Thursday, May 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

कैलास वाळेकर नियुक्ती प्रकरणांत आयुक्त विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय, ईडीसह ॲन्टी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करा , मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदासाठी 50 लाख नाय, कोट्यवधी रुपयांची उड्डाणे…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेतील उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावर कार्यरत असलेले श्री. कैलास वाळेकर हे पुणे महापालिकेच्या सेवेत 2011 साली नेमणूक झाली. परंतु ते रुजु झाले नाहीत. त्यांच्या 16/12/2011 च्या आज्ञापत्रकात अट क्र. 8 मध्ये नमूद आहे की, संबंधित उमेदवार हे आज्ञापत्रकाच्या दिनांकापासून 15 दिवसांचे आत कामावर हजर न झाल्यास त्यांची नेमणूक रद्द समजण्यात येईल असे नमूद केले आहे. तरी देखील श्री. वाळेकर हे रुजु झाले नाहीत. आज्ञापत्रकाच्या चार वर्षानंतर त्यांना पुणे महापालिकेत रुजु करून घेण्यात आले. तथापी वाळेकर यांनी पुणे महापालिका नियमभंग केलेला असतांना देखील तसेच प्रोव्हिबिशन परियड पूर्ण केलेला नसतांना देखील त्यांची सेवा विलोपित करून सेवेत कायम करून घेवून त्यांना थेट टॅक्स विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. तत्कालिन अति. आयुक्त श्री. राजेंद्र जगताप व उपआयुक्त सामान्य प्रशासन श्री. मंगेश जोशी यांनी याच दर्जाचा हीनकस कारभार पुणे महापालिकेत केला आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी पुणे महापालिकेत लिपिक टंकलेखक पदाची भरती करण्यात आली. त्यात नेमणूक दिलेल्या काही उमेदवारांनी टंकलेखनाचे प्रमाणपत्र जोडले नाही म्हणून त्यांना तत्काळ काढुन टाकण्यात आले आहे. वास्तविक पाहता, नियुक्तीनंतर दोन वर्षात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते हा नियम आहे. परंतु त्या भावी सेवकांना तत्काळ काढुन टाकले, वाळेकर यांना मात्र तब्बल 4 वर्षानंतर रुजु करून घेण्यात आले आहे. खाली सर्व दस्तऐवज बातमी जोडले आहेत. अभ्यासु पुणेकरांची याचा विचार करावा. दरम्यान राजेंद्र जगताप व मंगश जोशी सारख्यांनी पुणे महापालिकेचे उध्वस्तीकरण केले आहे, आता सनदी अधिकारी विक्रम कुमार आणि रविंद्र बिनवडे यांच्यासह सचिन इथापे देखील तेच कृत्य करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार किती तळापर्यंत मुरला आहे त्याच्या ही साक्ष आहे.

प्रशासक व आयुक्त श्री. विक्रम कुमार यांची आता बदली करा-
पुणे महानगरपालिकेतील आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी भरती, पदोन्नती आणि बदली तसेच प्रभारी व अतिरिक्त पदभार, प्रतिनियुक्ती यांमध्ये जे भ्रष्टाचार केलेले आहेत ते भ्रष्टाचार हर्षद मेहता घोटाळा, स्टॅम्प पेपर तेलगी घोटाळा यांपेक्षाही मोठे असल्याने यांची चौकशी ही ईडी व सीबीआय मार्फत करण्यात येऊन यांची पुणे जिल्हयात 3 वर्षे पेक्षा जास्त काळ सेवा झाल्याने बदली करण्यात यावी.

विक्रम कुमार, रविंद्र बिनवडे यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांवर दिवाणी व फौजदारी खटले चालविण्यात यावे –
कैलास वाळेकर उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी वर्ग एक या पदावर नेमणूक ही आयुक्त विक्रम कुमार यांनी दिलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार आयुक्त व अतिरिक्त आयुक्त, इतर खाते प्रमुख व सेवकांनी / अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेमध्ये, बदली प्रक्रियेमध्ये तसेच पदोन्नती प्रक्रियेमध्ये स्वतःचे हितसंबंध असता कामा नये, अथवा लाभार्थी अथवा तेथे कुठलाही फायदा असता कामा नये, असे स्पष्ट नमूद केलेले आहे. तरीसुद्धा या प्रकरणांमध्ये आयुक्त विक्रम कुमार अतिरिक्त आयुक्त बिनवडे, खाते प्रमुख उल्का कळसकर, नगरसचिव तथा मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर तसेच इतर संबंधित दोषी या सर्वांनी या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार करून संगनमत करून सेवा प्रवेश नियमावली मध्ये स्वतःच्या मनाप्रमाणे बदल करून श्री. वाळेकर यांना थेट वर्ग 3 ते वर्ग 1 असे जम्पिंग प्रमोशन दिलेले आहे. या भ्रष्टाचारामुळे या सर्वांना बडतर्फ करून यांच्यावर दिवाणी व फौजदारी खटले चालवण्यात यावे.

