फडणवीस सरकारचा स्चच्छतेचा बुरखा टराटर्रर्र फाटला..
Tukaram-Mundhe-Transfer
कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकार्याची एड्स नियंत्रण सोसायटीतील दुय्यम दर्जाच्या कार्यालयात पाठवणी
मुंबई/दि/ प्रतिनिधी/
कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रियतेसोबतच भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्यासाठी कायम चर्चेत राहणार्या तुकाराम मुंढे यांची शासनाने पुन्हा एकदा बदली केली आहे. मुंढे यांच्यासह शासनाकडून इतर ३ अधिकार्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली यांचीही आज बदली करण्यात आली. उगले यांच्याकडे नागपूर प्रदेश प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर रुबल अगरवाल यांची पुणे महापालिका आयुक्तपदी तर बालाजी मंजुळे यांची पुणे अपंग कल्याण विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
एक महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची नाशिक...








