Thursday, December 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पोलीस क्राइम

Police Crime News in Pune

आज दि. 9 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

आज दि. 9 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

पोलीस क्राइम
national forum pune पोलीस स्टेशन - कोंढवा पोलीस स्टेशन, सहकारनगर पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, क्राईम युनिट क्र. 2, सामाजिक सुरक्षा विभाग, पुणे शहर पोलीस आयुक्तालय 1.कोंढव्यातील लुल्ला नगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत लहान मोठ्या गुन्हेगारी कारवायांचा चढता आलेख,चिक्या भाईला का शिव्या देतो- मध्ये कोणी आला तर खल्लास करून टाकेन…3.लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत-ट्रॅक्टर एक्सचेंज करण्याच्या बहाण्याने मोबाईल फोन पळविला4.चतुशृंगी पोलीस स्टेशन येथे स्टील पाईपची चोरी5.कोंढव्यात साडेचार लाख रुपयांची घरफोडीबातम्या विस्ताराने- कोंढव्यातील लुल्ला नगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाचा छापापुणे/दि/कोंढव्यातील लुल्लानगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली ...
पुणे शहरातील उपनगरापाठोपाठ मध्यवर्ती शहरातील लष्करसह शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगचा धुडगूस

पुणे शहरातील उपनगरापाठोपाठ मध्यवर्ती शहरातील लष्करसह शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगचा धुडगूस

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय, कायदयाचा आणि पोलीसांचा धाक कुठे नाहीसा झाला या विषयावर मागील तीन आठवड्यांपासून गुन्ह्यांच्या घटना आणि कोयता खोरांच्या दहशतीच्या अनुषंगाने नॅशनल फोरमध्ये प्रश्नमालिका सुरू असतांनाच आज लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतही अल्पवयीन मुलांनी दिवसाढवळ्या हातात कोयता घेवून दहशत माजविली आहे. तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी मोक्का आणि एमपीडीए मध्ये प्रत्येकी शतक गाठल्याचा गवगवा केला, परंतु त्याचे उलट परिणाम तर होत नाहीयेत ना ही देखील आज तपासून पाहण्याची वेळ आली आहे. मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीची होऊन होऊन दोन तीन वर्षे शिक्षा होईल. परंतु आपणही भाई होणार या विषारी अमिषातून तर हे कृत्य पुणे शहरात होत नाहीयेत ना याचीही मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी होणे आवश्यक आहे. दरम्यान कायदयाला आणि पोलीसांना आव्हान देणाऱ्यांवर कठोर कारवाई ...
अंमली पदार्थांच्या तस्करीतील फरार आरोपींची, विनायक गायकवाड यांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडून धरपकड<br>लोणीकंद व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील ड्रग्जमाफियांच्या मुसक्या आवळल्या

अंमली पदार्थांच्या तस्करीतील फरार आरोपींची, विनायक गायकवाड यांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडून धरपकड
लोणीकंद व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील ड्रग्जमाफियांच्या मुसक्या आवळल्या

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात गांजा, मेफेड्रॉन, चर्रस, अफिम, कोकेन सारखी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर धाडीचे सत्र सुरू असतांनाच, कारवाई करतांना फरार आरोपींची देखील कसुन चौकशी करून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 कडून करण्यात येत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड यांच्यासह संपूर्ण पथकाकडून धडपकडीचे सत्र सुरू आहे. सलग दोन दिवसात अनेक आरोपी पकडले गेले असून येरवडा व लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. काल संगमवाडी येथील संगमवाडी ब्रिज परिसरात इसम नामे अफजल इमाम नदाफ व अर्जुन विष्णु जाधव हे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथक 1 यांना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. 11/2023 एन. डी. पी...
खडक पोलीस स्टेशन मध्ये डीओंची दादागिरी, जो देगा उसका भला, जो नही देगा … तो आगे चला..

खडक पोलीस स्टेशन मध्ये डीओंची दादागिरी, जो देगा उसका भला, जो नही देगा … तो आगे चला..

पोलीस क्राइम
khadak police pune खडक पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकाऱ्यांची पाचही बोटे तुपातच असतात हे खरे आहे काय… पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुले हातात कोयता, हॉकीस्टीक सारखी हत्यारे घेवून दहशत माजवित सुटले आहेत. चिल्लर पार्टी सारखी वानर सेना संपूर्ण शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आग लावत सुटली आहेत. सगळीकडे दशहतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुख्यात असलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. असे असतांना खडक पोलीस स्टेशन मधील डीओंची दादागिरी समोर आली असुन अनेक पोलीस कर्मचारी त्रस्त झाले असल्याची माहिती नॅशनल फोरमला मिळाली आहे. त्यामुळे त्या दादागिरी करणाऱ्या डीओंवर सहायक पोलीस आयुक्त किंवा उपआयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. नॅशनल फोरम प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 य...
मुंढवा पोलीस स्टेशनवर प्रशासक नेमावा काय… सामाजिक सुरक्षा विभागाचा मुंढव्यातील जुगार अड्डयांवर पुनः छापा- 1 लाख रूपयांच्या मुद्देमालांसह 26 आरोपी अटक