प्रशासक विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची जुलमी राजवट- पैसे घेवून या आणि आदेश घेवून जा… या प्रवृत्तींविरूद्ध संघर्ष करणे आवश्यक आहे-
श्री. वाळेकर यांची नेमणूक या पदावर करण्याची आजच अशी काय गरज होती? जेणेकरून हे भ्रष्ट अधिकारी आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त व रविंद्र बिनवडे हे आल्यानंतर तात्काळ बेकायदेशीर पदोन्नत्या देण्यात येत आहेत. तत्काळ बदली आणि भरती, पदोन्नती बेकायदेशीररित्या करण्यात येत आहे. बेकायदेशीररित्या ठराविक उमेदवार डोळ्यासमोर ठेवून आयुक्त विक्रम कुमार अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे हे सेवा प्रवेश नियमावली 2014 म्हणजेच रिक्रुटमेंट रुल म्हणजेच आकृतीबंधामध्ये मनाप्रमाणे स्वतःच्या सहीने बदल करून संबंधितांकडून आर्थिक देवाण-घेवाण करून सेवा प्रवेश नियमावली मध्ये बदल करत असून त्यानुसार भरती, पदोन्नती करत आहेत.

 तसेच ही भरती करण्यासाठी याच प्रशासकराज कालावधीमध्ये अनेक बदल सेवा प्रवेश नियमावलीमध्ये का केले गेलेले आहेत? ते बदल करण्याची गरज काय होती? ते बदल करण्यासाठी कोणी आणि का सांगितलेले होते? हे अनुत्तरीत आहे येथे फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी ठराविक उमेदवार समोर ठेवूनच बदल करण्यात आलेले आहेत.

श्री. वाळेकर यांचा त्या पदाचा अनुभव नसतांना, त्यांची नियुक्ती कशाच्या आधारे केली –
श्री. वाळेकर यांच्या नेमणुकीमध्ये त्यांच्या पदानुसार पात्रतेनुसार वाळेकर यांना याच पदावर बसवायचे म्हणून फक्त बदल करण्यात आलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे वाळेकर हे मुख्य लेखापाल या कार्यालयात कामास नव्हते अथवा त्या अगोदर त्यांनी त्या खात्यामध्ये काम केलेले नाही, तरीही त्यांना या खात्यामध्ये पदोन्नती देण्यात आलेली आहे. तसेच वाळेकर यांना उपमुख्य लेखा वित्त अधिकारी या पदाचा अनुभव नाही व (सीए) चार्टर्ड अकाउंटंट या पदाचाही अनुभव नाही. म्हणजेच एकंदरीत पाहता वाळेकर यांना पदाचा, शिक्षणाचा आणि खात्याचा असे तीनही अनुभव नसताना तेथील पात्र सेवकांना डावलून जे सेवाजेष्ठ व अनुभवी आहेत त्यांना डावलून मनाप्रमाणे बदल करून एम. कॉम. व इतर बदल करून अटी रद्द करून, शिथिल करून, तसेच या पदाला अनुभवाची अट दाखवलेलीच नाही, म्हणजे अनुभव एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष, चार वर्षे, पाच वर्ष अशी अनुभवाची अट ठेवलेलीच नाही असे का? इतर पदांना मात्र सर्वत्र अनुभवाची अट स्पष्टपणे असणे गरजेचे आहे व ती नमूद आहे.

परंतु येथे अशी अट ठेवलेली नाही. फक्त भ्रष्टाचार करून वाळेकर यांना नेमणूक देण्यासाठीच मनमानी बदल नियमावली मध्ये केलेले आहेत. आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे मनमानी, भ्रष्टाचारी पद्धतीने काम करत आहेत हेच येथे दिसत आहे.

आकृतीबंधात आत्ताच बदल का केले, 15 वर्ष हे पद का भरले नाही-
श्री. वाळेकर यांना या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी घाई गडबडीत तात्काळ प्रमोशन देण्याचे कारण काय? 2014 साली सेवा प्रवेश नियमावली झाली, त्यानंतर दहा वर्षानंतर प्रमोशन देण्याचे अथवा ते पद भरण्याचे त्या पदांमध्ये बदल करण्याची काय गरज होती? इतके वर्ष ते पद रिक्त का ठेवलेले होते? जेणेकरून आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांना भ्रष्टाचार करून ते पद भरावायचे होते व ठराविक उमेदवार व ठराविक भ्रष्ट अधिकारी आलेले असल्यामुळे हे सर्व जुळून आल्यामुळे तात्काळ सर्व भ्रष्ट उमेदवारांनी मनाप्रमाणे सेवा प्रवेश नियमावली मध्ये बदल करून पदोन्नती, बदली व भरती केलेली आहे. याच काळात अनेक पदांवर अनेक जणांना बेकायदेशीर पदोन्नत्या, भरती मध्ये भ्रष्टाचाराने नियुक्ती कागदपत्रे, अनुभव पात्रता नसताना मिळालेली आहेत, बदली मनाप्रमाणे मिळालेल्या आहेत ते पुढे आपण सविस्तर पाहू.

या प्रश्नांची उत्तर आयुक्त विक्रम कुमार, रविंद्र बिनवडे यांच्यासह सचिन इथापे यांनी दयावी-
1. श्री. वाळेकर हे परीक्षाविधीन कालावधीमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये रुजू झालेले नसतानाही त्यांना तात्काळ बडतर्फ करणे गरजेचे असतानाही तसे का केलेले नाही?
2.तसेच पुन्हा रुजू करून घेताना सेवा विलोपित केली ती कुठल्या नियमाने केली?

3. तसेच कमीत कमी परीक्षाविधिन कालावधी पूर्ण केल्यानंतर किंवा तीन ते पाच वर्षे झाल्यानंतरच सेवक इतर लाभ घेण्यास, पदोन्नती घेण्यास पात्र होतो व तसे लाभ मिळणे योग्य आहे. परंतु कुठल्या कलमानुसार? कुठल्या नियमानुसार? कुठल्या अधिनियमानुसार? सेवा विलोपित करता येते? याची माहिती सर्वांनी घ्यावी व आम्हालाही द्यावी. सर्व चुकीचे केलेले असल्यामुळे इतर पात्र सेवकांना त्रास देण्याचे व डावलण्याचे काम जाणीवपूर्वक पाकिटे न मिळाल्याने सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

4. वाळेकर यांना रुजू करून घेतल्यानंतर थेट कर आकारणी व कर संकलन विभागामध्ये नेमणूक दिलेली आहे. तिथे वाळेकर यांनी 5 ते 6 वर्षे सेवा केली 3 वर्षे बदलीचा नियम वाळेकर यांना लागू नव्हता का? इतर भ्रष्टाचारी सेवकांना तो नियम लागू नाही का? म्हणजेच टॅक्स विभागांमध्ये नेमणूक देण्यासाठी काय रेट झालेला आहे? हे अरविंद शिंदे यांनी जगजाहीर केलेले आहे व  तक्रारी सुद्धा दिलेल्या आहेत 10 लाख, 20 लाख, 30 लाख असे प्रत्येक बदली, पदोन्नती मागे रेट ठरलेले आहेत. 

5. नवीन सेवकास टॅक्स, बांधकाम, आकाश चिन्ह, अतिक्रमण अशी संवेदनशील व महसुली खाती किमान 6 वर्षे सेवेनंतर  देण्यात यावीत म्हणून मुख्य सभेने 2005 सन नियमावली तयार केलेली आहे. त्यामुळे त्या सर्वात फक्त मनमानी करणे व आर्थिक भ्रष्टाचारामुळे ही कामे सुरू आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेचा व मुख्य सभेचा अवमान व अपमान होत आहे हे स्पष्टपणे दिसून येत असून मुख्य सभेच्या आदेशाचा व ठरावांचे पालन न करता मनमानी पद्धतीने कामकाज सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यास दोषी जबाबदार आयुक्त व प्रशासक श्री. विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे हेच सर्वस्वी असल्याचे दिसून येत आहे. 

