Friday, September 29 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे शहरात सुरू होणाऱ्या सर्वच अवैध धंदयाचे श्रेय
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाच असेल

अवैध धंदेवाल्यांकडून पुणे शहरात दिवाळी साजरी केली, एका तथाकथित व्हिडीओने पुराणिकांच्या कर्तृत्वाची उंच दहीहंडी फोडून टाकली,

पुण्यासारख्या विद्येच्या माहेरी, दलालांचा बाजार
साम, दाम,दंड, भेदाचा अस्सल व्याभिचार…
सत्ता सारीपटात लक्ष्मीची चलती – सरस्वतीला पाहून वाटच बदलती


पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/national forum/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर, जुगार अड्डे, रमीचे क्लब, वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थ विक्री करणारे, दुधात भेसळ, खाद्यतेलात भेसळ, पेट्रोल- डिझेल चोरी करणारे, रेशनिंगवर माप मारणाऱ्यांनी दिवाळी साजरी केली आहे. पुणे शहरात मागील 30 वर्षात एकाही पोलीस अधिकाऱ्याला जे जमलं नाही ते राजेश पुराणिक यांच्यासारख्या धाडसी अधिकाऱ्याने अवघ्या सहा महिन्यात संपूर्ण पुणे शहरातील अवैध धंदे बंद करून दाखविले. दरम्यान पुण्यासारख्या विद्येच्या माहेरी, दलालांचा बाजार । साम, दाम,दंड, भेदाचा अस्सल व्याभिचार…॥ सत्ता सारीपटात लक्ष्मीची चलती – सरस्वतीला पाहून वाटच बदलती ॥। हे मंथनामृत वास्तवात उतरले आहे. त्यामुळे पुणे शहरात ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू होतील त्या सर्व अवैध धंद्याचे श्रेय दुसरे तिसरे कुणालाच नसून ते केवळ पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनाच असणार आहे.


पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी, मोक्का व एमपीडीए च्या 100 शंभर कारवाया केल्याचे सांगण्यात येत आहे. तथापी पोलीस निरीक्षकांनी तयार करून पोलीस उपायुक्तांव्दारा गुन्हेगारांच्या कृत्यांविरूद्ध कारवाईसाठी पोलीस उपआयुक्तांनी पाठविलेल्या गुन्हे अहवालांवर केवळ सही केल्याने मोठा गाजावाजा करण्यात येत आहे. श्री. राजेश पुराणिक यांना सामाजिक सुरक्षा विभागाचा पदभार दिल्यानंतर, माहे मार्च ते ऑगस्ट 2022 या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत 10 कोटींचा मुद्देमाल, 682 आरोपीसह 51 ठिकाणी धाडी टाकुन खऱ्या गुन्हेगारांचा चेहरा पुणेकरांसमोर उघड केला आहे. पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक अशी तुलना करण्याचा आमचा हेतू नसला, तरी थेट कारवाई करणाऱ्यांच्या धाडसाचे कौतूक तर करावे लागेलच. मागील 30 वर्ष पुणे शहरात अवैध धंदे करणारे व्हॉईट कॉलर म्हणून मिरवित होते. परंतु त्याच व्हाईट कॉलरचे पितळ उघड पडले आहे. 30 वर्षात कोणत्याही तथाकथित कर्तृत्ववान पोलीसांना जे महत्वाचे कार्य जमले नाही, ते कार्य राजेश पुराणिक यांनी करून दाखविले आहे.


बेकादेशिर धंदयाची कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली – राजेश पुराणिक यांच्या बदनामीचे षडयंत्र –
पुणे शहरातील व्हाईट कॉलर वाल्यांचे पितळ उघडे केल्याने, पुणे शहरातील बहुतांश 32 पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद झाले होते. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांच्या पोलीस कारवाईच्या भितीमुळे अनेकव्हॉईट कॉलर पुणे शहरातून परागंदा झाले होते.सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल बंद झाली होती. त्यामुळे भेदरलेल्या व्हॉईट कॉलरने त्यांच्या अंतर्गत करावाया सुरू ठेवून, श्री. राजेश पुराणिक यांना एका तथाकथित व्हिडीओच्या आधारे त्यांची बदनामी सुरू करण्यात आली.राजेश पुराणिक अवैध धंदयाचे पैस खात नाहीत, रूटीन पाळत नाहीत. मग त्यांच्या बदनामीसाठी एक एक मुद्दा शोधण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. त्यात कुठल्यातरी करावाईचा व्हिडीओ सापडला आणि बदनामीचे शंख फुंकण्यात आले. मोठ्या साहेबांना बदलीसाठी निमित्तच हवं होतं. निमित्त मिळालं आणि पदभार काढुन घेतला….


