हज्जार रुपयांचा रट्टा मारून, पुण्यातील वाहनचालकांचे दंडनिय समुपदेशन
* वाहतुक पोलीसांचे असेही
जबरी समुपदेशन
* आवाहन केले असते तर
एकही फिरकला नस्ता, लायसन जप्त करून हज्जार रुपयांचा रट्टा मारल्यावर सगळे कसे धावत
आले बघ्घा..... आमच्या समुपदेशन कार्यक्रमाला.....
* विद्यार्थ्यांचे अतोनात
हाल, समुपदेशन कसले ही तर जब्बर धमकीच....
* प्रत्येक जण कावर्या
बावर्या नजरेने पोलीसांचे जबरी मनोगत
एैकत होता. परंतु हळुच
आमचे लायसन कुठाय, दंड का भरायचा...
कशाचा ...म्हणुन चुळबूळ
करत सुटले.
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन
चव्हाण/
पुणे तिथे काय उणे ह्या म्हणीप्रमाणेच
आमचे पुणे आहे. भलत्याच अक्कल हुश्शारीने कोण कुठला शोध लावेल याचा काही भरवसा देता
येत नाही. ह्या हुश्शारीनेच पुण्यातील पाट्या रंगलेल्या आहेत. हे झाले पुणेकरांचे.
पण वेगवेगळ्या जिल्ह्यातील व परराज्यातील बहुतां...