Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे पोलिसांकडून दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थाची बाजारपेठ होत आहे काय….

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 व 2 यांनी मागील आठवड्यात टाकलेल्या छाप्यात सुमारे दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान गुन्हे शाखा युनिट यांनी देखील मोठी कारवाई करून सुमारे 5 लाख 19 हजार रुपयांचे चरस अंमली पदार्थासह 3 तलवार, 2 कुकरी, 1 सत्तुर, 1 कु-हाड, 1 चाकु, 1 रापी अशी बेकायदेशिररित्या हत्यारांसह सुमारे 5 लाख 72 हजार 50 रु चा माल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ पथकाचे विनायक गायकवाड यांनी तर अंमली पदार्थाविरूद्ध मोहिम उघडली आहे. मागील सहा महिन्यात सुमारे 10 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. थोडक्यात मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थांची बाजारपेठ होत चालली आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात काही घटनांचा आढावा घेतला आहे.

उनजो ऑनलाईन डिलीव्हरी ॲपचा वापर करून एल.एस.डी. अंमली पदार्थ उच्च-शिक्षीत तरुणांकडून विक्री, 51 लाख 60 हजार रुपयांचा साठा केला जप्त-
मागील आठवड्यात 23 मे रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडील अधिकारी व स्टाफ पुणे शहरात पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार विशाल शिंदे यांना कोथरुड व इतर भागात उनजो ऑनलाईन डिलीव्हरी ॲपव्दारे एल.एस.डी. या अंमली पदार्थाची खरेदी विक्री होत आहे. त्याअनुषंगाने सखोल माहिती घेतली असता, 1) रोहन दिपक गवई, वय 24 वर्षे, रा. सध्या स्वापनंदा हाऊसिंग सोसा, फ्लॅट नं.33 डिपी रोड कर्वे पुतळा पुणे यांस पेट्रालिंग दरम्यान ताब्यात घेतले असता त्याच्याकडुन एक लाख 50 हजार रुपयांचा त्यामध्ये कि. रु. 90,000/- रु चे 30 मिलीग्रॅम एल एस डी व इतर ऐवज हस्तगत करण्यात आलेला असुन त्यामध्ये त्याचे इतर साथीदारांचा देखील समावेश असल्याचे निष्पन्न झाल्यान संबधिताविरूद्ध कोथरुड पो.स्टे. येथे एन. डी. पी. एस. ॲक्ट नुसार दि.24 मे 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

दाखल गुन्हयाचा सखोल तपास करता डनजो या डिलीव्हरी ॲपव्दारे एल. एस. डी. या अंमली पदार्थाची खरेदी विक्री होत असल्याचे निष्पन्न झालेने वरील नमुद आरोपीचे संगनमत व साखळी पध्दतीने असलेले साथीदार नामे 2 ) सुशांत काशिनाथ गायकवाड, वय 26 वर्षे रा. फ्लॅट नंबर एस 1 ठक्कर रेसीडन्सी संभाजीनगर कोडोली सातारा सध्या रा.बी 801 पेरिविन्कंल सोसायटी ननावरे चौक, बाणेर पुणे 3)धिरज दिपक लालवाणी वय 24 वर्षे, रा. फ्लॅट नं. ए-14, जी-3 प्लॅनेट मिलीनियम, पिंपळे सौदागर, पुणे 4) दिपक लक्ष्मण गेहलोत वय 25 वर्षे, रा. डि- 2 फ्लॅट नं. 501, शिवसागर सिटी, फेज नं 1 सनसिटी रोड, आनंदनगर पुणे 5) ओंकार रमेश पाटील, वय-25 वर्षे रा.स.नं. 108/3/1/बी,पाटील साई व्हिला, अक्षरा इंटरनॅशनल स्कुल समोर, वाकड, पुणे यांचा बाणेर, सिंहगड रोड, पिंपळे सौदागर, वाकड परिसरातुन शोध घेऊन अटक करण्यात आलेली असुन आरोपी क्रं.1.3.5 यांचे ताब्यातुन अनुक्रमे खालील वर्णनाचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे.

1) आरोपी रोहन दिपक गवई याचे ताब्यात मिळालेले कि रु. 90,000/- रु चे 30 मिलीग्रॅम एलएसडी या अंमली पदार्थाचे 02 स्ट्रिप्स व इतर ऐवज 2)धिरज दिपक लालवाणी याचे ताब्यातील बॅगेमध्ये त्यामध्ये किं.रु.29,40,000/- चे 09 ग्रॅम 880 मिलीग्रॅम वजनाचे एलएसडी या अंमली पदार्थाचे 588 तुकडे संलग्न असलेली एक कागदी शिट व इतर ऐवज 3) ओंकार रमेश पाटील याचे ताब्यात मिळुन आलेला किं. रु.21,30,000/- चे 07 ग्रॅम 090 मिलीग्रॅम वजनाचे एलएसडी या अंमली पदार्थाचे 426 तुकडे व इतर ऐवज असा एकुण किं.रु.53 लाख 35 हजार त्यामध्ये किं.रु. 51 लाख 60 हजाराचे एलएसडी अंमली पदार्थाचे 17 ग्रॅम वजनाचे 1032 तुकडे व इतर ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे.  दाखल गुन्हयाचा तपास अधिकारी सपोनि शैलजा जानकर व स्टाफ हे सखोल तपास करीत आहेत
वरील नमुद कारवाई ही अंमली पदार्थ विरोधी पथक, 1, गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, विशाल शिंदे, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदिप शिर्के, राहुल जोशी, संदेश काकडे, नितेश जाधव, सचिन माळवे, रेहाना शेख योगेश मोहिते यांनी केली आहे.

कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीत एक कोटी 14 लाखांचे एलएसडी अंमली पदार्थ जप्त
दरम्यान कोथरूड पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हयातील पोलीस कस्टडी रिमांडमधील मुख्य आरोपी ओंकार रमेश पाटील याच्याकडे रिमांड कालावधीत विश्वासात घेऊन तपास करता त्याने दाखल गुन्हयातील जप्त मुद्देमालाव्यतिरिक्त विक्रीकरिता आणलेला आणखीन एलएसडी अंगली पदार्थ हा त्याचे रहाते घराचे परिसरात त्याचे ॲक्टीव्हा गाडीचे डिक्कीत लपवुन ठेवला असल्याची खात्रीशिर माहिती दिलेने, त्याअनुषंगाने सखोल तपास करता अटक आरोपीचे मदतीने कि रु 63 लाखाचा त्यामध्ये कि. रू. 62 लाख 70हजाराचे 24 ग्रॅम 986 मिलीग्रॅम वजनाचे एलएसडी अंमली पदार्थ किं.रु. 30,000/- ची एक पांढरे, रंगाची ॲक्टीव्हा गाडी तसेच इतर ऐवज हस्तगत करून पंचनाम्याने जप्त करण्यात आलेला आहे. दाखल गुन्हयाच्या तपासात अटक आरोपीतांनी “उनजो या ऑनलाईन फुड डिलीव्हरी ॲप“ चा दाखल गुन्हयातील एल. एस. डी. या अंमली पदार्थाची खरेदी-विक्री करण्याकरिता वापर केल्याचे निष्पन्न झालेले आहे.
दाखल गुन्हयाचे दि.25 मे 2023 रोजीपर्यंत केलेले तपासात उपरोक्त पोलीस कस्टडी रिमांड मधील आरोपीकडुन एकुण एक कोटी सोळा लाख पस्तीस हजार तिनशे रु. कि.या त्यामध्ये 41 ग्रॅम 986 वजनाचे एलएसडी अंमली पदार्थाचे 2,307 चौकोनी तुकडे व 02 दुचाकी गाडी मोबाईल हॅण्डसेट व इतर ऐवज हस्तगत करण्यात आलेला असुन दाखल गुन्हयाचा आणखीन सखोल तपास करीत आहोत.

चरसची विक्री करुन घातक शस्त्राचा साठा बाळगणाऱ्यास केले जेरबंद-
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील युनिट 1 कडील पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना बातमी मिळाली की, ऑर्चिड बिल्डींग, सदाशिव पेठ, नातुबाग, पुणे येथे एक इसम चरसची विक्री करीत आहे. अशी बातमी प्राप्त झाल्याने लागलीच ही बातमी युनिट-1 चे प्रभारी अधिकारी श्री. शब्बीर सय्यद यांना कळविली. श्री. सय्यद त्यांनी तात्काळ प्राप्त बातमीच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे युनिट 1 कडील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचुन एका इसमांस ताब्यात घेतले असता त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव पत्ता सागर सुभाष मोडक वय- 43 वर्ष, रा. 1367 सदाशिव पेठ, ऑर्चिड बिल्डींग, पुणे असे असल्याचे सांगीतले. याची अंग झडती घेतली असता, त्याच्या खिशात मिळून आलेल्या काळ्या चिकट व कडक पदार्था मधील अत्यंत अल्प प्रमाणातील तुकड्याची सोबतच्या ड्रग्ज डिटेक्शन किटव्दारे तपासणी केली असता सदरचा पदार्थ हा चरस असल्याचे प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न झाले.
त्याची अंगझडती व घरझडतीमध्ये किं 5 लाख 19 हजार रुपयांचा चरस अंमली पदार्थ 352 ग्रॅम 6550/- रु ची 3 तलवार, 2 कुकरी, 1 सत्तुर, 1 कु-हाड, 1 चाकु, 1 रापी अशी बेकायदेशिररित्या हत्यारे व किं रू 16000/- च्या एकुण 32 नग निलीय विक्री करीना मिळाले. असा सर्व मिळून 5 लाख 72 हजार 50 रु किं.चा माल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या इसमास पुढील कारवाई कामी खडक पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद युनिट 01, सपोनि अशिष कवठेकर, पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी, पो.उप.नि. अजय जाधव, पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, विठ्ठल साळुंखे, तुषार माळवदकर म. पोलीस अंमलदार रुक्साना नदाफ यांनी केली आहे.

दरम्यान यातुन काही प्रश्न निर्माण झाले आहेत. 1) पुणे शहरात अंमली पदार्थ खरेदी करणारांची संख्या वाढली आहे काय 2) पुणे शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत हा अंमली पदार्थ पोहोचतो तरी कसा 3) पकडण्यात आलेले आरोपींची वय केवळ 18 ते 25 या वयोगटातील असल्याचे दिसून येत आहे. याचा अर्थ ऑनलाईन डिलर असा काही प्रकार आहे काय ज्यातून कमी वयाचे रिटेल विक्री करणारे युवक यांच्या हाताशी लागत आहेत. 4) याचे मुख्य कनेक्शन कुठे आहे 5) पुणे पोलीसांचे सतत धाडसत्र सुरू असतांना देखील गुन्हेगारांच्या मनात पोलीस व कायदयाविषयी भिती का राहिली नाही 6) अटकेनंतर संबंधित आरोपी किती कालावधीत सुटत आहेत 7) कैदेतून सुटल्यानंतर पुढे ते हा व्यवसाय बंद करतात किंवा या अंमली पदार्थ व्यवसायातून बाहेर पडलेले आहेत, नक्की काय आहे असे अनेक प्रश्न असून यावर गांभिर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.