
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतून जुगार मटका अड्डयांचा सुफडा-साफ
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतून जुगार मटका अड्डयांचा सुफडा-साफ
पोलीस आयुक्तांनी मनांत आणलं तर काय होऊ शकते हे आज दिसून आले.शिवाजीनगर पोलीस ः 7 ऑक्टोंबर हा दिवस -जुगार अड्डा मुक्त दिन
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/सामाजिक सुरक्षा विभागाचे तत्कालिन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी पुणे शहरातील अवैध व बेकायदेशिर मटका, जुगार अड्डे, वेश्याव्यवसाय करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करून, संपूर्ण पुणे शहरातून अवैध व बेकायदा धंदयांचे निर्मूलन अवघ्या सहा महिन्यांच्या अवधीत करून दाखविले होते. त्यांच्या सुडबुद्धीने केलेल्या बदलीनंतर, दुसऱ्याच दिवसांपासून पुणे शहरात अवैध धंदेवाल्यांनी दिवाळी साजरी करून, पुनः नव्याने मटका, जुगार अड्डे सुरू केले होते. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत देखील 2 ऑक्टोंबर पासून मटका जुगार अड्डयांसह वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांनी भरारी घेतली. ऑनलाईन लॉटरी मटका जुगार...