वाळेकर यांना दिलेल्या सवलती इतर सेवकांना का लागु करीत नाहीत, पात्र सेवकांवर का अन्याय करीत आहात
श्री. वाळेकर यांच्या नेमणुकीच्या वेळी जे बदल करण्यात आलेले आहेत ते बदल सर्व सेवकांसाठी का केलेले नाहीत? पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक अनुभवी व उच्चशिक्षित सेवक आहेत परंतु त्यांना डावलून बाहेरून भरती करून अथवा पदोन्नती करून भरती प्रक्रिया आज रोजी सुरू आहे.(उप कामगार अधिकारी वर्ग 3 पदोन्नतीने भरती, सहाय्यक विधी अधिकारी वर्ग दोन, एस आय / डी एस आय वर्ग 3, इंजिनिअर भरती वर्ग 3 यांसारख्याच इतर भरती. काही प्रकरणे मेहेरबान मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.) परंतु त्या पात्र व सेवा ज्येष्ठ सेवकांना डावलने म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे नाही का? त्यांना सेवेत कुजवण्याचे काम सुरू आहे का? त्यांच्याकडे भ्रष्टाचाराच्या रकमा नाहीत, म्हणून त्यांना न्याय मिळत नाही का? तसेच वाळेकर हे उच्चशिक्षित असल्याने त्यांना वर्ग तीन पदावरून थेट वर्ग एकच्या पदावर पदोन्नती दिली तशी पदोन्नती इतर पात्र, सेवाजेष्ठ व उच्चशिक्षित सेवकांना का दिली जात नाही? ती देण्यात यावी अशी मागणी सेवक करत आहेत.

 तसेच प्रमोशन साठी 100 टक्के व प्रमोशनने सेवक न मिळाल्यास सरळसेवेने भरण्याची तरतूद ठेवलेली आहे. तसेच सरळ सेवेने प्रमोशनने दोन्ही पद्धतीने सेवक न मिळाल्यास, प्रतिनियुक्तीने घेण्यात यावे अशी तरतूद केलेली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुणे महानगरपालिकेतील सर्व पदांसाठी अशी तरतूद का केलेली नाही?
हे सर्व सेवकांच्या फायद्याचे असून आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांना सेवकांचा फायदा नको, असून सामान्य प्रशासन विभाग यांनाही सेवकांचा फायदा नको आहे. फक्त पाकीट सिस्टीम पाहिजे आहे का? म्हणून मनमानी पद्धतीने मनाप्रमाणे उलट सूलट सेवा प्रवेश नियमावली मध्ये बदल संगनमताने, जाणीवपूर्वक घडवत आहेत असे करत आहेत का? की जे पात्र, सेवाज्येष्ठता धारक सेवक आहेत, त्यांना जागा मिळणार नाहीत व जे संबंधित भ्रष्टाचारी सेवक / अधिकारी खाते प्रमुख आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या जवळचे देण्या घेण्यातले आर्थिक भ्रष्टाचार करणारे सेवक आहेत त्यांनाच तेथे वाव मिळेल. यास न्याय कोण देणार आणि कधी देणार आहे? असा सवालही आज वाळेकर प्रकरणांवर पुणे महापालिकेतील शेकडो पात्र सेवक विचारत आहेत. 

पाव्हण्याने चांगला इंगा दाखविला –
पुणे महापालिकेचे अति. आयुक्त ज श्री. रविंद्र बिनवडे हे पुणे शहरातील युनिक ॲकेडमी येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करत होते. त्यात स्पर्धा परिक्षेत पास झाले. पुणे शहरात आज हजारो विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहेत. पुण्याचे पाणी,वीज, याच्यासह जेवणाचे डब्बे देखील पुणेकर अल्प किमतीत देत आहेत. अभ्यासाठी पुरक वातावरणासह आवश्यक ती मदत पुणेकर देत आहेत व आजही देत आहेत. आज त्याच पुण्यात श्री. बिनवडे यांची सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, पाव्हण्यान केसान गळा कापला असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

आज पुणे शहरात रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. सगळीकडे रस्त्यावर खड्डे पडले आहेत, पाण्याचे असमान वाटप होत आहे, पुण्यातील पेठांतील रस्त्यांची, गल्ली बोळांची वाट बिकट आहे. जुन्या वाड्यांचा प्रश्न आजही अधांतरी आहे. शेकडो प्रश्न आहेत. ते सोडविण्याचे सोडून बदली, पदोन्नती, आकृतीबंधातील बदल आणि नेमणूका आणि त्यातील भ्रष्टाचार समोर येत आहेत. पाव्हण्यानं पुणेकरांचा केसान गळा कापला, हे उद्गार अतिशय उद्ववेगाने बाहेर आले आहेत. निदान आता तरी आमच्या समस्या सोडवा अशी पुण्याच्या पाव्हण्याला विनंती आहे.