Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

ड्रग्जमुक्त पुण्यासाठी… पुणे शहर पोलीस सरसावले, पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 व 2 ची धडक कारवाई

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
कुठलीही नशा आरोग्यासाठी घातकच असा इशारा देऊनही ती नशा करण्यात सुसंस्कृत पुणे शहरात महाभाग कमी नाहीत. दारू, गांजा, अफू, भांग, ड्रग्जच्या नशेच्या या धुंदीत पुणे शहरासह संपूर्ण देशाला पोखरून टाकले आहे. देशात 10-17 वर्षे वयोगटातील 1.58 कोटी मुले ड्रग्जच्या आहारी गेली असल्याचे समोर आले आहे. तर 16 कोटी लोक दारूचे सेवन करतात. 3 कोटी लोक गांजा व 22.6 दक्षलक्ष लोक अफुचा वापर करतात. तसेच इतर मेफेड्रॉन, चर्रस, कोकेन सारख्यांची तर संख्या कोटीच्या कोटी पुढे गेली असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. दरम्यान पुणे शहर पोलीस दलातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने देखील कंबर कसली असून, संपूर्ण पुणे शहरात अंमली पदार्थांवर धाडी टाकण्याचे सत्र सुरू आहे. मागील आठवड्यात कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत 2 कोटी 20 लाख रुपयांचा कोकेन ड्रग्ज जप्त करण्यात आला होता. तर हडपसर येथे 22 किलोचा गांजा जप्त करण्यात आला. चालुच्या आठवड्यात अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 यांनी कोंढवा व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ धडक कारवाई करून येरवड्यात अडीज लाख तर कोंढव्यात सव्वा लाखाचा एम.डी. जप्त करण्यात आला आहे. तसेच पथक क्र. 2 यांनी मार्केटयार्ड, कोरेगाव पार्क व बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा कारवाई करुन चरस, गांजा व मॅफेड्रॉन (एम.डी) असा 9 लाख 34 हजार 560/- रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे.

