Thursday, April 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यात फेक आणि बनावट बातम्यांचा संशय कल्लोळ,
न्यूज पोर्टल, साप्ताहिकांसह आता दैनिकांतूनही बनावट बातम्यांचा पुणे पोलीसांवर हल्ला

national forum news

काय तर म्हणे, पोलीस अधिकारी राजेश पुराणिक यांच्या विरूद्ध कारवाई होणार…

पुण्यातील नाठाळांकडून…. तक्रार अर्जांवरून बातमी करण्याची लब्बाड सवय कधीच जाणार नाहीये….

पुणे/दि/
पुण्यात शनिवार व रविवार दि. 13/14 ऑगस्ट 2022 पासून पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांच्या विरूद्ध काही मोजके न्यूज पोर्टल, काही मोजका सोशल मिडीया व काही बंद पडलेल्या साप्ताहिकातून राजेश पुराणिक यांच्यावर महिला आयोगाचे ताशेरे वगैरे बातमी प्रसारित झाली आहे. तसेच काही दैनिकांतून देखिल आज बातम्या प्रसारित झाल्या आहेत. या बातमीची खातरजामा केली असता, महिला आयोग किंवा पोलीस आयुक्त कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई बाबतचे कोणतेही आदेश नसल्याचे आढळुन आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाकडून कोणताही दुजारा मिळालेला नाही. तसेच ज्यांनी आयोगाकडे ऑनलाईन तक्रार अर्ज केला आहे, त्याचीच बातमी करून ती प्रसारित केले असल्याचे अद्याप पर्यंत वृत्त आहे. तथापी ज्याने ऑनलाईन तक्रार अर्ज केला आहे, त्याच्यावर वेगवेगळ्या जुगार अड्ड्यावरून ऑनलाईन हप्ते घेत असल्याचे व त्याच्यावार सुमारे एक अर्धा डझन गुन्हे असल्याचे समोर आले आहे.


ज्या जुगार अड्डा, वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांवर समाजविघातक इसमांवर कारवाई केल्याचा व्हिडीओ दिसत आहे, तो बनावट,मॉर्फ केल्याचे दिसून येत आहे. तसेच व्हिडीओत दिसणाऱ्या इसमाने कुठेही तक्रार केल्याचे दिसत नाही. दरम्यान शुक्रवार दि. 12 ऑगस्ट रोजी व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर शासकीय कार्यालयांना शनिवार, रविवार आणि आज सोमवारी देखील सरकारी सुट्टी,
पुणे पोलीसांनी केलेल्या कारवाई मध्ये महिलांचा दुरपर्यंत संबंध नसतांना, मग महिला आयोगाने सरकारी सुट्टीच्या दिवशी कारवाईचे आदेश दिले तरी कुणाला हा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजेश पुराणिक यांच्या विरूद्ध कारवाई होणार…. महिला आयोगाने आदेश दिले…. पोलीस आयुक्त काय कारवाई करणार ह्याकडे आता लक्ष…. वगैरे … वगैरे… अशा प्रकारच्या ह्या फेक बातम्या कोण प्रसारित करीत आहे…

  • महिला व लहान मुलींच्या अब्रुच धिंडवडे काढून, लहान मुली व महिलांकडून वेश्याव्यवसाय करवुन घेणारे भडवे…
  • देशाचं भविष्य असलेल्या शाळा-कॉलेजातील तरण्याबांड मुलांना गांजा, मेफेड्रॉन सारख्या अंमली पदार्थांची विक्री करून त्यांना गंजेडे-नशेडे बनविणाऱ्या व स्वतःचा गल्ला भरणारे दलाल….
  • देशी विदेशी वाईन-दारू ढोसून, हुक्का पार्लरमध्ये झिंगणारे तरूण, ही… असली पिढी देशाचे भविष्य बनविणार काय…की घडविणार आहे….
  • ऑनलाईन लॉटरी, मटका जुगार अड्डे चालवुन ज्यांनी शासनाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान करून, सरकारची फसवणूक केली, देश बुडव्या, देश विघातक शक्तीं….. अशा कु-प्रवृत्ती विरूद्ध पुणे पोलीसातील सिंघम…. श्री. राजेश पुराणिक यांनी धडाधड कारवाई केल्यानेच… धंदेवाईक मंडळींकडून फेक व बनावट बातमीचा मारा राजेश पुराणिक व पुणे पोलीसांविरूद्ध सुरू केला आहे. नशेची आग आपल्या लेकरामार्फत पुणेकरांच्या उंबऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे संपूर्ण पुणेकर नागरीक राजेश पुराणिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. फेक आणि बनावट बातम्या प्रसारित करून, राजेश पुराणिक यांना त्यांच्या कर्तव्यापासून दुर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देवून त्यांना येरवडा जेलसह मेंटल हॉस्पीटला पाठविण्यासाठी पुणेकर पुढे येत आहेत.