, श्री. गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्री अजय वाघमारे , सहा.पो. निरी अभिजीत पाटील , पोलीस उप – निरीक्षक , विकास जाधव , पोलीस अमलदार संजय भापकर , सयाजी चव्हाण , नितीन कांबळे , किरण ठवरे , दुर्योधन गुरव , राजेंद्र लांडगे , विजय कांबळे , प्रफुल्ल चव्हाण यांनी केली आहे .