काँग्रेस -राष्ट्रवादीने मराठी माणसांच्या हातात उद्योग व्यापार येऊ न देता गुजराती आणि राजस्थानी लोकांच्या हातात दिला -ॲड. बाळासाहेब आंबेडकर
Adv. Balasaheb Ambedkar
राज्यपालांचं वक्तव्य चुकीचं नाही, त्यांनी मराठी माणसाला जाणीव करून दिलीमराठ्यांनी आता ठरवले पाहीजे की, काँग्रेस- राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजपा सेना या सारख्या बुजगावण्यांसोबत रहायचे की नवीन नेतृत्व तयार करायच,राज्यपाल कोश्यारींचा हा टोला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील मराठी नेत्यांना आहे.
पुणे/दि/ प्रतिनिधी/काँग्रस-राष्ट्रवादी कॉग्रेसने राज्यावर इतकी वर्ष सत्ता गाजविली, मराठ्यांचे राज्य म्हणून कारभार केला, परंतु मराठी माणसांच्या हातात कधीच आर्थिक व्यवहार येऊ दिले नाहीत. तसेच मराठी माणसाला कधीच उद्योग व्यापार क्षेत्रात येऊ दिले नाही. ही जाणिव राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी करून दिली आहे. मराठा नेतृत्वाने आर्थिक व्यवहारात मराठीच्या हातामध्ये कधीच व्यवहार दिला नसल्याने त्यात राग येण्याचे काहीच कारण नाही. राज्यपालांनी वस्तुस्थिती मांडली आहे. त्यामुळे त्यांच्या उच...