कोंढवा व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ धडक कारवाई,
येरवड्यात अडीज लाख तर कोंढव्यात सव्वा लाखाचा एम.डी. जप्त
दिनांक 10 डिसेंबर 2012 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखा पथकातील अधिकारी पोलीस अंमलदार परिमंडळ-1.2.3 कार्यक्षेत्रामध्ये अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने माहिती काढणे करीता पेट्रोलिंग करीत असताना, पुणे कोंढवा खुर्द येथील साळुंके विहार रोड, कमेला सलार हाऊस कमेला कोंढवा येथील अंशार जनरल स्टोअर समोर सार्वजनिक रोडवर आरोपी अब्बास युसुफ शेख, वय 40 वर्षे, रा. महात्मा फुले वसाहत, फकिरी हिल्स जवळ, कमेला कोंढवा, पुणे हा त्याचे ताब्यात एकुण कि.रु. 1 लाख 15हजार 850/- ऐवज त्यामध्ये कि.रु.1 लाख 4 हजार 850/- चा 06 ग्रॅम 990 मिली ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ, एक इलेक्ट्रीक वजनकाटा व एक मोबाईल हॅण्डसेट असा ऐवज व अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आलेने त्याचे विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन येथे एन. डी. पी. एस. ॲक्ट कलम 8 (क). 22 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करून पुढील तपासकामी कोंढवा पो.ठाणे, पुणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
दरम्यान याच दिवशी अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखा पथकातील अधिकारी व अंमलदार हे येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, येरवडा येथील गाडीतळ चौकातुन गुंजन टॉकिज चौकाकडे जाणा-या नगर रोडवर इंडीयन ऑईल पेट्रोलपंपा समोरील सार्वजनिक रोडवर आरोपी नामे बिलाल मस्तान शेख, वय- 21 वर्षे, रा. कामराज नगर, लक्ष्मीनगर, येरवडा पुणे याचे ताब्यात एकुण किं.रु. 2 लाख 54 हजार 50/- चा ऐवज त्यामध्ये कि.रु. 1 लाख 66 हजार 50 रु चा 11 ग्रॅम 070 मिलीग्रॅम वजनाचा एम.डी. अंमली पदार्थ, एक मोटार सायकल, 01 मोबाईल हॅण्डसेट असा ऐवज व अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने सदर इसमाविरुध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8 (क), 22 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून नमुद आरोपीस अटक करून पुढील तपासकामी येरवडा पो. ठाणे, पुणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
वरील नमुद कारवाई ही अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा.पो निरीक्षक लक्ष्मण डेंगळे पोलीस अंमलदार, मनोजकुमार साळुंके, संदिप शिर्के, विशाल दळवी, सुजित वाडेकर, मारुती पारधी, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, नितेश जाधव, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख योगेश मोहिते यांनी केली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक दोनची दमदार कामगिरी,
मार्केटयार्ड, कोरेगाव पार्क व बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत छापा कारवाई करुन
चरस, गांजा व मॅफेड्रॉन (एम.डी) असा 9.34,560/- रुपयांचा अंमली पदार्थ तीन आरोपींकडून जप्त केला…
तसेच बनावट व विषारी ताडी बनविण्या करीता क्लोरलहाईड्रेटची विक्री करणारा मोक्का गुन्हयातील व इतर आठ गुन्हयांत फरारी असलेल्या आरोपीस अंमली पदार्थ विरोधी पथक 2 कडुन जेरबंद केले.
अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक एस. डी नरके, तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडील अंमलदार यांनी दि. 10/12/2022 रोजी पासून विशेष मोहिम राबविली असता लोणी- काळभोर पोस्टे गु.र.नं.452 / 2021. भा. द.वी. कलम 328,34, लोणीकाळभोर पो. ठाणे गु.र.नं.452 / 2021. भा. द.वी. कलम 328.34 महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (अ) (ब) (क) (ड) (ई) 66 (क) (ड). 81.83.90 तसेच महाराष्ट्र विष कायदा 1919 चे कलम 2 अ आणि 6 या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधि. सन 1999 मे कलम 3(1)3(2),3(4) चा अंतर्भाव करणेकामी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधि कलम 23 (1) (अ) मधिल व इतर आठ गुन्हयांमध्ये फरारी असलेला आरोपी नामे निलेश विलास बांगर, वय 40, रा. कुरकुटे यस्ती पिंपळगांव ता.आंबेगाव, मंचर, जि. पुणे हा मंचर येथे येणार असल्याची बातमी पोलीस अंमलदार संदिप जाधव यांना मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन त्यास दि. 10 डिसेंबर 2022 ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
तसेच दि. 11 डिसेंबर 2022 रोजी पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेल्या बातमीवरून अंमली पदार्थ विरोधी पथक 2 कडील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन टैंडर स्टेप प्री स्कुल जवळ, बुऱ्हानी कॉलनी, न्यू ईरा सेसासायटी. गंगाधाम, मार्केट यार्ड, पुणे येथे सार्वजनिक रोडवर इसम सुरेश सिध्दाराम नाटेकर वय 33 रा न्युईरा सोसायटी, गंगाधाम, मार्केटयार्ड, पुणे यास पकडुन त्याच्या ताब्यात 2 लाख 31 हजार रुपयांचा 231 ग्रॅम चरस व 10 हजार रू कि.चा व्हियो कंपनीचा मोबाईल असा एकुण 2 लाख 41 हजार रु चा ऐवज जप्त करुन त्याचे विरुध्द मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8 (क). 20(ब) () (च) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तसेच दि 13 डिसेंबर 22 रोजी पोलीस अंमलदार मयुर सुर्यवंशी व पोलीस अंमलदार, चेतन गायकवाड यांना मिळालेल्या बातमीवरून अंमली पदार्थ विरोधी पथक 2 कडील अधिकारी व अंमलदार यांनी एच.पी पेट्रोलपंप समोर, कोरेगांव पार्क येथे जाणा-या रोड लगत आर. जे. बाईक पॉईन्ट समोर, कोरेगाव पार्क, पुणे येथील सार्वजनीक रोडवर सापळा रचुन ओरीसा राज्यातुन आलेला इसम नामे आकाशचंद्र पार्थव नायक, वय 27, रा.ओडीसा याच्या ताब्यातुन किंरु. 4 लाख 83 हजार 560/- चा 24 किलो 178 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त करुन त्याचे विरुध्द कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट 8 (क), 20 (ब) () (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान दि 15 डिसेंबर 2022 रोजी पोलीस अंमलदार साहिल शेख व पोलीस अंमलदार अझिम शेख यांना मिळालेल्या बातमीवरून अंमली पदार्थ विरोधी पथक 2 कडील अधिकारी व अंमलदार यांनी पुणे स्टेशन परिसरात सापळा रचला असता इसम जावेद अजीज सय्यद वय 33 रा मिठानगर, चेतना गार्डन च्या समोर, कोंढवा पुणे हा त्याच्या ताब्यात किं.रु.2 लाख 20 हजार रु कि.चे 11 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करुन त्याचे विरुध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8(क) 22 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
वरील नमुद कारवाई ही अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक, एस. डी. नरके, संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, रविद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, साहिल शेख, दिशा खेवलकर, आझीम शेख, मांढरे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.