Wednesday, January 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

सामाजिक

देशात दारू पिणार्या १६ कोटी लोकांपैकी ६ कोटी अट्टल बेवडे

सामाजिक
नवी दिल्ली : देशात किती लोकं दारू पितात याचा तपशीलवार आकडा केंद्र सरकारने राज्यसभेत सादर केला आहे. सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी ही आकडेवारी राज्यसभेत मांडली आहे. या आकडेवारीनुसार देशातले १६ कोटी नागरिक दारू पितात तर यातले ६ कोटी अट्टल बेवडे आहेत.        सामाजिक न्यायमंत्रालयाने पहिल्यांदाच व्यसने करणार्‍या नागरिकांचा आकडा कळावा यासाठी सर्वेक्षण केलं होतं. २०१८ साली हे सर्वेक्षण करण्यात आलं असून २ लाख १११ कुटुंबाच्या आधारे हा अभ्यास अहवाल तयार करण्यात आला. देशातील सगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कुटुंबे यासाठी निवडण्यात आली होती. अंमली पदार्थ किती प्रमाणात आणि कसे सेवन केले जातात याचा अभ्यास या सर्वेक्षणात करण्यात आला होता. ४ लाख ७३ हजार ५६९ व्यक्तींना या सर्वेक्षणाअंतर्गत प्रश्‍न विचारण्यात आले होते.       ...

राज्यात दोन वर्षांत ८१९ कारखाने बंद पडले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तोंड वर करून सांगितले, कामगारांची उपासमार

सामाजिक
subhash desai मुंबई/दि/        महाराष्ट्र राज्यात विविध कारणांमुळे २०१५-१६ मध्ये १५४ तर २०१७-१८ मध्ये ८१९ कारखाने बंद पडले आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेत तोंड वर करून सांगितली. त्याचवेळी बंद पडलेले कारखाने सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असून, वर्षभरापासून बेरोजगारीवर मात करण्यासाठी उद्योग विभागातर्फे अथक प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी दिली. यामुळे हजारो कामगारांवर उपासमारीची कुर्‍हाड कोसळली आहे.        राज्यात गेल्या काही वर्षांत बेरोजगारीचे प्रमाण सातत्याने वाढत असून, नोटाबंदीच्या निर्णयामुळे लहान उद्योजक आणि किरकोळ व्यापार्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यातील कारखाने बंद पडत असल्यामुळे बेरोजगारीची समस्या तीव्र होत असून, राज्यात ५० लाख शिक्षित तरुण बेरोजगार झाल्याविषयीच्य...
खाजगीकरणातून विकासाची दारे बंद करण्याचा डाव डॉ. सुखदेव थोरात यांचा आरोप

खाजगीकरणातून विकासाची दारे बंद करण्याचा डाव डॉ. सुखदेव थोरात यांचा आरोप

सामाजिक
sukhdov thorat-1 कोल्हापुर/दि/      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून मागासवर्गीयांना शिक्षण आणि आरक्षण बहाल केले. यातून मागासवर्गीयांचा विकास झाला. मात्र, खासगीकरणातून विकासाची ही दोन्ही दारे बंद करण्याचा व आरक्षण संपविण्याचा डाव सरकारकडून सुरू आहे,’ असा आरोप विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी केला. ते माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समितीने आयोजित केलेल्या समारंभात बोलत होते.      यावेळी डॉ. थोरात म्हणाले, ‘केवळ ३३ टक्के लोकसंख्या असलेल्या उच्चवर्णीयांकडे ६६ टक्के जमीन आहे. उद्योग, पतपुरवठा संस्थांमध्येही उच्चवर्णीयांचेच प्राबल्य आहे. मागासवर्गीयांकडे केवळ चार टक्के जमीन आहे, तर उद्योगांमध्ये हा टक्का आणखी कमी आहे. उत्पन्नाचे निश्चित साधनच नसल्याने मागासवर्गीय आर्थिक दुर्बल राहिले.   &nb...

