
बहुचर्चित कसबा ३१ + ३३ वर टॅक्स विभागाची नोटीस, आता अनाधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई कधी…
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तांना हवा असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बर्हाटे याचा पुण्यातील साथीदार असलेल्या बांधकाम व्यावसायिकाने पुण्यातील बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, सदाशिव पेठ येथे प्रत्येक पेठांमध्ये सुमारे ३ ते ५ प्रकल्प उभे केले आहेत. एका लेआऊटला मंजुरी घेवून दुसर्याच प्रकारचे बांधकामे जागेवर केली आहेत. रस्ता नसतांना देखील डिमार्केशनमध्ये रस्ताच दाखवायचा नाही, मंजुर लेआऊट दोन मजल्यांचा असतांना प्रत्यक्ष जागेवर ४ ते ५ मजली इमारत बांधणे, इमारतीमधील पॅसेजचे क्षेत्र सदनिकेमध्ये समाविष्ठ करणे, पार्कींगच्या जागेवर बांधकामे व दुकाने काढणे अशा प्रकारची बेकायदेशिर कामे करून, पुणे महापालिकेचे आर्थिक नुकसान तर केलेच परंतु डीसी रूल विरूद्ध बांधकामे करून नियमभंग केला आहे.
रस्त्यावर एखादी वडापावाची हातगाडी, चहाचा ठेला लावला तर, पुणे महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस ...