Wednesday, May 8 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पोलीस क्राइम

Police Crime News in Pune

पुण्यात फेक आणि बनावट बातम्यांचा संशय कल्लोळ,<br>न्यूज पोर्टल, साप्ताहिकांसह आता दैनिकांतूनही बनावट बातम्यांचा पुणे पोलीसांवर हल्ला

पुण्यात फेक आणि बनावट बातम्यांचा संशय कल्लोळ,
न्यूज पोर्टल, साप्ताहिकांसह आता दैनिकांतूनही बनावट बातम्यांचा पुणे पोलीसांवर हल्ला

पोलीस क्राइम
national forum news काय तर म्हणे, पोलीस अधिकारी राजेश पुराणिक यांच्या विरूद्ध कारवाई होणार… पुण्यातील नाठाळांकडून…. तक्रार अर्जांवरून बातमी करण्याची लब्बाड सवय कधीच जाणार नाहीये…. पुणे/दि/पुण्यात शनिवार व रविवार दि. 13/14 ऑगस्ट 2022 पासून पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांच्या विरूद्ध काही मोजके न्यूज पोर्टल, काही मोजका सोशल मिडीया व काही बंद पडलेल्या साप्ताहिकातून राजेश पुराणिक यांच्यावर महिला आयोगाचे ताशेरे वगैरे बातमी प्रसारित झाली आहे. तसेच काही दैनिकांतून देखिल आज बातम्या प्रसारित झाल्या आहेत. या बातमीची खातरजामा केली असता, महिला आयोग किंवा पोलीस आयुक्त कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई बाबतचे कोणतेही आदेश नसल्याचे आढळुन आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाकडून कोणताही दुजारा मिळालेला नाही. तसेच ज्यांनी आयोगाकड...
सामाजिक सुरक्षा विभागाचे राजेश पुराणिक यांच्या कारवाईला ब्रेक लावण्यासाठी,<br>समदुःखी पोलीस व गुन्हेगारांकडून नाहक बदनामीचे षडयंत्र

सामाजिक सुरक्षा विभागाचे राजेश पुराणिक यांच्या कारवाईला ब्रेक लावण्यासाठी,
समदुःखी पोलीस व गुन्हेगारांकडून नाहक बदनामीचे षडयंत्र

पोलीस क्राइम
सामाजिक सुरक्षेतील पोलीसांच्या अंगावर बिअर आणि सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या तेंव्हा कुठे होता मानवी हक्क…जुगार चालवणारे- जुगार खेळणारे दोघेही दोषीच….नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी कृतज्ञतेची भावना, गुन्हेगारांच्या मनात पोलिसांविषयी भीती असण्याची आवश्यकता.जुगार अड्डा- ड्रग्ज- वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांवर थर्ड डिग्री हवीच,32 पोलीस स्टेशन दीड डझन गुन्हे शाखेतील 250 वरीष्ठ पोलीस अधिकारी असतांना त्यांनी कारवाई का केली नाही.सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीसांच्या अंगावर बिअर आणि सोडा वॉटरच्या बाटल्या टाकल्या त्यावेळी निषेध करायला पुढे कुणी का आले नाही….स्थानिक पोलीसांनी बघ्याची भूमिका का घेतली….मसाज पार्लर आणि स्पाच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय, ऑनलाईन लॉटरी, जुगार अड्डे यामुळे समाजव्यवस्था कोलमडून पडत असतांना, स्थानिक पोलीसांसह खाजगी वृत्तवाहिन्या गप्प का…. पुणे/दि/ प्रतिनिधी/ N...
वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील गोल्डन टच स्पा वेश्यालयावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील गोल्डन टच स्पा वेश्यालयावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

पोलीस क्राइम
साळुंके विहार परीसरात स्पा सेंटरचे नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर गुन्हे शाखेचा छापा; 5 आरोपींविरुद्ध कारवाई, 4 पिडीत महीलांची सुटका. पुणे/दि/ प्रतिनिधी/मध्यवर्ती पुणे शहरात रेड लाईट एरिया असल्याने त्या भागाला कायम कानफाटे हे नाव ठेवण्यात आले आहे. परंतु पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत मसाज पार्लर व स्पा सेंटरच्या नावाखाली दिवस-रात्र वेश्याव्यवसाय सुरू असतांना, त्याच्यावर कारवाई करण्यात प्रशासकीय यंत्रणा कमी पडली आहे. दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी कायदा-सुव्यवस्था, सामजिक बांधिलकी, कायदयाव्दारे स्थापित कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात अग्रेसर असल्याने सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवार, दि. 3/8/22 रोजी वानवडी पोलिस स्टेशन हद्दीतील साळुंखे विहार या उच्चभ्रू परीसरातील 'गोल्डन टच स्पा', डी 101/102, गिरमे हाई...
हद्द येरवडा पोलीस स्टेशनची, जुगार अड्डा मात्र विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या नाकाखाली,

हद्द येरवडा पोलीस स्टेशनची, जुगार अड्डा मात्र विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या नाकाखाली,

पोलीस क्राइम
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा;. 23 हजारचे मुद्देमालासह एकूण 14 आरोपींविरुद्ध कारवाई. पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार बंटी मिश्री, विशाल पाटील आणि अक्रम सिद्धीकी यांच्या मालकीच्या असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे. या छाप्याची विशेषता म्हणजे, बंटी मिश्राचा जुगार अड्डा हा येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असून, थेटच जुगाराचे ठिकाण विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या नाकाखाली थोडक्यात 10 पाऊलांवर सुरू असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईच्या भितीने बंटी मिश्राने अनेक ठिकाणी पंटर थांबविले होते. तसेच फिरूनही धंदा घेत असल्याने, कारवाईवेळी अनेक रायटर, खेळी पळुन गेले असल्याची माहिती आहे. घटनेची हकीकत अशी की, बुधवार, दि. 3.8.22 रोजी अवैध मटक्याच्या धंद्याबाबत मिळालेल...
पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला फरासखाना पोलीसांनी केली शिताफीने अटक<br>दगडी नागोबाजवळ ट्रॅप, पोलीसांनी पाठलाग करून पकडले

पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला फरासखाना पोलीसांनी केली शिताफीने अटक
दगडी नागोबाजवळ ट्रॅप, पोलीसांनी पाठलाग करून पकडले

पोलीस क्राइम
faraskhana police पुणे/दि/ प्रतिनिधी/श्रावण महिना सुरू झाला आणि सर्वधर्मियांचे धार्मिक सण उत्सव सुरू झाले आहेत. मुस्लिम धर्मियांचे नवीन वर्ष सुरू झाले असून मोहरम (ताजिया) सुरू आहेत. हिंदू धर्मियांचा श्रावणमास सुरू असून, नागपंचमी पासून गणपती-नवरात्रौ पर्यंत सण उत्सव सुरू असतात. पुणे शहरातील मंडई मध्ये सर्व प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांची दरवर्षी मोठी संख्या असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशनडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत पायी पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार राकेश क्षीरसागर यांना गोपनीय बातमीदार करवी माहीती मिळाली की . दगडीनागोबा मंदिर गणेश पेठ , पुणे येथे एक इसम पिस्तुल घेऊन थांबलेला आहे अशी माहीती मिळाली. सदरची माहीती तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र लांडगे व ...
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर यांचे पालखी सोहळयात श्रध्देने आलेल्या भाविकांचे दागिने चोरणारी टोळी गुन्हेशाखा यनिट -6 ने केली जेरबंद

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर यांचे पालखी सोहळयात श्रध्देने आलेल्या भाविकांचे दागिने चोरणारी टोळी गुन्हेशाखा यनिट -6 ने केली जेरबंद

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर यांचे पालखी सोहळयात श्रध्देने आलेल्या भाविकांचे दागिने चोरणारी टोळी विरूद्ध विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं 173/2022.भा.द.वि . कलम 392, 34 प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास करित असताना युनिट 6 कडील अधिकारी व अंमलदार यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पुण्यातुन श्री क्षेत्र पंढरपुरकडे जात असताना पालखी मार्गावर तसेच विसावा ठिकाणी दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात त्यामुळे तेथे झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेवुन लोकांचे गळयातील सोन्याचे दागिने बळजबरीने चोरणारे इसम नामे 1 ) शंकर पवार 2 ) महेंद्र अरगडे हे आळंदी पुणे रोडवर थांबलेले आहेत, अशी बातमी मिळताच युनिट 6 चे पथकाने लगेच सापळा लावुन त्यांना ताब्यात घेतले. 1 ) शंकर शिवाजी पवार वय -23 वर्षे रा - पाथर्डी अहमदनगर 2 ) महेंद्र सुरेश अरगडे वय ...
सहकारनगर पो. स्टे. हद्दीतील कुप्रसिद्ध गुन्हेगार सुनिल निर्मळच्या दोन जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेची पुन्हा छापा कारवाई; रु.1.56 लाखाचे मुद्देमालासह 35 आरोपींविरुद्ध कारवाई.

सहकारनगर पो. स्टे. हद्दीतील कुप्रसिद्ध गुन्हेगार सुनिल निर्मळच्या दोन जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेची पुन्हा छापा कारवाई; रु.1.56 लाखाचे मुद्देमालासह 35 आरोपींविरुद्ध कारवाई.

पोलीस क्राइम
पुण्यातील जुगार अड्डा चालकांनो,तुम्ही कितीही लावा शक्ती, तुम्ही कितीही लढवा युक्ती, तुम्ही कितीही करा रे गल्ला - लय मजबुत पुराणिकांचा किल्ला पुणे/दि/ प्रतिनिधी/गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाकडून सतत जुगार अड्यांवर धाड सत्र सुरू असल्याने, जुगार चालकांनी नवीन शक्कल लढवून फिरून मटका घेणे व सतत जागा बदलणे, आजूबाजूला सीसीटीव्ही लावून त्याद्वारे पोलीसांवर नजर ठेवणे सुरु केले आहे. पोलीस कारवाईची थोडी जरी खबर लागल्यास पसार होण्याची पद्धत सुरू केली आहे. पण आजच्या कारवाईत सहकारनगर पोलिस स्टेशन हद्दीत फिरून व जागा बदलून घेणाऱ्या जुगार चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे काल सांयकाळच्या सुमारास अवैध मटक्याच्या धंद्याबाबत मिळालेल्या बातमीनुसार, सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, सर्वे नंबर 37/1, फाईव्ह स्टार सोसायटी, धनकवडी येथे रेकॉर्डवर...
चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत पुनः पकडले मेफेड्रॉन, पुण्याला अंमली पदार्थांचा विळखा

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत पुनः पकडले मेफेड्रॉन, पुण्याला अंमली पदार्थांचा विळखा

पोलीस क्राइम
अंमली पदार्थ विरोधी पथक क्र 1 गुन्हे शाखा पुणे यांची कामगिरीचतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत दोन वेगवेगळया गुन्हयामध्ये 2,70,000/ - रुपये किंमतीचे 18 ग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ तसेच 2,20,000 / - रुपये किंमतीच्या 5 दुचाकी असाएकुण 4,80,000 / - रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहराला अंमली पदार्थांचा विळखा पडला आहे. दाखल गुन्ह्यांचा तपास करीत असतांना देखील नवीन गुन्हेगार पोलीसांच्या हाती लागत आहेत. नव नवीन ठिकाणी अशा प्रकारचे अंमली पदार्थ विक्री करणारे टोळके कार्यरत असल्याचे हे निदर्शक असल्याचे दिसून येत आहे. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेल्यानंतर, पुनः त्याच हद्दीत दुसरा अंमली पदार्थ विक्री करणारा अंमली पदार्थ विभाग गुन्हे युनिट एक च्या हाती लागला आहे. दि. 22/07/2022 रोजी व दि.26 / 07 / 2022 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गु...
घरातील कपाटाचं लॉक दुरूस्त करायला सांगितल अन्‌‍ चोरानं 15 तोळे सोन्यासह दोन लाखावर हात साफ करून पोबारा केला

घरातील कपाटाचं लॉक दुरूस्त करायला सांगितल अन्‌‍ चोरानं 15 तोळे सोन्यासह दोन लाखावर हात साफ करून पोबारा केला

पोलीस क्राइम
श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली -आंतरराज्य घरफोडी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना मुद्देमालासह नंदुरबार जिल्हयातुन अटकटोळीकडून सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने व रोख 1 , 9 0,000 / - रुपये जप्तबंडगार्डन पोलीस स्टेशनची कामगिरी, पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यात घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याचे पुनः एकदा आढळुन आले आहे. एखादया भागात फिरून त्या भागाची पूर्णपणे रेकी करायची आणि घरफोडी करण्यासाठी आवश्यक असलेल्या हत्यारांचा उपयोग धंदा करीत असल्याचे दाखवुन, घरफोडी करण्याचा प्रकार बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीतील ताडीवाला रोड येथे समोर आला आहे. दिनांक 26/07/2022 रोजी फिर्यादी महिला वय 42 वर्षे , रा . 344/46 पाण्याचे टाकीजवळ 13 ताड़ीवाला रोड़ पुणे या त्यांचे घरी असताना लॉक दुरुस्ती करणारे दोन इसम त्यांचे वस्तीत आले होते . त्यांन...
थांब तुला खल्लास करतो अशी धमकी देवुन, मानेवर धारदार सुरीने वार,दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

थांब तुला खल्लास करतो अशी धमकी देवुन, मानेवर धारदार सुरीने वार,दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/यातील फिर्यादी श्री. संतोष मालपोटे वय 42 वर्षे, रा. गणेश मळा, सिंहगड रोड हे गणेश मळा येथुन हनुमाननगर, दत्तवाडी पुणे येथे त्यांचे ओळखीचा प्रकाश कलाटकर याचेकडुन बॅन्ड वाजविणेचे काडया घेत असताना , नमुद अटक आरोपी राहुल मनोहर मोहिते वय 32 वर्षे रा. गणेश मळा सिंहगड रोड हा सदर ठिकाणी येवुन फिर्यादी यांच्या हातातील बॅन्ड वाजविणेचे काडया हिसकावुन घेवुन फिर्यादी यांना थांब तुला खल्लास करतो अशी धमकी दिली. त्यानंतर चार ते पाच मिनिटांनी परत येवुन फिर्यादी श्री. संतोष मालपोटे यांनी बॅन्ड वाजविणेचे काडया राहुल मनोहर मोहिते याचेकडुन हिसकावुन घेतल्याचा राग मनात धरून , चिडुन जावुन त्याने फिर्यादी संतोष मालपोटे यांना शिवीगाळ करून , जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे मानेवर धारदार सुरीने वार करुन फिर्यादी यांना गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे .दत्तवाडी पोलीस ...