युपीएससीत महाराष्ट्राचे ९० जण चमकले. पुजा मुळ्ये राज्यात पहिली, तर तृप्ती धोडमिसे दुसरी दलित समाजाचा कनिष्क कटारिया देशातून पहिला, मध्य प्रदेशची सृष्टी देशमुख देशातून पाचवी, सातारच्या तीन युवकांनीही मारली बाजी

सामाजिक
मुंबई/दि/ केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) सन २०१८ मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. या परीक्षेत कनिष्क कटारिया या दलित तरूणाने देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे, तर मध्य प्रदेशची सृष्टी देशमुख ही देशातून पाचवी व महिलांमधून पहिली आली आहे. महाराष्ट्रातून पुजा मुळ्ये हिने पहिला (देशातून ११ वा) क्रमांक पटकावला आहे. तृप्ती धोडमिसे हिने राज्यातून दुसरा व देशातून सोळावा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील सुमारे ९० तरूणांनी या परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यात ७० जणांनी युनिक अकॅडमीकडून प्रशिक्षण घेतले आहे. महाराष्ट्रातून पहिल्या स्थानावर असलेली पुजा मुळ्ये ही निवृत्त सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या आहे. वडिलांप्रमाणेच तिनेही प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आहे. आपल्या मुलीच्या या यशाचे ज्ञानेश्वर मुळे यांनी फेसबुकवरून कौतुक केले. महाराष्ट...

गत सात वर्षात १५ कोटी लोकांचा रोजगार गेला

सामाजिक
नवी दिल्ली /दि/ . मागील सात वर्षांमध्ये तब्बल १५ कोटी लोकांनी रोजगार गमावला असून यामध्ये ७.३ टक्के पुरुष मजूर आणि ३.३ टक्के महिलांचा समावेश आहे. ही धक्कादायक माहिती पीरिओडिक लेबर फोर्स सर्वेमध्ये (पीएलएफएस) समोर आली आहे. विशेष म्हणजे, याची नुकसान भरपाई करण्यासाठी शहरांमध्येही रोजगार वाढला नसल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कामगार क्षेत्रातील रोजगाराच्या संधीसंदर्भात २०१७-१८ चा पीएलएफएस सर्वे नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार घरकाम व शेतमजुरीतून मिळणार्‍या रोजगाराच्या संख्येत कमालीची घट नोंदवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकांना मोठया प्रमाणात शेतीतून रोजगार मिळत असून त्याचे उत्पन्नही चांगले आहेत. पण, ग्रामीण भागातील अशा उत्पन्नामध्येही १० टक्क्याने घट झाली आहे. २०११-१२ मध्ये शेतमजुरीतून उत्पन्न मिळवणार्या कामगारांचे प्रमाण २१ टक्के होते. आता ते प्रमाण १२.१ ...
बिबवेवाडी येथील हजरत राजा बागशहा शेर सवार दर्ग्याचा उरूस उत्साहात संपन्न

बिबवेवाडी येथील हजरत राजा बागशहा शेर सवार दर्ग्याचा उरूस उत्साहात संपन्न

सामाजिक
पुणे/दि/ रिजवान शेख/ पुण्यातील स्वारगेट- बिबवेवाडी परिसरातील प्रसिद्ध हजरत राजा बागशहा शेर सवार दर्ग्याचा उरूस उत्साहात संपन्न झाला. यावेळी शहर व उपनगरातील विविध भागातून आलेल्या भाविकांनी संदल, ऊर्स शरिफ व जियारत अशा तीन दिवस सुरू असलेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला. हजरत राजा बागशहा शेर सवार दर्ग्याच्या ऊरूसाच्या पहिला दिवशी संदल हा कार्यक्रम पारंपारीक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी हजरत राजा बागशहा शेर सवार यांना संदल लावण्यात आला. तसेच पारंपारिक वाद्य वाजवुन मिरवणूक काढण्यात आली. दुसर्‍या दिवशी ऊर्स शरीफ व तिसर्‍या दिवशी जियारत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सार्वजनिक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाच ते सात हजार नागरीकांनी यामध्ये सहभाग नोंदविला. बिबवेवाडी येथील हजरत राजा बागशहा शेर सवार हा दर्गा प्रसिद्ध असून, पुणे शहरासह विविध भागातून भाविक...
घराणेशाहीचे राजकारण!

घराणेशाहीचे राजकारण!

