
पुण्यातील पेठा आणि उपनगरातील गावठाणात बेकायदेशिर बांधकामांचा धडाका
Illegal-Construction-PMC
दोन गुंठ्यातः ६ मजली इमारती, १६ फ्लॅटची स्कीम, ६ महिन्यात उभ्या राहू लागल्या,
पुणे महापालिकेतील बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष,
धायरीत ६ मजली इमारत जमिनदोस्त, हिंगणे, विठ्ठलवाडी, गणेशमळा, सिंहगड रोडवरील कारवाई मात्र प्रतिक्षेत,
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
जुनं पुणे शहर म्हणजे, पुण्यातील पेठा. कोणत्याही पेठांत जायचं तर जुने चिंचोळे रस्ते आणि एका वाड्यामागे खंडी-दोन खंडी दुचाकी,तीनचाकी व चारचाकी वाहनांचा भरणा. त्यामुळे जुन्या पुणे शहरात जायचं यायचं म्हटलं की, तिथं कसलेलाच पुणेकर असायला हवा. पुणे शहर वाहतुक पोलीसांनी देखील पुणे शहराला शोभेल अशा पद्धतीने जुन्या पुण्यात परस्परविरोधी वाहनांचे फलक उभे केले आहेत. अगदी अस्सल पुणेकर त्याच्या उलट दिशेने वाहन पुढे दामटणार म्हणजे दामटणारच. कधी, कुठून आणि कस्सा कुठे वाहन घेवून घुसेल वा बाहेर पडेल याचा ...