Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

अंमली पदार्थांच्या तस्करीतील फरार आरोपींची, विनायक गायकवाड यांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडून धरपकड
लोणीकंद व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील ड्रग्जमाफियांच्या मुसक्या आवळल्या

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुणे शहरात गांजा, मेफेड्रॉन, चर्रस, अफिम, कोकेन सारखी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर धाडीचे सत्र सुरू असतांनाच, कारवाई करतांना फरार आरोपींची देखील कसुन चौकशी करून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 कडून करण्यात येत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड यांच्यासह संपूर्ण पथकाकडून धडपकडीचे सत्र सुरू आहे. सलग दोन दिवसात अनेक आरोपी पकडले गेले असून येरवडा व लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

काल संगमवाडी येथील संगमवाडी ब्रिज परिसरात इसम नामे अफजल इमाम नदाफ व अर्जुन विष्णु जाधव हे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथक 1 यांना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. 11/2023 एन. डी. पी. एस ॲक्ट कलम 8 (क), 22 (क) 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर हया करीत असुन नमुद गुन्हयातील आरोपी नामे अर्जुन विष्णु जाधव, वय 32 वर्षे, रा. राजुगांधी नगर वसाहत, बालगुडे यांचे बिल्डींग समोर संगमवाडी पुणे. हा सहा महिन्यापुर्वी मोक्यामधुन जामीनावर सुटला असल्याचे समजले तसेच आरोपी नामे अफजल इमाम नदाफ वय 26 वर्षे, रा. नई जिंदगी गल्ली सितारा चीक, सी.पी. ऑफिस जवळ, सोलापुर याने त्यांचेकडे मिळुन आलेला मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, मुंबई येथील एका महिलेने त्यास विक्री करण्याकरता दिला असल्याचे तपासात निपन्न झाल्याने व सदरची महिला ही सांताक्रुज मुंबई येथे राहत असल्याची खबर पोलीस अंमलदार मारुती पारधी व पोलीस अंमलदार मनोजकुमार साळुंके यांना मिळाली.

याबाबत पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड यांना महिती दिली असता लागलीच नमुद महिलेस ताब्यात घेणे बाबत आदेश दिले. दिलेल्या आदेशाप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढंगळे यांनी स्टाफसह सांताक्रुज मुंबई या परिसरात सदर महिलेचा शोध घेवुन अत्यंत शिताफीने तिला ताब्यात घेतले असता, सदरच्या महिलेचे नाव जेलुखा मोहम्मद हुसेन कुरेशी ऊर्फ जुलैखावी ऊर्फ जिल्लो वय 40 वर्षे, रा. टि 17. सय्यद अलीव्ह, प्रभात कॉलनी लेन नं.9, सांताक्रुझ (ईस्ट) अंधेरी, असे असुन ती रेकॉर्डवरील क्रियाशिल गुन्हेगार असल्याचे तसेच तिचे विरुध्द अंमली पदार्थ विरोधी पथक मुंबई यांनी गुरनं 693 / 2014 एनडीपीएस कलम 8 (क), 20 (ब), 2.06/2012 एनडीपीएस कलम 8 (क) 21, असे गुन्हे नोंद असुन खडक पोलीस ठाणे पुणे शहर गुरनं 492/2017 एनडीपीएस कलम 8 (क), 21 (ब), 29 सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंद कायदा या गुन्हयात ती 5 वर्षापासुन पाहिजे असल्याचे समजले.
या महिलेस येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. 11/2023 एन. डी. पी. एस ॲक्ट कलम 8(क). 22 (क). 29 मध्ये अटक करण्यात आली आहे. आरोपी क्र. 1 ते 3 यांची दि.09/01/2023 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन पुढील तपास सुरु आहे.

गांजा तस्करीतील गुन्हयामध्ये सुमारे एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपी जेरबंद-
आरोपी नामे कैलास साहेबराव पवार, वय 35 वर्षे, रा.गट नंबर 366 गडदेवस्ती डोंगरगाव,पेरणे, वाडेबोल्हाई रोड पुणे. याचे राहते घरातुन व चारचाकी गाडीतुन एकुण 33,41,900/- रुपये चा ऐवज त्यामध्ये 128 किलो 765 ग्रॅम गांजा, हा अंमली पदार्थ किं रु. 25,75,300/- रोख रुपये 50,600/- एक मोबाईल फोन कि रु 15,000/- चा एक चारचाकी गाडीतुन कि रु 7,00,000/- असा हा अंमली पदार्थ व ऐवज मिळुन आल्याने जप्त करण्यात आला होता. त्यानुसार त्याचे विरुध्द लोणीकंद पोलीस ठाणे 49/2022 एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8 (क) 20 (ब) (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या गुन्हयामध्ये आरोपी कैलास पवार याचेकडे मिळुन आलेल्या 128 किलो 765 ग्रॅम गांजा बाबत तपास करता तो त्याने अहमदनगर येथील इसम नामे किशोर किसनराव जेजुरकर रा. केडगाव, अहमदनगर लोढेमळा याचेकडुन विक्री करीता आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.  त्याअनुषंगाने अहमदनगर येथे जावुन किशोर जेजुरकर याचा शोध घेतला असता तो फरार झाला असल्याचे समजले. अमली पदार्थ विरोधी पथक 1 कडील पोलीस अंमलदार योगेश मोहिते यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोणीकंद पोलीस ठाणे गु.र.नं. 49/2022 एन.डी.पी.एस ॲक्ट कलम 8(क)20(ब)(क) मधिल पाहिजे आरोपी नामे किशोर किसनराव जेजुरकर रा. केडगाव अहमदनगर लोढेमळा हा त्याचे रहाते घरी केडगाव येथे आला आहे. 

सदरची माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांना कळवुन मिळालेल्या माहिती नुसार केडगाव, अहमदनगर लोढेमळा येथे जावुन नमुद आरोपीस ताब्यात घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. मा. वरिष्ठांचे परवानगीने व आदेशान्वये बातमीतील ठिकाणी पोहचल्यानंतर आरोपीचे घराभोवती सापळा रचुन अत्यंत शिताफीने त्यास ताब्यात घेतले आहे.
वरील नमुद कारवाई ही अंमली पदार्थ विरोधी पथक, 1 गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार योगेश मोहिते, मनोजकुमार साळुंके, विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी ज्ञानेश्वर घोरपडे, राहुल जोशी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव यांनी केली आहे.