सामाजिक
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील संस्थाने खालसा झाली आणि देशात लोकशाही व्यवस्था लागू झाली. म्हणजे राजेशाही गेली आणि लोकशाही व्यवस्था आली. खालसा झालेल्या संस्थानातील काही राजे-महाराजे पुढे भारतीय राजकारणात उतरून लोकशाही व्यवस्थेचे अंग बनले. या राजघराण्यांमधील वारसदारांवर देशाच्या सर्वच भागांतील नागरिकांनी मोठा विश्वास ठेवला. काही मोजक्या राजघराण्यांनी जनता आणि राजा यांच्यातील अंतर कधी वाढू दिले नाही. आपला राजा आपल्यासाठीच झटणार, हा सामान्यांच्या मनातील विश्वास काहींनी वर्षानुवर्ष टिकवून ठेवला व त्यातूनच त्यांच्या कार्याची ओळख अधोरेखित होत गेली; परंतु देशभरातील बहुतांश राजे-महाराजे आणि त्यांचे राजकीय वारसदार यांचा शाही थाट पाहिला, त्या राजाच्या कार्यक्षेत्रातील प्रजेचे दुर्दैवाचे दशावतार पाहिले की, राजा आणि प्रजा यांच्यातील अंतर प्रकर्षाने नजरेस भरते.     राजघराण्यांचे आलिशा...

भारतातील मुस्लिमांची काळजी पाकिस्तानने करू नये; राजधानीत ओवेसीं-आंबेडकरांचा हल्लाबोल

सामाजिक
मुंबई/दि/ प्रतिनिधी/              पुलवामा हल्ला मोदी सरकारचे मोठे अपयश आहे. पुलवामा हल्ला मुत्सद्दीपणाचा, राजकीय आणि गुप्तचर यंत्रणेचा पराभव असून, येथील मुस्लीम समाजाच्या अधोगतीस कॉंग्रेस सरकारही जबाबदार आहे, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या जाहीर सभेत एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली.             दादर येथील शिवाजी पार्कमध्ये शनिवारी सायंकाळी वंचित बहुजन विकास आघाडीची विराट सभा पार पडली. यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन झाले. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.             ओवेसी म्हणाले, पुलवामामध्ये झालेला भ्याड हल्...
पुण्यातील येरवडा अन्नधान्य कार्यालयाचा भोंगळ कारभार, दुकानदारांकडून मात्र भेटवस्तुंचा भडीमार

पुण्यातील येरवडा अन्नधान्य कार्यालयाचा भोंगळ कारभार, दुकानदारांकडून मात्र भेटवस्तुंचा भडीमार

सामाजिक
Rationing-Office-Yerwada पुणे/दि/ प्रतिनिधी/             पुणे शहरातील येरवडा अन्नधान्य वितरण कार्यालय अर्थात रेशन कार्यालयाचा भोंगळ कारभार सर्वश्रृतच आहे. गरजुंना अन्नापासून वंचित ठेवायचे आणि काळ्या बाजारात सरकारी अन्न धान्याची सर्रास विक्री करायची याची मोठी स्पर्धा रेशन दुकानदारांमध्ये सुरू असते. त्यात भरीस भर महा-ई-सेवा केंद्रच येरवडा अन्नधान्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी कार्यरत असल्याने महा ई सेवा केंद्र सोन्याहून पिवळी झालेली आहेत. त्यातच काही रेशन दुकानदारांकडून अन्नधान्य वितरण अधिकारी श्री. खताळ आणि आशा स्वामी यांच्यासाठी भेटवस्तुंचा एवढा भडीमार होताय हे पाहून सर्व सामान्य नागरीक आणि स्वयंसेवी संघटनांकडून या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी करीत आहेत.         ...
पुणे पोलीसांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान डॉ. आनंद तेलतुंबडेंची अटक बेकायदा, विशेष न्यायालयाचा पुणे पोलीसांवर आसुड

पुणे पोलीसांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान डॉ. आनंद तेलतुंबडेंची अटक बेकायदा, विशेष न्यायालयाचा पुणे पोलीसांवर आसुड

सामाजिक
Dr-Teltumbade पुणे/दि/ प्रतिनिधी/            भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि कथित नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर, पुणे पोलिसांनी तेलतुंबडेंना पुण्याला आणले. आज न्यायालयात हजर करून त्यांच्या कोठडीची मागणी करण्यात येत होती. मात्र, येथील विशेष न्यायालयाने ही अटक बेकायदा असून, सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी असल्याचं म्हटलंय. दरम्यान पुण्यातील सत्र न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र, ही अटक बेकायदा असल्याचं विशेष न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुणे पोलिसांच्या कारवाईला रट्टा बसलाय.           पुणे पोलिसा...