गुन्हेगारांवर कारवाई करायची नाही, मग … काय त्यांना कडेवर घेवून मिरवायचे काय –
तथाकथित व्हिडीओमध्ये राजेश पुराणिक कारवाई करीत असतांना दिसत असले तरी हा व्हिडीओ नेमका कुठला व कधीचा आहे त्याचे रहस्य आजपर्यंत उलगडलेले नाही. जुगार अड्डे, मटका अड्डा, क्लब, वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थ विक्री करणारे, दुधात भेसळ, खाद्यतेलात भेसळ, पेट्रोल- डिझेल चोरी करणारे, रेशनिंगवर माप मारणाऱ्यांवर गुन्हे केल्यानंतर मेरी आवाज सुनो ची प्रक्रिया राबविणे आवश्यक असणे स्वाभाविक आहे. गुन्हेगार कबुली देत नसतील तर मग काय, पुणे पोलीसांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कडेवर घेवून गावभर मिरवायचे काय असाही सवाल पुणेकर व्यक्त करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या निर्णयांचा पुणे पोलीसांच्या मनोधर्यावर दुष्परिणाम होतील –
पोलीस आयुक्तांची अवैध धंदेवाल्यांच्या पुढे शरणागती –
धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या श्री. राजेश पुराणिक यांच्याकडील सामाजिक सुरक्षा विभागाचा पदभार काढुन घेवून, एका धाडसी अधिकाऱ्याला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्याचे काम पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी केले आहे. आय.पी.एस. अधिकारी दोन/ तीन वर्षांसाठी पुण्यात कर्तव्य बाजावतील, आय.पी.एस. येतील आणि जातील. परंतु त्यांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयांचा पोलीसांच्या मनोधर्यावर परिणाम होत असतात. राजेश पुराणिक यांनी 32 पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांच्या विरोधात जावून केवळ सामाजिक न्यायासाठी व कायदयाद्वारा स्थापित कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली आहे. दरम्यान सर्वच आय.ए.एस, आय.पी.एस., आय.आर.एस. येतील आणि जातील. परंतु पुणे शहरात आम्हाला कायम रहायचे आहे. श्री. अमिताभ गुप्ता यांनी एका प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर कारवाई करतांना, पुणेकरांचा थोडातरी विचार करायला हवा होता. पुणे शहर पोलीसांच्या मनाधैर्याचा देखील विचार करून निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु मनमानीपणे एका नादीरशहा सारखे निर्णय घेवून, आम्हा पुणेकरांवर विनाकारण संक्रात आणणे उचित नाही.
श्री. राजेश पुराणिक यांच्याकडील पदभार काढुन घेतल्याने, पुणे शहर पोलीसांच्या मनोधैर्यावर पुढील काळात दुष्पपरिणाम होण्याची शक्यता आहे. इथुन पुढे कोणताही अधिकारी दोन नंबर धंदेवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पुढे येणार नाही. त्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढतच जाणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोणतेही सबळ कारण न देता दोन नंबर धंदेवाल्यापुढे शरणागती पत्करली असल्याचे दिसून येत आहे.
महिला आयोगचे पत्र सबळ कारण कसे होऊ शकते –
दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कुठेही महिला असल्याचे दिसून येत नाही. तसेच ज्या कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या व राज्य शासन, पुणे पोलीसांच्या आदेशाविरूद्ध वर्तन व नाकावर टिच्चुन रात्रौ- अपरात्रौपर्यंत नाईट क्लब सुरू ठेवणाऱ्या व स्पा आणि मसाज पार्लरमध्ये उघडा नागडा धिंगाणा घालणाऱ्यांवर कारवाई केल्याचे प्रकरण देखील समोर आले होते. त्यामध्ये पोलीसांनी महिलांच्या अंगाला हात लावला असता तर विनयभंग ठरला असता, त्यामुळे हातातील काठी हवेत फिरवुन, किंवा दर्शवुन अर्धनग्न महिलांना तेथून हुसकावून लावले असल्याचे ऐकिवात होते. तथापी त्यांनी देखील कुठे तक्रार केल्याचे आढळुन आले नाही. असे असतांना देखील महिला आयोगाचे पत्र आले म्हणून कारवाई केल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे.
पोलीस आयुक्त सर्वच आयोगाच्या पत्रांवर कारवाई का करीत नाहीत –
राज्य महिला आयोग, राज्य व राष्ट्रीय अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोग, मानवी हक्क आयोग यांच्याकडे नागरीकांकडून करण्यात येणाऱ्या सर्वच तक्रार अर्जांवर, संबंधित आयोग कोणतीही चौकशी करीत नाहीत. केवळ संबंधित पोलीसांना पत्र पाठवुन तक्रार अर्जाचा तपास करावा अशा सुचना देते. त्यामुळे वरील तीन आयोगाकडून पुणे पोलीसांना किमान 200 च्या आसपास पत्रे व निवेदने आली आहेत.
पैकी काही निवेदनांच्या प्रती आमच्याकडे देखील आहेत. मागील दोन/ तीन वर्षांपासून त्याच्यावर कारवाई केली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राजेश पुराणिक यांची कोणतीही चौकशी न करता मनमानीपणे पदभार काढण्याचा प्रकार संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. केवळ महिला आयोगाने पत्र दिले म्हणून पदभार काढुन घेतला हे सबळ कारण ठरू शकत नाहीये.
अवैध धंदे सुरू झाल्यास त्याचे सर्व श्रेय, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाच असेल –
तथाकथित व्हिडीओ आणि महिला आयोगाच्या पत्राबाबत वरील मुद्यांमध्ये विवेचन केले आहे. त्यामुळे पदभार काढुन घेणे किंवा बदली करण्याची ही कारणे होऊ शकत नाहीत. थोडक्यात पोलीसांनी न केलेल्या कर्तृत्वाची, खोट्या श्रृंगाराची आजपर्यत अनेकांनी बातमी केली आहे. ब्रेक्रींग न्यूज करून चांगल्या अधिकाऱ्यांनाही घरी बसविण्यात इथली यंत्रणा यशस्वी झाली आहे. सत्ता सारिपटात लक्ष्मीची चलती असल्याने, सरस्वतीला पाहून वाट बदलणाऱ्यांची संख्या कमी नाहीये. श्री. राजेश पुराणिक यांची बदली केल्याने अवैध धंदेवाल्यांनी मोठी दिवाळी साजरी केली आहे. त्याचे सर्व श्रेय 32 पोलीस स्टेशन सहित 23 गुन्हे शाखांना आहेच. परंतु 32 पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे सुरू झाल्यास त्याचे सर्व श्रेय हे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाच असेल यात वादच नाही.
दरम्यान पोलीसांच्या सर्व बैठकीमध्ये पोलीस आयुक्तांनी दम भरला होता की, ज्या पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे सुरू असतील त्यांना निलंबित करून अवैध धंदेवाल्यांना तडीपार करण्यात येईल असे असे सांगितले होते. त्याच्या सर्व बातम्या प्रसारित झाल्या. समर्थ हद्दीत धंदयाचे कारण देवून श्री. विष्णु ताम्हाणे यांची बदली केली…. पुढे दोन महिन्यांनी अवैध धंदयावर कारवाई तत्सम बाबींमुळे पुराणिकांची बदली केली… नेमकं …
पोलीस आयुक्तांची नेमकी भूमिका आहे तरी काय….पत्रकारांच्या प्रश्नांना, नो.. कमेंट म्हणण योग्य नसल तरी पुराणिकांचे कार्य आम्ही थांबु देणार नाही. ही तर, खरी सुरूवात आहे……….