
पुणे शहर पोलीसांनी ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन केलं,
कोयते, तलवारी, बंदूका पकडल्या, आता गुन्हे करण्यासाठीचे उत्तेजित ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक
पुणे/दि/ नॅशनल फोरम/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुण्यातील गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांनी, कायदयाचा आणि पोलीसांचा धाक, पुण्याच्या मुळा-मुठा नदीत विसर्जित केल्यासारखे, संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. दिवस असो की रात्र, हातात कोयते घेवून नागरीकांना धमकाविणे, हॉटलचालक, टपरीचालकांवर कोयता उगारणे, थांबलेल्या व जात असलेल्या वाहनांवर कोयते मारून वाहनांचे नुकसान करणे सारख्या घटना कधी नव्हे ते पुणे शहरात होत आहेत. पकडण्यात आलेले बहुतांश आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही उत्तेजना नेमकी कशामुळे आली आहे…. कोयते उगारत असतांना त्यांची शारिरीक व मानसिक उत्तेजना याचा विचार करता, देशी विदेशी मदय तसेच गांजा, मेफेड्रॉन, चर्रस, कोकेन किंवा अन्य मादक द्रव्य घेतल्याशिवाय अशा प्रकारची नशा किंवा उत्तेजना निर्माण होऊ शकत नसल्याचा अंदाज मानसोपचार तज्ज्ञ व काही डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गुन्हेगार, गुन्हेगारी टोळ्या, कोयते, तलवारी- ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन करून पकडण्यात आले असले तरी आता पोलीसांनी मादक द्रव्य विकणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
भारती विद्यापीठाच्या यंगस्टार पोलीसांनी ज्या कोयताधारकांना धु.. धु.. धुतले. त्यावेळेस कोयत्या हवेत फिरवुन राडा...धुमाकुळ घालणारे, ते केवळ पोलीसांचा मार सहन करीत होते. परंतु शारिरीक हालचाली व त्यांची चेतना लुप्त झाल्यासारखे दिसून येत होते. तसेच लष्कर व इतर ठिकाणी ज्या युवक व अल्पवयीनांनी राडा घातला, त्यातील साम्य अधिक आढळुन आले आहे. त्यामुळे संबंधित कोयते घेवून राडा घालणाऱ्यांनी मादक द्रव्यांचे सेवन करूनच हा राडा घातला होता की काय असा संशय बळावला आहे. त्यामुळे आता पुणे शहर पोलीसांनी पुनः ऑल आऊट ऑपरेशन करून, पुणे शहरात मादक द्रव्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आहे.
दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 चे श्री. विनायक गायकवाड व पथक क्र. 2 श्री. थोपटे व त्यांची संपूर्ण टिम अहोरात्र काम करीत असल्याचे दिसून येत आहे. मागील दोन महिन्यात अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 चे श्री.विनायक गायकवाड यांनी मोठ्या कारवाया करून कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. तरी देखील अजुन कसुन तपासणी करणे आवश्यक झाले आहे.
पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत गुटखा आढळुन येत आहे. गांजा देखील ठायी ठायी मिळत आहे. पुणे शहरातील काही स्लम विभागात देखील मादक द्रव्य विक्री करणारे डिटेक्ट होत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बारकाईने वॉच ठेवून, ड्रग्ज चे मोठे मासे गळाला लावण्याचे पर्यतीय काम आता पुणे पोलीसांवर आहे. एकट्या अंमली पदार्थ विभागावर जबाबदारी ढकलणे पुरेसे नाहीये असेही मत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.