Thursday, April 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Latest Marathi News On Google

बाई ऽऽ बाई ऽऽऽ… मनमोराचा (स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत) कसा पिसारा फुलला…

बाई ऽऽ बाई ऽऽऽ… मनमोराचा (स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत) कसा पिसारा फुलला…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/दिनांक 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीपासून स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील गैरकायदयाच्या कृत्यांबाबत जनजागृतीला सुरूवात केली. स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत अंडरवर्ल्डचे नाव घेवून व लाईन बॉयच्या सुरात स्वारगेट पोलीस स्टेशन लगत जुगाराचा क्लब सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावले यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. आज 13 तारीख आहे. तरी देखील जुगाराचा क्लब अजुनही बंद झालेला नाही. त्यामुळे 18/22 तास चालणारा जुगाराचा क्लब नेमका कुणाचा आहे याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन लगत असलेला क्लब -डॉनचा की लाईन बॉयचा -स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेला जुगाराचा क्लब हा सुमारे 18 ते 22 तास सुरू असतो. गणेशोत्सवाच्या काळात तर जुगाऱ्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशन लगत सुरू असलेला ज...
कोयते,तलवारी, बंदूकांनतर आणि ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक

कोयते,तलवारी, बंदूकांनतर आणि ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक

पोलीस क्राइम
पुणे शहर पोलीसांनी ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन केलं,कोयते, तलवारी, बंदूका पकडल्या, आता गुन्हे करण्यासाठीचे उत्तेजित ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक पुणे/दि/ नॅशनल फोरम/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुण्यातील गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांनी, कायदयाचा आणि पोलीसांचा धाक, पुण्याच्या मुळा-मुठा नदीत विसर्जित केल्यासारखे, संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. दिवस असो की रात्र, हातात कोयते घेवून नागरीकांना धमकाविणे, हॉटलचालक, टपरीचालकांवर कोयता उगारणे, थांबलेल्या व जात असलेल्या वाहनांवर कोयते मारून वाहनांचे नुकसान करणे सारख्या घटना कधी नव्हे ते पुणे शहरात होत आहेत. पकडण्यात आलेले बहुतांश आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही उत्तेजना नेमकी कशामुळे आली आहे…. कोयते उगारत असतांना त्यांची शारिरीक व मानसिक उत्तेजना याचा विचार करता, देशी विदेशी मदय तसेच गांजा, मे...
पुणे शहरातील उपनगरापाठोपाठ मध्यवर्ती शहरातील लष्करसह शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगचा धुडगूस

पुणे शहरातील उपनगरापाठोपाठ मध्यवर्ती शहरातील लष्करसह शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगचा धुडगूस

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय, कायदयाचा आणि पोलीसांचा धाक कुठे नाहीसा झाला या विषयावर मागील तीन आठवड्यांपासून गुन्ह्यांच्या घटना आणि कोयता खोरांच्या दहशतीच्या अनुषंगाने नॅशनल फोरमध्ये प्रश्नमालिका सुरू असतांनाच आज लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतही अल्पवयीन मुलांनी दिवसाढवळ्या हातात कोयता घेवून दहशत माजविली आहे. तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी मोक्का आणि एमपीडीए मध्ये प्रत्येकी शतक गाठल्याचा गवगवा केला, परंतु त्याचे उलट परिणाम तर होत नाहीयेत ना ही देखील आज तपासून पाहण्याची वेळ आली आहे. मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीची होऊन होऊन दोन तीन वर्षे शिक्षा होईल. परंतु आपणही भाई होणार या विषारी अमिषातून तर हे कृत्य पुणे शहरात होत नाहीयेत ना याचीही मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी होणे आवश्यक आहे. दरम्यान कायदयाला आणि पोलीसांना आव्हान देणाऱ्यांवर कठोर का...