मुंढवा पोलीस स्टेशनवर प्रशासक नेमावा काय… सामाजिक सुरक्षा विभागाचा मुंढव्यातील जुगार अड्डयांवर पुनः छापा- 1 लाख रूपयांच्या मुद्देमालांसह 26 आरोपी अटक

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाने मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्डयांवर पुन्हा कारवाई केली आहे. एक लाख रुपयांचा मुद्देमाल व 26 जणांविरूद्ध कारवाई केली आहे. मागील वर्षात तीन/चार वेळेस कारवाई केली होती आता पुनः नव्यावर्षाच्या तिसऱ्या दिवशी मटका जुगार अड्डयांवर कारवाई झाल्याने, मुंढवा पोलीस स्टेशनवर थेट प्रशासकाची नियुक्ती करावी काय असा सवाल सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. सध्या महापालिका व नगरपालिकांच्या निवडणूका वर्षभर लांबणीवर पडलेल्या आहेत. त्यामुळे तिथे प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंढवा पोलीस स्टेशन बाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मुंढवा पोलीस स्टेशन मधील अधिकारी कर्मचारी कारवाई करण्यास कसुरी करीत असतील तर, पुणे शहर पोलीस आयुक्तांनी मुंढवा पोलीस स्टेशनवर ...
नाना पेठेत कोयता-पालघन सारखी हत्यारे हवेत फिरवुन दहशत माजविणाऱ्यांची,समर्थ व क्राईम ब्रँचच्या पोलीसांच्या समांतर तपासाचा पुणेरी हिस्का… समर्थचे प्रसाद लोणारे-सौरभ माने व क्राईम ब्रँचचे निलेश साबळे-अजय थोरात यांची दिमाखदार कामगिरी

नाना पेठेत कोयता-पालघन सारखी हत्यारे हवेत फिरवुन दहशत माजविणाऱ्यांची,समर्थ व क्राईम ब्रँचच्या पोलीसांच्या समांतर तपासाचा पुणेरी हिस्का… समर्थचे प्रसाद लोणारे-सौरभ माने व क्राईम ब्रँचचे निलेश साबळे-अजय थोरात यांची दिमाखदार कामगिरी

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumआमदार, खासदार किंवा नगरसेवकाने वा राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याने पाठीवर शाब्बासकीची थाप मारल्यानंतर, गल्लीबोळातील नवशिक्या दादा आणि भाईंना पोलीस आणि कायदयाचा धाक नेमका काय असतो याचे भान राहिलेले नसते. त्यामुळे हम करे सो कायदा असे त्यांचे वर्तन सुरू असते. थर्ड फर्स्ट च्या मध्यरात्रौ आणि नववर्षाच्या पहाटेच आपसात झालेल्या भांडणाचा राग मनाशी धरून काही नेत्यांच्या लाडक्यांनी पुण्यातील नाना पेठेत कोयता, पालघन सारखी हत्यारे हवेत फिरवुन, दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. परंतु समर्थचे प्रसाद लोणारे-सौरभ माने व क्राईम ब्रँचचे निलेश साबळे-अजय थोरात यांनी कायदा मोडणाऱ्यांना जेरबंद केले असून, पुणे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांना पुणेरी हिसका दाखविण्यात आला आहे. पळुन गेला तरी कानुन के हाथ बहोत लंबे होते है हा साक्षात्कार नाना आणि भवानी पेठेतील दादा-भाईं...
नववर्षाचा पहिलाच दिवस- खून, हत्याकांड, दरोडा, घरफोड्या,लुटालूटीचा…<br>वर्षाच्या शेवटच्या दिवशीही संपूर्ण शहरात हिंसाचार आणि लुटालुटीच्या घटना…

नववर्षाचा पहिलाच दिवस- खून, हत्याकांड, दरोडा, घरफोड्या,लुटालूटीचा…
वर्षाच्या शेवटच्या दिवशीही संपूर्ण शहरात हिंसाचार आणि लुटालुटीच्या घटना…

