बुधवार व शुक्रवार पेठा हे तर पुणे शहराचं हार्ट- आगरवाल टोळी ही तर विजापुरच्या आदिलशहापेक्षाही भयंकर
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/ पुणं शहर हे मूळातच एक सुंदर शहर आहे. एकापेक्षा एक वेगवेगळे वाडे आणि त्यांची रचना, वेगवेगळी आखिव- रेखिव मंदिर, वेगवेगळे दर्गा आणि मस्जिद, चर्च ह्यांची देखील एक सुंदर रचना आहे. प्रत्येक वाड्यात आखिव- रेखीव सुंदर पाण्याच्या विहीरी आहेत. मुळा मुठा नदीवर एक राजा महाराजांची वेगवेगळी बघण्यासारखी समाधीस्थळ आहेत. रस्त्यांची सुबक रचना. तसेच बाजारपेठांचं एक वेगळं अस्तित्व आहे. पुणं शहर भलं मोठ्ठं झालं तरी मंडई, लक्ष्मी रोड वर आल्याशिवाय पुणेकरांचा एक दिवसही जात नाही. निदान सणावाराला तरी पुणेकर ह्या रस्त्यावर येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या पुण्याची मुहूर्तमेढ सोन्याचा नांगर फिरवुन, पुनवडीला पुण्यनगरीचं स्थान निर्माण केलं आहे. अशा ह्या पुणे शहरावर मोघलांसह ब्रिटीशांनी देखील आक्रमणे केली, परंतु पुणे शहर हादरलं नाही, घाबरलं नाही. पानशेतच्या प्रलयानंतर २०११ पासून प...