पोलीस क्राइम
पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय…. भाग - 2 नॅशनल फोरमची काल प्रसारित बातमी आणि चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया,पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वशिल्याने आलेल्या पोलीसांमुळेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभिर झाला. ….. पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुण्यात कोयता गँगची दहशत, विधीमंडळात कोयता गँगचा मुद्दा आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी मागील दीड वर्षात 700 पेक्षा अधिक गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध मोक्का व एमपीडीए ची कारवाई करून त्यांना तडीपार केल्याचा मुद्दा अधिक तापला आहे. 700 पेक्षा अधिक जणांविरूद्ध कारवाई करून देखील गुन्हेगारांमध्ये पोलीस आणि कायदयाचा धाक का राहिला नाही… पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय हा मुद्दा घेवून नॅशनल फोरमने काही प्रश्न उपस्थित करून त्याबाबतची बातमी प्रसारित केली आहे. त्यात राज्याचे उच्च-तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्...
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेलचा चालक, मॅनेजरसह डिजेचा सामाजिक सुरक्षा गुन्हे शाखेने वाजविला बँड बाजा…

कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेलचा चालक, मॅनेजरसह डिजेचा सामाजिक सुरक्षा गुन्हे शाखेने वाजविला बँड बाजा…

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/पोलीसांनी एकदा कारवाई केल्यानंतर ते पुन्हा लगेच दुसरी कारवाई करणारच नाहीत अशा भ्रमात कुणी राहू नये असा संदेशच पुणे शहर पोलीसांनी दिला आहे. जेवढ्या वेळेस गुन्हा कराल तेवढ्या वेळेस थेटच कारवाई करू असा सज्जड दम शहर पोलीसांनी गुन्हे करणाऱ्यांना दिला असल्याची घटना समोर आली आहे. कोरेगाव पार्क येथील कोरा कॉकटेल बार ॲन्ड किचन या हॉटेलवर एकदा कारवाई झाली होती. त्यांना तंबी देवूनही पुनः त्यांनी गैरकृत्य केल्याने त्यांच्या विरूद्ध सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने जब्बर कारवाई करण्यात आली आहे. कोरेगाव पार्क येथील कोरा कॉकटेल बार ॲण्ड किचन हॉटेल, लेन नं 08, कोरगाव पार्क, पुणे येथे मोठयाने संगीत वाजवुन उपद्रव करताना मिळुन आले. अशाच प्रकारे दि. 18/11/2022 रोजी नमुद हॉटेलमध्ये मोठयाने संगीत वाजवुन उपद्रव चालु असताना मिळुन आल्याने त्याबाबत पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत ध्वनी ...
चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील बाणेर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर सामाजिक सुरक्षेचा छापा

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील बाणेर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर सामाजिक सुरक्षेचा छापा

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/वाढते पुणे शहर, वाढते नागरीकरण, त्यातच कॉल सेंटर, मॉल संस्कृती, देशी विदेशी पर्यटक आणि विद्यार्थ्यांचा पुण्याकडे असलेला ओढा पाहता, इथल्या व्यापारी आणि भांडवलदारी वृत्तीने चंगळवृत्ती जोपासण्याचे तंत्र विकसित केले आहे. नशेखोरी आणि देहव्यापर अर्थात याला चमडा बाजार असेही म्हटले जाते, तो देहव्यापार सुरू केला आहे. दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाईचे सुत्र बदलले असले तरी कारवाई सातत्याने सुरू ठेवली आहे हे विशेष आहे. मध्यवर्ती पुणे शहरासह पुण्याच्या उपनगरावर कुणाचेच लक्ष जात नाही. त्यामुळे सामाजिक सुरक्षा विभागाने मध्यवर्ती शहरासह उपनगरावर लक्ष केंद्रीत करून तेथे सुरू असलेले अवैध धंदे मोडीत काढले जात आहेत. पुण्याचे मोठे उपनगर असलेल्या बाणेर येथे सामाजिक सुरक्षा विभागाने मसाज पार्लर सेंटरवर कारवाई करून चार मुलींची सुटका केली आहे. दरम्यान चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत आजपर...
भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत , चोऱ्या करणाऱ्या अल्पवयीनांकडून 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत , चोऱ्या करणाऱ्या अल्पवयीनांकडून 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात विधीसंघर्षित अर्थात अल्पवयीन मुलांकडून मौजमजा, चैनी साठी चोरी करण्याचे व चोरी करवुन घेण्याचे प्रकार वाढले असल्याचे दिसून येत आहे. भारती विद्यापीठ व सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत महागड्या वाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्यांची दहशत निर्माण झाली होती. एवढ्या महागड्या वाहनातील बॅटऱ्या चोरणारे अतिशय सरावलेले चोरटे असू शकतात असा पोलीसांचा अनुभव असतो. परंतु ह्या चोऱ्या विधीसंघर्षित बालकांकडून केला गेला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. भारती व सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्या करणाऱ्या अल्पवयीन बालकांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याची उकल अशी झाली की, भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चोरीच्या गुन्हयांना आळा बसावा या करता तपास पथकाचे प्रभारी अधि...